आजकाल खोली मध्ये बसून एसी ची गार हवा खात समोरच्या पी सी वर, वाढलेल्या तापमानाचे आकडे बघून खोली बाहेर पडायचाच कंटाळा येतो.ऑफिस सुटल्यावर नैसर्गिक गरम हवा खाताना हशः हुस्शः करायला होता. शक्यतो उन्हा मधली कामं न करण्यामध्ये धन्यता मानण्याकडे आपला कल आजकाल वाढतो आहे. या सगळ्या मध्ये आराम वाटत असला तरी पूर्वीच्या उन्हाळ्याची मजा येत नाही असा सारखा वाटत रहात.
लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे कशी पर्वणीच वाटायची. शाळेची परीक्षा संपतेय केवा आणि मी खेळायला बाहेर जातोय केव्हा ? असं होई.
मजेची सुरुवात खरा तर शाळेला सुट्टी पडण्यापूर्वीच व्हायची. शाळेतून घरी यायच्या वाटेवर असलेल्या आंब्याच्या झाडांवर मोहोर आल्यापासून, आमचा लक्ष, रस्त्या पेक्षा वाढणार्या कैर्यांवर असायचा. कैर्या साधारण खाण्यायेवढ्या झाल्या कि शाळेतून येताना 'अभिनव बिंद्रा' ला हरवतील अशा नेमबहाद्दरांच्या मदतीने पाडून खाताना धमाल येत असे. सर्वात गमतीचा भाग हा असे कि ज्यांच्या घरची २००-३०० कलमांची बाग आहे असे मित्र हि या वाटमारीत सहभागी असत !!!या कैर्यांबरोबर मीठ तिखट असेल तर मग काय प्रत्यक्ष स्वर्ग सुखच मिळाल्याचा आनंद होई. याच दरम्याने कुणी ओले काजूगर आणून देई.ते खाताना बाहेरचा 'साल' काढायचा त्रास घेणा जीवावर येई.आणि साली सकट काजूगर खाल्ल्यावर त्या काजुगारांच्या खुणा तोंडावर काही दिवस रहात. (चिक लागेल त्या ठिकाणाची सालं जात असत.) काजूगर भरपूर असतील तर त्या दिवशी रात्री आमटी मध्ये काजुगरांचा 'सर्च ऑपरेशन' चाले. कैरी घालून केलेल्या आमटीची चवही अशीच मस्त असायची.जोगळेकरांच्या घराचा कांदंबा हि लक्षात राहणारा असे. ताज्या कैरीचा लोनचा हे तर चव बघण्यातच संपून जायचा. आणि यावरून मिळणारा ओरडा त्या चवी पुढे काहीच वाटायचा नाही!!!
मोठ्या होणार्या काजून बरोबरच गावातील स्थानिक काजू चोरांच्या टोळ्या कार्यरत होत. काजविणींच्या (काजूच्या झाडांच्या) मालकांसमोर काजू चोरून नेण्यात यांचा हातखंडा असे.या चोरलेल्या काजू बिया जवळच्या किरण मालाच्या दुकानात विकून आलेल्या पैशात 'थंडा' पिण्यात त्यांना समाधान मिळत असे. या साठी ते भर दुपारीही मेहनत घेण्यास तयार असत. काहीवेळा चोरीचा मुद्देमाल 'भैय्या'ला विकून त्या बदल्यात टोस्ट घेण्याकडेही काहींचा ओढा असे.
काजूच्या बिया साठवून त्या भाजण म्हणजे एक जंगी कार्यक्रम असायचा. एखादा जुना गांजलेला पत्रा शोधून त्याला कोयातीच्या सहाय्याने भोके पडून, तात्पुरत्या स्वरूपाच्या चुलीवर तो व्यवस्थित ठेवायचा. काजूची वाळलेली पाने आणि इतर पालापाचूला (सुका) गोळा करून तो चुलीत भरायचा आणि पेटवायचा. मग त्यावर असलेल्या पत्र्यावर काजूच्या बिया पस्सरून अदुलाश्याच्या काठीने त्या भाजताना हलवायच्या. काही वेळा नंतर त्या बियांना तेल सुटत असे आणि मग चुली खालची आग थेट बियांवर झडप घालत असे.आणि थोड्याच वेळात हि परिस्थिती नित हाताळली गेली नाही तर त्या बियांचा थेट कोळसाच होत असे. त्या मुले त्या योग्य वेळी उतरवणं हे कौशल्याचा काम असता. या बिया पत्र्यावरून थेट मातीत टाकल्या कि त्या गार होण्या आधी, फोडून खाण्यासाठी होणारी धडपड 'लय भारी' असायची !!!हात काळे करून, दगडाने,किंवा जे मिळेल त्याने त्या बिया फोडून अखानदा काजूगर काढणा म्हणजे खरोखर कौशल्याचाच काम असायचा. एवढे सगळे परिश्रम घेवून काढलेला काजूगर /बर्याचदा काजुगराचा तुकडा तोंडात गेला कि त्याची चव इतकी मस्त असायची कि या सगळ्या मेहेनातीचा चीज झाल्याचा समाधान 'बोनस' मिळायचा !!!
(आयते काजूगर आणून खाण्यात हे समाधान अजिबात मिळत नाही!!!)
घराजवळच्या झाडाची जांभळ हि सुरेख धरायची. झाडाखाली जांभळांचा सदा पडून माती जांभळी दिसायची.पानावर पडलेली जांभळा अलगद उचलून तोंडात केवा जायची ते काळायाचाही नाही !!! शेजारच्या कोलाग्यांच्या झाद्दवर धरलेले पांढरे 'जाम' तर घरबसल्या खाता येत.त्यांच्या दुकानावर खरेदीला गेलेली मुलं/ वाडीतील माणसे ते मला भेट म्हणून देत असत.
तशी आणि मजा यायची ती, काटे बाजूला करत करत तोरणं आणि करवंद खाताना !!! पिकलेल्या काजूची बोंड, हसाणी, कोवळ्या फणसाची -कुयरीची (आईच्या हातची) भाजी, आजी ने केलेला पन्हं, शेजारच्या मामानी दिलेला आंब्याचा 'कोयाडा', भाटवडेकर आजीच्या हातची फणसाची भाजी (या भाजीची चव आजीबरोबर कायमची गेली...),हळदी-कुंकू वेळी केली जाणारी आंब्याची डाळ- (चान्दाडीच्या पानावर), चाण्यानी खाल्लेल्या चिंचा, कापे- बरके फणस आणि झाडपिका आंबा पडल्या पडल्या खाण्यात अक्खा उन्हाळा संपून जायचा त्यावेळी खरोखर दुख होई!!!
सकाळ पासून रात्री पर्यंत हुंदडण्यात अक्खी उन्हाळ्याची सुटी संपून जायची.त्यावेळी दुपारचं उन, भूक, उकाडा या गोष्टी कधीही अडथळा व्हायच्या नाहीत !!! काही वेळा तर सकाळ दुपार रात्र फ़क़्त आंब्याच्या आहारावर जाई. कधीतरी दुपारी ५० पैशात मिळणारं साधं किंवा १ rupayacha Venila आईस्क्रीम म्हणजे अपूर्वाई असायची !!!
या सगळ्यातली मजा किती अमूल्य होती हे आता यातल्या प्रत्येक गोष्टीला मुकताना प्रकर्षाने लक्षात येतं.
Wednesday, May 19, 2010
Subscribe to:
Posts (Atom)