Tuesday, November 27, 2012

बिल्वा इनामदार.

बिल्वा इनामदार.

'बिल्वा' ने खूप केला सगळ्यांसाठी ! सगळ्यांचा करून झाला आणि शेवटी नवऱ्याचा आजारपण निस्तरता निस्तरता गेली.मला खूप आधार होता बाई  तिचा ! आता घर म्हटलं  कि भांड्याला भांड लागायचंच  ! इनामदारांच्या वाड्यात तेव्हा आम्ही नुकते राहायला आलेलो. घरात पहिली सून येणार म्हणून अप्पा केवढे खुश होते. काकू ना  तर ते उघडपणे सांगायचे, "दुसर्याची पोर आपल्याघरी येणार आहे तिला आपल्या मुलीं सारखीच  वागणूक द्यायची ! सासुरवास करायचा मनात देखील आणू  नकोस." इनामदारांचा वाडा  तसा मोठा.पण  वाटणी  झाल्यावर मध्ये भिंत उभी राहिली ती कायमचीच. अप्पांच्या हिस्श्यात असलेल्या दोन खोल्यात आमचा नवा संसार सुरु झाला. यांचा शिक्षकी पेशा, हळू हळू आजू बाजूची मुलही शिकवणीला यायची.
त्या गरिबीच्या दिवसात खर्च मेले नव्हतेच. जे काही चार पैसे येतील त्यात जमवून घ्यायचा कि झाला. एखाद्या महिन्यात गणित चुकायचं भाड्याचे पैसे रखडायचे पण आधी अप्पांनी आणि अप्पांच्या पश्चात 'बिल्वाने' चुकूनही तगदा  लावला नाही ! 'बिल्वा' मस्करीत म्हणायची ताई बाई भिंतीवरचा महिना बदललात का नाही ? पण ते तितकाच. 

बाई  मोठी करारी.माहेरची गरिबी सोडून..सासरच्या दारिद्र्यात आलेली ! माहेरचा एकत्र कुटुंब. हिच्या आधीच्या दोन बहिणी आणि धाकटे बंधुराज ! त्या मुळे  निरनिराळी मतं, निरनिराळे स्वभाव आणि सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी लागणारा वचक या सर्वांची तिला चांगली जाण  आणि .जोडीला पुरेसा शिक्षण !
या शिदोरीवर तिने इनामदारांच्या घरात अल्पावधीत स्वताच स्थान निर्माण केला. घराच्या वाटणी नंतर अप्पांच्या वाट्याला आला ते फार अल्प  होता आणि जे मिळाला त्यातला बव्हंशी कोर्ट कचेऱ्या मध्ये संपला. हाताची शेतजमीन गेली..उपास मारीचेच  दिवस नशिबी होते..पण त्याच वेळी 'बिल्वा' ने  आणि थोरल्या शरद  ने नोकरी करून घर सावरलं !  नवरा हि तसाच कुटुंबाची जबाबदारी  अंगावर घेणारा होता हे मान्य पण अप्पाना शेवट पर्यंत कौतुक वाटला ते बिल्वाचच !!"दुसर्याच्या घरून येवून या मुलीने माझा संसार सावरला.घरातल्या स्वयपाका पासून गोठ्यातला शेण  उचलण्यापर्यंत सगळी काम हिने केली. हि चा हातभार लागतोय म्हणून माझी इतर चार मुलं  आज सुखात जगतायत...पोरीच खूप कौतुक वाटता !" अप्पानाच उर भरून यायचा. पुढे अप्पांच्या जाण्यानंतर घराची  सूत्र अलगदपणे 'बिल्वाच्याच' हातात आली. सासूबाई तशा नावालाच ! स्वताहून पुढे होऊन कुठली जबाबदारी अंगावर घेण हा मुळी त्यांचा स्वभावाच नव्हता. सतत कुणाच्या तरी आधाराने आणि दडपणाने जगायचं एवढाच त्यांना माहित. आधी अप्पांबरोबर  संसार करताना अप्पांचा ऐकत आल्या, पुढे मुलांच्या राज्यात  "बिल्वा वाक्यं प्रमाणाम.. !"या न्यायानं  चालल्या.

