बर्याच दिवसानंतर
"नवीन काय लिहिलास ?" इथ पासून "खूप छान लिहितोस...पुस्तक काढ एखाध...." असे प्रश्न आणि प्रतिक्रिया या मध्ये बरेच महिने काही लिखाणाच झाला नाहीं माझ्याकडून. डोक्यात विचार येतातच...पण ते शब्दात व्यक्त करायला लागणारा निवांतपणा आणि आतून येणारा 'ओघ' यांचं समीकरण जुळल्याशिवाय मनासारख लिखाण होत नाहीं. आज तो योग आलाय..अजूनही मी काय लिहायचा हे ठरवला नाहीये...अपेक्षांचं ओझं (इतरांच्या..! ) घेवून लिखाण करण्याची हि माझी पहिलीच वेळ...दत्ता गुरूंच्या कृपेने निभाव लागेल, बघूया.
मधला काळ हा खूप मनस्तापाचा आणि स्थित्यंतराचा गेला...आधी नंदुरबार मधून शिरूर ला येणं...तिथे रुळे पर्यंत पुन्हा रांजणगाव ला बदली होणं..नवीन मानसं ...नव्या स्वरूपाच काम.. नवीन लोकांची कामाची पद्धत आणि स्वभाव... सगळंच मला नं आवडणारा...आणि तितकाच खटकणार.....!!! आत्महत्या...नर्मदा परिक्रमा.., जगण्याच नेमका ध्येय काय याबाबतचा संभ्रम..घरातली जबाबदारी...मोजक्या पण खंबीर माणसांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा...आणि सर्वात महत्वाचा माझ्यावरचा विश्वास...हे सगळं एका बाजूला..आणि दुसर्या बाजूला मनस्वी जगण्याची ओढ असलेला आणि कोणत्याही परीस्थित तडजोड करण्यास इच्छुक नसलेला मी...!!!
"तू शांत रहा..कुणाला काही भडकून बोलू नकोस...वाद घालू नकोस..होय म्हणून सोडून दे. आपलं नुकसान होत नाहीं ऐकून घेतला म्हणून." ती. आई.चा मला नेहमीचा सल्ला...आणि माझा त्र्याला नित्याचा विरोध...ठरलेला. प्रश्न ऐकून घेण्याचा नाहीं तर...जो ऐकवतोय त्या व्यक्तीची कुवत..आणि त्या पाठी मागची मिजास..यांचा आहे... 'माझा म्हणणं बरोबर आणि उद्देश स्वच्छ असताना मी का म्हणून ऐकून घेवू ??? निव्वळ ती व्यक्ती माझ्या वरच्या पदावर आहे म्हणून...अजिबात नाहीं...! शाळेत, पुस्तकात,..प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या भाषणात ऐकलेले व्यक्तिमत्वांचे आदर्श हे...आचरणात आणण्यासाठी नजरेसमोर ठेवू का...माझ्या मार्च मध्ये होणार्या 'रेटिंग' साठी आणि ' बोनस' साठी गुंडाळून ठेवू ??? कुणी कितीही वेड्यात काढला तरी...माझे आदर्श आणि तत्व मी .सोडत नाहीं..सोडणार नाहीं..या मूळेच बहुदा..मनस्ताप आणि वाद हे मला कायम साथ देत असतात..असो. कुणीतरी बरोबर असलेला चांगला असता..!!!
बँकेत 'कॅश कौन्तर' वर बसायला लागल्या पासून... ग्राहक कडून येणाऱ्या पैशान मध्ये कमी जास्त होण्याचे प्रसंग नित्याचेच..देवाच्या कृपेने आजपर्यंत जादा आलेले पैसे..जेव्हा ते कुणाकडून आलेत हे लक्षात येतं त्यावेळी 'खिशात' घालायचा मोह मला झालेला नाहीं.हि इमानदारी दाखवताना..पदरमोड करून काही पैसे संध्याकाळी भरावे हि लागले आहेत..! माझ्याकडून नजरचुकीने जास्त गेलेले पैसे प्रामाणिकपणे परत आणून देणारे लोक हि भेटले ! इतक्या पैश्यामध्ये वावरल्यावर पैश्याचा मोह- आकर्षण अजिबात उरला नाहीये..!
पैसा - अधिकार या पेक्षा विश्वासावर जास्त काम होतं ! हातात धनादेश नसताना..यंत्रणेत नोंद होण्या आधी सहा लाखांची रोकड हातात देणं असो..बारा-तेरा लाखांची रोकड मोजण्या आधी..निव्वळ जमा पावतीवरचा आकडा बघून ती खात्यात जमा करणं, शे- पाचशे ची एखाद दुसरी नोट..किंवा दहाचं अक्खा पुडकं जादा असेल तेव्हा ग्राहकाला परत करणं..या प्रत्येकवेळी मजा आली...कारण तिथे विश्वास होता - कधी माझा इतरांवर..कधी इतरांचा माझ्यावर !! माझ्या रक्तातला संस्कार अशावेळी मदतीला आला...येतोय....!