अकस्मात अप्पा गेले..आणि इनामदारांच्या वाद्याचा नूर हळू हळू बदलाल्याला लागला..बिल्वा शरद नोकरीत गुंतलेले..शेती कसायला कुणी नाही..गोठ्यातल्या गुरांना कसा सांभाळायचा ?  जीव गुंतलेला असला तरी  शक्य होत नव्हता...एका दिवशी बिल्वा ने आणि शरद ने निर्णय घेवून गोठा रिकामा केला...! वर्ष दोन वर्षात धाकटा भाऊ शिकून नोकरीला लागला..थोडी आर्थिक सुबत्ता यायला लागली..! मधल्या भावाने स्वताचा वेगळा मार्ग शोधला..तो कशातच अडकून पडला नाही..! या गोष्टीचा इतरांना होणारा मनस्ताप.. नवर्याच्या धाकट्या बहिणींची शिक्षण...अप्पांच्या जाण्याच दुक्ख  स्वताची नोकरी आणि  तान्ही मुला एवढ्या सर्व जबाबदार्या समर्थपणे पेलत तिने आणि शरद ने  त्या सगळ्यांची  लग्न कार्य हि केली !!!
हे सगळा करायला बिल्वा काही त्यावेळी चाळीशी पन्नाशी ला नव्हती किंवा तिला तसा सांगायलाही कुणी जात नव्हता. हे सगळा तिने कुटुंबा करता केलं ! 

तिच्या ह्या कर्तुत्वाची जाणीव घरात सर्वाना असल्यामुळे सगळे तिला खूप मानत.घरात नसलेली आर्थिक सुबत्ता आली...हळू हळू सुखाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पना बदलत गेल्या...!आधी जावा जावांमध्ये छुपा संघर्ष सुरु झाला..एकीकडे जावेच्या मुलांवर जीवापाड प्रेम त्यांचे लाड आणि त्याच वेळी कुठे तरी मोठ्यान्च्यातच चालणारं  असमंजसपणाच शीत युद्ध !!! मधला भाऊ आधीच  वेगळ्या वाटेने गेलेला.दोनही बहिणींना  चांगला सासर लाभलं ! एकत्र म्हणून कोण तर थोरला आणि धाकटा भाऊच ..पण नाही  उपाशी पोटी, गरिबीत एकत्र राहिलेला घर पुन्हा दुभंगला..! आणि एक भिंत !!

तिसर्या भावाचा मार्ग वेगळा असला तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बिल्वाने जेव्हा लागेल तेव्हा हरप्रकारे आधार दिला. 

एकीकडे मुलानी एकमेकांकडे  जाण.. येणा सुरूच ठेवला.मोठ्यांचे वाद आपसात आणले नाहीत..!शिक्षणा नंतर यथावकाश त्यांची हि लग्न कार्य झाली..! नातवंड आली. कार्यानिमित्त्याने घर एकत्र येत राहिल. स्वतः च्या  आई पासून थेट नातवंडा पर्यंत प्रत्येकासाठी तिने जे जे लागेल ते ते  केलं. स्पष्टवक्ता आणि रोखठोक स्वभाव यामुळे प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. एखाद्याची बाजू घेतानाही  इतर कोण काय म्हणेल याचा विचार केला नाही. काही वेळा हे योग्य असायचा..काही वेळा नसायचा...! एवढी धडाडीची बाई ती पण शेवटी कुटुंबात अडकून पडली. कुटुंबासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यावर स्वताच्या म्हणून हौशी मौजी उरल्याच नाहीत.
 अलीकडे माझी तिची भेट क्वचितच व्हायची. मी माझ्या आजारपणात आणि ती तिच्या नवऱ्याच्या...!

आज ती गेलेली कळलं  आणि भूतकाळात जीव गुंतला !

'बिल्वाच' मला एकदा म्हणाली होती.."ताई, खरा सांगू का? मी या घरात आले..तेव्हा काय गत  होती ? घरात चार माणस  होती पण गाठीला दोन पैसे नव्हते..आज नेमका उलट आहे हो..आर्थिक विवंचना काही नाही..पण निस्वार्थ प्रेम करणारी आपली माणसं  नाहीत..मुलं  आहेत पण ती तशी आपल्या विश्वात मश्गुल..नातवंडात मन रमत..पण पुन्हा त्यात डाव उजवा होत रहात ! या घरात माझं  वेगळा स्थान आहे..मला सगळे मानतात..अतिशयोक्ती नाही पण काही अंशी माझा वचकही आहे. हे सगळा  आपोआप झालेला नाही.
लहानपणाची एक गोष्ट सांगते, "आम्ही तिघी बहिणी जवळपास एकाच वयाच्या, गावातल्या शाळेत एकत्रच जायचो यायचो. डबा , अभ्यास, हाणामारी दंगा  सगळा एकत्र ! मोठी शांत असायची. धाकटी माझ्याच सारखी वात्रट. धाकटी नेहमी सापडायची आणि मार खायची..मोठी शांत म्हणून गुणी..मी वात्रट पण व्यवहारी आणि विचारी बर्याच वेळा सुटायचे.एकदा काय झालं  दहावीत असताना  आम्हा तिघींना बाबांनी एकसारखी तीन शाई  पेन आणून दिली. हातात पेन मिळाला याचा कोण आनंद झालेला.मोठी नेहमी प्रमाणे शांत. धाकटीने पेन उघडलं, आणि शाई झटकताना चुकून तिच्या हातून पेन पडला. शाईचा  सडा  कपड्यावर आणि जमिनीवर पडलेला. दोन मिनिटापुर्वीचा तिचा हसरा चेहरा रडकुंडीला आला. .मोठ्या  ताई ने तेवढ्यात 'आता बाबांना नावच सांगते म्हणून चिडवलं.' बिचारी खरोखर रडायला लागली. तो आवाज ऐकून बाबा आले..अपेक्षेप्रमाणे रागावले..'तुला मेलीला अक्कल नाही, ती मोठी बघ कशी हुशार आहे नाहीतर तू.. थांब आता पेनच  देत नाही परत...!' म्हणाले. मला खूप वाईट वाटल. मी पटकन बोलून गेले.."बाबा ते पेन माझा होता..तिचा पेन निट  आहे.हे बघा." पेनं सारखी असल्यामुळे माझा खोटेपणा लक्षात आला नाही. त्या दिवशी मला कळला कि ज्याची बाजू सावरून घ्यायला कुणी नाही त्यालाच मदत करावी.त्यातून दोन गोष्टी सध्या होतात..एक म्हणजे आपलं  सामर्थ्य  गरजू माणसासाठी वापरला जातं  आणि दुसरं  असा कि आपला महत्व आपोआप वाढतं ! एकदा का आपला महत्व वाढला कि आपण म्हणू तसा होतं ! मी म्हणेन तसा व्हावं  हीच माझी इच्छा असते ! पण त्यामुळे काय होत ना, आपल्यावाचून ज्याचा अडत नाही न त्याच्याबद्दल असूया वाटायला लागते.
कुणाच वाईट व्हावं  अशी माझी इच्छा मुळीच नाही पण त्याचं  कुठेतरी अडल्याशिवाय ते माझ्याकडे येणार कसे ? "हि " मला मदत नक्की करेल असा जो पर्यंत त्यांना वाटतंय तो पर्यंत माझा अस्तित्व आहे. त्यांचा परावलंबन ज्या क्षणी संपेल त्या क्षणी माझी सत्ता संपली.मी कर्तबगार आहे हे नुसता मला माहित असून उपयोग नाही.ते इतरांनी स्वीकारला पाहिजे. कुठल्याही गोष्टीची स्वीकारार्हता वाढण्यासाठी काही वेळा परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे.हे ज्याला जमत त्याचा लोक ऐकतात. "

गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव 
२८/११/२०१२
रात्रौ १.१६ वा.
९९६०३९७७७३





Sunday, November 25, 2012

अश्वमी चीत्गावकर.

आज उतरत्या वयात  गरजेपुरता पैसा आणि राहायला हे घर आहे.  पण  माझी दोन्ही मुलं  माझ्या सोबत   नाहीत. अर्थात ती नाहीत म्हणुन वाईट वाटत नाही. हि अश्वमी चीत्गावकर कुणापुढे   झुकली नाही  ती आता या कालच्या मुलांसमोर थोडीच झुकेल  ?

माहेरी मी सगळ्यात थोरली.लग्न  होई पर्यंत स्वताच्या रुपाची आणि घरच्या श्रीमंतीची जाणीव मनाला झालेली. कस बसंपदवी पर्यंत  शिक्षण पूर्ण केलं. दादा नि स्थळ आणल.मुलगा आवडला लगेच हो म्हटलं.    माहेरचा रुबाब घेवूनच सासरी आले. सासरी आल्यावर नवरा कर्तुत्ववान मिळाला.मोठ्या हुद्द्यावरची सरकारी  नोकरी. आधी खेड्यातून शहरात आले. नंतर शहरी थाटाची सवय झाली.दर दोन अडीच वर्षांनी यांची बदली व्हायची.राहायला सरकारी घर,फिरायला गाडी, दिमतीला नोकर चाकर.असा वाटायचा कि मीच साहेब आहे.
बर यांना कसली म्हणून हौस नाही. सतत आपलं  कार्यालय, काम फायलींचा गठ्ठा आणि  दोन्ही  मुलं  यातच लक्ष.सोबतीला ओठामधे रेंगाळणारी सिगरेट ! माझ्याकडे कसली तक्रार नाही कि कसला  विशेष आग्रह नाही.
मला तसा स्वातंत्र्यच होता. बाबा कार्यालयात व्यग्र अस्साल्यामुळे दोन्ही मुलांना हवं नको बघायचा,त्यांना फिरायला घेवून जायचा,शाळेचा अभ्यास, शिकवणीचा वर्ग नियमित सुरु आहे का हे बघण्यात दोन्ही मुलांचा लळा मलाच जास्त लागला. मोठी ताई अंकिता अभियांत्रिकी शिक्षणासाठी दहावी नंतर  घरातून बाहेर पडली.

त्या वर्ष पासून या 'पुण्या'शी माझं नातं जोडला गेलं. नंतर तिच्या परीक्षेच्या वेळेला एक दोन महिने तिच्या खोलीवर रहायला यायचे. येवढा कठीण अभ्यास करताना तिला रात्र रात्र जगायला लागायचा त्यावेळी तिला चहा ,कॉफी , करून द्यायला मीही जागी राहायचे. मुळात यांच्यावर गेलेली अंकिता जात्या  हुशार. शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करून पदवी मिळण्याआधीच तिला नोकरी चालून आली. शिक्षणा नंतर पुन्हा नोकरी साठी ती आणि लांब गेली बेंगळूरू ला ! किती माझी गुणाची पोर असा वाटायचं !

याच्या विरुद्ध दिवटे चिरंजीव ! शाळेत कायम तक्रारी. हुशार असूनही अभ्यास करत नाही म्हणून शिक्षकांकडून ऐकून घ्यावा लागायचं. यांना सांगितला लक्ष घाला म्हणून तर म्हणे हा 'गृह' खात्याच्या अखत्यारीतला विषय आहे. तुम्हीच लक्ष द्या. नववीला असताना शाळेत समजत नसेल म्हणून  एका ठिकाणी खासगी शिकवणी लावली.पहिले पंधरा दिवस रोज वस्तूंची आदळ  आपट  ! मी जाणारच नाही म्हणायचं ! पण महिन्या भर नंतर रुळला. मग हळू हळू उशिरा येणा सुरु झालं. एक दिवस रात्री दहापर्यंत पत्ता नाही. मुलगी पुण्याला, हे कामानिमित्त दहा दिवस दौऱ्या वर गेलेले.मी एकटीच घरी. त्या काळात आजच्या सारखे मोबाइल ल फोनही नव्हते. काळजी करून जीव मेटाकुटीला आलेला. तितक्यात एकदाचा स्वप्नील दरवाज्यातून आत आला. इतकावेळ आलेला राग लगेच विरघळला. जीव भांड्यात पडला.पण तेव्हढ्या क्षणापुरताच.

तोंडाला दारूचा वास. मळलेले कपडे.विचित्र दिसणारे डोळे. त्या दिवसा पासून पुढची दोन वर्ष  हा कुठल्याही तर्कट न बसणारा पण नशिबी आलेला भोग मी भोगत होते नशा  नुसत्या दारूची नव्हती. माझा मुलगा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याच्या त्या  अर्धवट वयात त्याला भलता सलता  बोलूनही काही फायदा नव्हता. पुढचा वर्ष दहावीचा. त्याला अंजारून गोंजारून, प्रसंगी मार, शिव्या सगळा सहन करून त्याच्या कडून सगळा प्रकार काढून घेन गरजेचा होता. मुलाकडे लक्ष दिला नाही म्हणून यांचा रोष. सगळा प्रकार असा विचित्र झालेला, कुठल्या नातेवाईका  कडे जायची सोय नसायची. ताई ला हि सुट्टीला घरी येवू नको असा हृदयावर दगड ठेवून सांगायला लागायचं. मन रमवायला यांच्याकडे याचं काम होता.माझ्या नशिबी त्या वेळी हे ऐकून घ्यायला हि कुणी नसायचा. नशेच्या अमला खाली स्वप्नील वाट्टेल ते बोलायचा. शेवटी एकदा अध्यात्मिक आणि वैद्यकीय उपचारांनी माझं  पिलू सुधारला.

पण त्या नंतर तो माझ्यापासून खूप दुरावला. मी सांगितलेली कुठलीही गोष्ट त्याला पटायची नाही. तिरकस बोलणं, चेष्टा कारण नेहमीचाच होता. अपमान करायलाही मागे  पुढे पाहायचा नाही. फक्त त्या वेळी यांचा मला आधार होता.पुढे मग हा हि शिक्षणा साठी पुण्यात आला. स्वताच्या आवडीने हॉटेल व्यवस्थापनाचा कोर्स करून नोकरीला लागला. लांब असल्या मुळे फोन वर होईल तेवढाच बोलणं.

दोन्ही मुलं  बाहेर गावी गेल्यावर पुन्हा एकदा आमचा दोघांचा संसार सुरु झाला. अर्थिक  चिंता नव्हती. मुलही आपल्या पायावर उभी राहत होती. एकूणच चांगले दिवस होते. लग्ना  नंतर हि मुलं  होई पर्यंत आम्ही दोघंच होतो.पण खरा सांगू त्या वेळी नवरा- बायको  दोघांमध्ये असता ते आत्मकेंद्री कुतूहल आणि आकर्षण.आणि मुलं  आहेत पण लांब आहेत  अशी वेळ येईपर्यंत नातं  शारीरिक आकर्षणा  पुढे गेलेला असता. जाणीवेचा परीघ आणि  सुखाचा केंद्रबिंदू बदललेला असतो. नेमक्या याच काळात नवर्याला बायकोच्या अनभिज्ञ अशा कणखर बाजूची ओळख होते आणि बायकोला नवर्याच्या हळव्या मनाची ! फक्त हे नात मुलांच्या पश्चात उलगडत जात असता त्यामुळे मुलांच्या मनातली आई आणि बापाची लहानपणापासून पाहिलेली प्रतिमाच उत्तरोत्तर उत्कट होत जाते. तुमच्या पिढीच्या भाषेत सांगायचा तर जशी तुम्हा मुलांना स्वताची 'स्पेस'  हवी असते ना तशीच ती तुमच्या 'आई बाबांना'  मिळाल्या नंतरच हे शक्य आहे.

अंकिताचा लग्न हे आमच्या एकत्रित  कुटुंबातला पहिला आणि शेवटचा कार्य. तेवढेच पंधरा दिवस आम्ही कुटुंब म्हणून मनापासून एकत्र राहिलो.हौस मौज केली. पुढे लेकी ला लेक झाली.ती तिच्या संसारात गुंतली.
यांचं आजारपण अचानक उफाळून आलं. जमा केलेल्या पुंजीतली मोठी रक्कम आजारपणात संपली.उपचार करूनही काही गुण आला नाही. यांच्या जाण्यानंतर सगळा खेळच बदलला. मुलगा विचारेल हि आशा  नव्हतीच. तरीही यांच्या जाण्यानंतर त्याला परदेशात नोकरी लागली. सहा आठ महिन्यांनी घरी आला. यांचे पैसे आणि घर माझ्या नावावर असल्यामुळे, वाटणी साठी तगादा  लावून झाला.अचानक म्हणाला माझ्याबरोबर परदेशी चल..! मिरवायची हौस स्वभावातच असल्यामुळे मी हि तयार झाले. माझेच पैसे लावून त्याच्या बरोबर गेले. तिकडे गेल्यावर भलताच प्रकार. याच्याच नोकरीचा काही पत्ता नाही. दोघानाही उपास मारीची वेळ. अनोळख्या शहरात, अनोळखी लोकात अनोळखी भाषेत काही तरी खाणा  खुणा करून अक्षरशः 'ओम भवती भिक्षान देही' करत फिरले ...! एकदाची याला  नोकरी लागली ...मग काय यानेच अडवून धरला. "आता कशी जातेस बघतो..बाबांच्या जीवावर सगळ्या उद्या मारत होतीस..स्वताची किती अक्कल आहे ती कळेल आता..." हे आणि बराच काही बोलला..! मी खमकी म्हणून कशी बशी परत  आले इथे.

आल्या बरोबर निर्णय घेतला..आता यांची पर्वा  करायची नाही..! हातात असलेली सगळी पुंजी संपल्यात जमा. दुसरा पर्यायाच नाही म्हणून राहता घर विकायचा निर्णय घेतला. घरात माहित असावा म्हणून भावजी न सांगितला तर मुलाने बेशरम पणाची  हद्द केली...माझे त्यांचे संबंध जोडून मोकळा झाला..! तो एवढ्यावरच थांबला नाही..त्यांनी आणलेला गिर्हाईक कमी पैसे देत होता म्हणून स्वतः पुढाकार घेवून एक गिर्हाईक घेवून आला..ते वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होते..कारण देह विक्रयाच्या  दुकानाची घडी  त्यांना तिथे बसवायची होती..आणि माझा मुलगाच या कारणासाठी  आमचं  घर देवू करत होता! हे ज्या क्षणी मला कळला त्या क्षणी त्याला घराबाहेर हाकलला..."व्यवहार झाला कि तुझ्या वाटणीचे पैसे खात्यात जमा होतील..मला तुझा तोंड बघायचा नाही...चालता हो ! "सांगून दरवाजा लावला आणि अगतिक पणे  रडत बसले...

अशा अवघड वेळी जिच्या मदतीची रास्त अपेक्षा मी केली त्या मुलीनेही रंग बदलला..! वाटणीच्या पैशाचा मोह
तिला हि होता. मुलगा उघड बोलला..तिने  आडून वार केला..! व्यवहार झाल्यावर दोन्ही मुलांना पैसे देवून टाकले. उरलेल्या पैशात हि सदनिका घेतली. इतका सगळा झेलूनही  माझी जगण्याची ओढ कायम  आहे.  आजही मी चालत जाण  टाळते, रिक्षाने जाते. फक्त आता मी  सुखाचा किती उपभोग घेते  याची  नोंद मनाशी  असते. मी जन्माला आल्यापासून पैसा कमावला नाही हे सत्य आहे.पण मला त्याचा वैषम्य अजिबात नाही.
मी  पैशाचा उपभोग घेण्यासाठीच जन्माला आले आहे  आणि उपभोग घेता घेताच मरणार. अशा करंट्या  मुलांचा विचार मी आता सोडून दिलाय.

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;


'स्त्री' हि व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.वेगवेगळ्या विचारधारा, अनेकविध वृत्तीसंस्कार ,उपजत सौंदर्य आणि  त्या सौंदर्याचा सार्थ अभिमान घेवून आपल्याच सभोवताली  वावरणाऱ्या  'स्त्री'त्वाचा  अविष्कार हा  विभिन्न  परिस्थितीत होत असतो. 'स्त्री' त्वाचे सभोवताली  दिसणारे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा माझा हा पहिला प्रयत्न.चूक भूल घ्यावी द्यावी.

धन्यवाद
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव .
१०.५१.
२५/११/२०१२.


Friday, November 2, 2012

अर्थ'पूर्ण' व्यवस्था- एक विचार.

अर्थ'पूर्ण' व्यवस्था- एक विचार.

सध्या आपलं  'महा'राष्ट्र  विविध साथीच्या आजारांनी ग्रासल आहे. बरोब्बर वर्ष- दीडवर्षभरापूर्वी एका वैद्यांनी 'गांधी' टोपी घालून  देशाला भ्रष्टाचाराचा आजार झाल्याचा निदान केला. सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून संसर्ग झाल्याच मान्य केलं. योगी बाबांनी आणि भ्रष्टाचार विरोधी भारताच्या हुशार लोकांनी असा काही जंतर मंतर केला कि प्रमुख वैद्यालाच  वेगवेगळ्या 'परीक्षांसाठी' मुंबई आणि इतर काही ठिकाणी फिरवला. ज्या आजाराचा प्रतिकार करायला हि वैद्यांची तुकडी निघाली होती त्याच तुकडीला पुढे या रोगाने पछाडलं. मुख्य वैद्यांनी 'हो' 'नाही' हो -नाही करत करत अलिप्तता स्वीकारली. उरलेल्या मंडळीनी स्वताचे 'दवाखाने' उघडले. या 'बोगस' वैद्यांचा फायदा म्हणाल तर आजाराचा प्रतिबंध दूरच राहिला फक्त  संसर्गाची लक्षण कळली इतकच.

मुळात आपलं राष्ट्र आणि राष्ट्र व्यवस्था सुधृढ आणि सशक्त करण्यासाठी काय काय करायला हव ते बघितला पाहिजे.नुसता जन लोकपाल जन लोकपाल म्हणण्या पेक्षा शंभर कोटीच्या वर असलेल्या 'जनांना' एक जबाबदार 'नागरिक' असलेल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी काहीतरी ठोस बदल करावे लागतील. जनजागृती हवी हे मान्य. पण अमक्याने इतके पैसे खाल्ले असा ओरडून काय होणार आहे ? जादूची काडी फिरेल आणि त्याला शिक्षा होईल अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. आणि ज्या देशात 'कैदी' म्हणजे फुकटचा भार आणि तुरुंग म्हणजे ऐशोआराम करायची जागा झाली आहे तिथे अशी शिक्षा तरी काय कामाची ?
साधी गोष्ट आहे लोक 'पैसा' मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करतात. भ्रष्टाचार संपवायचा असेल तर लोकांना आवश्यक येवढा पैसा मिळेल याची सोय सरकारने करायलाच हवी.(कृपया -आर बी आय ने नोटा छापून वाटाव्यात असा अर्थ काढू नये.!) वाचताना तुमच्या मनात येईलही कि "हा काहीही लिहित सुटलाय."पण तस नाहीये. 

दुसर्याचा नुकसान करण्यासाठीच दरवेळी भ्रष्टाचार होत नाही. काही लोक आपला होणारा  नुकसान भरून काढण्यासाठी भ्रष्टाचार  करतात तर काही अमानुष नफेखोरी करता यावी म्हणून करतात.उदा. हॉटेल चा बिल तयार करून घेवून त्याचे पैसे मिळवणारा नोकरदार माणूस हा पहिल्या वर्गात मोडतो.त्याला ते मनात पटत नाही पण हातातला पगार इतका कमी असतो कि तो त्या बिल कडे संधी म्हणून बघतो. दुसरा वर्ग हा 'अंबानी' आणि कंपनी चा. यांना विरोध करणार्यांचा हे 'रेडीली जयपाल' करणार. दोष अंबानींचा नाही. दोष मानसिकतेचा आहे.
'मी सामान्य माणूस, मंत्री,नेता, पंतप्रधान, राष्ट्रपती, काहीही झालो तरी पद गेल्यानंतर मला कोण विचारेल..? माझी काय किंमत उरेल ? हा साधा प्रश्न प्रत्येक स्तरावरच्या माणसाला पडत असतो. त्याला फक्त एकच  गोंडस उत्तर दिसत असता ते म्हणजे 'पैसा पैसा  आणि फक्त  पैसा...! '
पैसा कमावण्यासाठी संधी निर्माण करावी लागते. जितकी संधी कमी निर्माण होईल तितकी जनतेची  गरिबी आणि अगतिकता वाढते.नेमक्या याच तत्वाचा पूर्ण फायदा 'संधीसाधू' दलाल घेतात. दुर्दैवाने आपला राष्ट्र हे याच दलालांच्या हातात आहे. हे दलाल 'लोक आणि लोकशाही'- १० जनपथ वर ठेवतात आणि स्वतः सरकारी निवास स्थानात राहतात.जो पर्यंत संधी देणं  न देणं आपल्या हातात आहे तो पर्यंतच आपला अस्तित्व आहे याची पक्की जाण  असलेला हा वर्ग मग हर प्रकारे आपला वर्चस्व अबाधित ठेवतो.दिल्ली पासून गल्ली पर्यंत तेच आहे.यांना हद्दपार करायचा असेल तर समान नसल्या तरी किमान संधी तरी निर्माण झाल्याच पाहिजेत.
कुठलाही सरकारी खातं घ्या अपुरा कर्मचारी वर्ग आणि असह्य यातना सरकारी नोकरदार वर्गाच्याही आणि लाभार्थींच्या हि.पोलीस,राज्य परिवहन यंत्रणा,बँक, इतर सरकारी आस्थापने..सर्वत्र तेच..!!! देश भरातली लाखो रिक्त पदे भरली तर गरीबी निश्चित कमी होईल. विचार करा बस थांब्यावर उभाराहिल्यावर पाचव्या मिनिटाला बस हजर झाली आहे. सात बाराच उतारा, जन्म मृत्यूचा दाखला, इ इ सर्व दैनंदिन कामे पटापट व्हायला लागली. सर्व  टेंडर वेळेत निघाली कामं वेळेत झाली तर कशाला रस्त्यातला डांबर निघून जाईल ? सिलिंडर , पाणी , रेल्वेचा तिकीट, बस स्थानक एवढाच काय कुणी गेल्यावर स्मशानातही रंग लावावी लागली नाही तर माझा तुमचा आयुष्य किती सुखी होईल? यासाठी वेगळा काही हवय का ? लोकं  तर आहेतच. बिचारी आत्ता पण तुटपुंज्या पगारावर राब राब राबत आहेत.पैसा...तो हि आहेच.खरा तर  सद्य  असलेले अडथळेच जास्त महाग आहेत. म्हणजे शहरी बस वेळेत येत नाही म्हणून रिक्षा करा / दुचाकी घ्या. सगळ्यांनी तोच विचार केला कि मग रिक्षा काय अगदी टेकसी  केलीत तरी काहीच फायदा नाही. पैसा, वेळ आणि आयुष्य सगळा वायाच जातंय. आठ दहा तासाची ड्युटी  करून घरी पोचायलाच एक दोन तास रोज वाया घालवायचे. रोजचे दोन तास जर का ट्राफिक मधेच वाया घालवायचे तर घरच्यांना, स्वताला आणि राष्ट्राला आपण वेळ केव्हा द्यायचा ? हरामखोर राजकीय पुढार्यांनी मदिरा आणि क्रिकेट हि दोन व्यसनं भारतीयांना लावलीच आहेत.मतदान आणि त्यातही बोगस मतदान हेच तेवढा घटनादत्त कर्तव्य यांना माहित आहे.हातात असलेली सत्तास्थाने आणि त्यातून येणारी जबाबदारी यांच्या गावीही नाही. आजू बाजूला काय चालला आहे ते तुम्ही सगळे बघत आहातच.मंत्रिमंडळ सोडून बाकी कुठल्याही यंत्रणेचा विस्तार यांनी केलाच नाही.अखंड भारत वर्षातल्या मध्यमवर्गाची नाळ  त्याच्या मुळ  गावापासून  तोडून यांना त्या वर्गाला वेठीलाच धरायचा आहे.एकदा का हा वर्ग त्याच्या मुल गावातून बेदखल झाला कि यांची वतनं  सांभाळायला लागणारे हुजरे आपोआप तयार होतील. या वर्गा पुढे  'पे पकेज' या गोंडस शब्दात पैसे फेकले कि हे 'ग्राम प्री' ची रेस बघायला मोकळे. यांचा 'फोर्स'  ए  वन आहेच !

याच आठवड्यातली  गोष्ट आहे, एका माध्यम  समूहाने जवळपास साडे तीन हजार गाड्या राज्य परिवहन महामंडळा कडून भाड्याने घेतल्या आणि 'पुण्या' सारख्या महानगराची परिवहन व्यवस्था एका दिवसाकरता का असेना निव्वळ सार्वजनिक स्वरुपात चालवायचा प्रयत्न केला. या मागची भूमिका कितीही महत्वाची असली तरीही, एक बस कमी इथ पासून साडे तीन हजार बसगाड्या कमी  पडे पर्यंतचा या शहराचा प्रवास म्हणजे राज्य कर्त्यांची आणि 'चेंगट- सहनशील' जनतेची पापं च म्हणावी लागतील.सरकारी शौचालय असो  किंवा रुग्णालय प्रत्येक   ठिकाणाची वाट  लागली आहे.आणि हे सुधारण्या  ऐवजी आपण 'खाजगी' या विषारी आणि विखारी संकल्पनेकडे आकृष्ठ होतो आहोत.
परकीय गुंतवणूक आली तरच देशाची प्रगती होईल हा फार भाबडा विचार आहे. गुणवत्ता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती आहे म्हणूनच गुंतवणूक देशात येईल आणि ज्या प्रमाणात  गुंतवणूक येईल त्याच प्रमाणात नफा हि देश बाहेर घेवून जाईल.या बिकट वाटेवर चालण्या ऐवजी आपली हक्काची पाऊल वाट  तयार करणं सहज शक्य आहे.
सर्व सरकारी खात्यामाधली नोकरभरती पूर्ण करा. आवश्यक त्या सेवांचा कालानुरूप विस्तार करा. पोलीस, सैन्य अशा संरक्षण आणि संवेदनशील खात्यांमध्ये आवश्यक असणारी जास्तीची पदे निर्माण करा.उत्तम व्यवस्थापन करा. समित्या, शिफारसी, अहवाल, चर्चा, निदर्शना यावर वेळ आणि पैसा वाया घालवण्याऐवजी 
कायद्याच्या पळवाटा आणि प्रासंगिक गरजा लक्षात घेवून नियमावली ठरवली तर उत्तम काम होईल.उदा. पुण्या मध्ये जितके वाहन निर्मितीचे कारखाने आहेत त्यांना एका ठराविक निर्मिती  संख्येमागे एक बसगाडी या अनुषंगाने सार्वजनिक   हातभार लावणं बंधनकारक करा.वर्षातून एखादा 'बस डे' करण्या ऐवजी महिन्यातून  एक / दोन दिवस या स्वरुपात बदल घडला तर तो खर्या  अर्थाने उपयुक्त होईल.' सासरची माणसं   
चांगली नाहीत म्हणून मुलीला माहेरी बोलावणं हा  कायमस्वरूपी उपाय होवू शकत नाही. एक तर स्थळ निवडण्यापूर्वी काळजी केली पाहिजे.किंवा कसाही स्थळ आला तरी   परिस्थितीत  उदात्त  बदल घडवत स्वाभिमानान जगणं आणि लढण तिला शिकवला पाहिजे.
लोकांना आवश्यक तेवढा पैसा राबून मिळाला तर त्यांना चोरी करायची इछाच उरणार नाही.  उपाशी आणि हतबल लोकांसमोर भांडफोड करून / नुसत्याच पत्रकार परिषदा आणि आरोप प्रत्यारोप करून काहीच साध्य  नाही.

त्यांचा मुळ  प्रश्न भुकेचा आणि आत्मसन्मानाचा आहे.किमान संधी आणि आवश्यक पैसा या शिवाय भ्रष्टाचार दूर करणं अशक्य आहे.विचारातून क्रांती होते पण त्यासाठी समाजाच डोकं स्थिर लागतं .देश विचारवंतांचा असता तर मुळात हि वेळ आलीच नसती,  इति श्री गुरुप्रसाद उवाच भरतखंडे भ्रष्टाचार रूपेण  मुलभूत समस्यास्य विवेचनं  समाप्त : ! 

रांजणगाव,
१२.२३ रात्रौ
२-१०-२०१२.