वर्ष-सव्वा वर्षात एकाही ग्राहकाला एकही विमा 'पोलीसी' मी विकू शकलो नसताना...त्या क्षेत्रातले 'बाप' लोक मला म्हणाले- "याचा चेहरा खूप विश्वासू वाटतो. हा मितभाषी आहे.(माझ्या आईचा आणि जवळच्या लोकांचा याला तीव्र आक्षेप आहे !) लोकांना ते आवडतं.तुझ्या जागी दुसरा माणूस गेला ग्राहकाकडे तर दहा हजार घेवून येईल...तू गेलास तर तो लाख पण देईल..." मी हसावं का रडावं...???? प्रत्यक्षात मी एकही सेवा ग्राहकाला 'विकली' नाहीं...कारण 'गळ्यात मारणं' हा माझा स्वभाव नाहीं...ते मला जमतही नाहीं..! हे ज्यांना माहिती आहे..आणि जे मला खूप चांगलं ओळखतात त्यांनीच अशा 'मार्मिक' प्रतिक्रिया देणं म्हणजे..किती विरोधाभास.
मुळात बँक चालवताना तुम्ही विमा आणि 'म्युटुअल फंड' विकताच कशासाठी ? म्हणे यांच्या शाखा फायद्यात येण्यासाठी..हे विकाव लागता...! अरे तुम्ही दुधाच्या धंद्यात आहात..आणि दुधात पाणी मिसळून विकला तरीही तुम्ही जर का नुक्सानीतच राहता मग गणित चुकतंय तूमचा. रिझर्व बँकेने कशा साठी तुम्हाला ग्रामीण भागात विस्तार करायला सांगितलाय आणि तुम्ही काय करताय...? हातगाडीवर भाजी विकणाऱ्या माणसाचे आणि एखाद्या दुकानाच्या मालकाचे पैसे जर का तुम्ही एकच 'प्लान' मध्ये गुंतवायला लागलात..तर कसा चालेल? एकजण त्यांचा कष्टाचा पैसा तुम्हाला विश्वासाने देतो आणि तुम्ही तुमच्या कमिशन साठी त्याला अडकवता...दुसर्याकडे भरपूर 'काळा' पैसा आहे तो हि तुम्ही असाच 'पांढरा' करता...जो जास्त 'धंदा' करेल त्यांचा उदो उदो..आणि नंतर 'कंपनीच्या पैशाने' ओल्या पार्ट्या झोडता....हा पैसा शेवटीग्राहकांच्या खिशातूनच आणता नं ? काय गरज आहे याची ? म्हणे पाच पाच हजाराचं खात उघडा आमच्या बँकेत...कमी पैसे ठेवलेत तर दंड द्यावा लागेल..का म्हणून ??सरकारला धाड भरली आहे का ?रोटी-कपडा मकान नाहीं तर नाहीं..बँकेत खाता तरी द्या प्रत्येक नागरिकाला..जितकी जास्त लोक यंत्रणेचा जितक्या लवकर अविभाज्य भाग बनतील तितक्या लवकर काळे धंदे लक्षात येतील आणि उपाय करता येईल. पण मला शंका आहे या सगळ्यांना स्वच्छ कारभार नकोच आहे..यांना एकूणच जितकी होईल तितकी अव्यवस्था आणि बजबजपुरी वाढवायची आहे.
नुकताच नजरेसमोर घडलेला किस्सा..एका माणसाची नवी कोरी गाडी (दुचाकी) चोरीला गेली...परत मिळालीच नाहीं...गाडीला नंबर पण मिळालेला नाहीं..विमा कंपनी अशा गाडीचे पैसे देत नाहीं..म्हणून हा माणूस..एका वजनदार माणसाला घेवून पुणे 'आर टी ओ' कडे गेला.. नजरेसमोर नसलेल्या गाडीचं 'पासिंग' झाला..नंबर मिळाला...त्या माणसाने विमा कंपनीकडून रक्कम मिळवली...आणि आता 'सेकंड हान्ड' गाडी (सी बी झेड ) तो वापरतोय रुबाबात एकदम !!!
काय चाललंय नक्की ???
याला प्रगती आणि सुधारणा म्हणायची का ?
माझ्या मित्राने एकदा सांगितला होतं...'तुझा एखाद दिवस 'डोंबिवली फास्ट' मधला माधव आपटे होणार आहे...!! ' काय व्हायचा ते होवू दे..सहान करायचं नाहीं !
पुण्यातल्या स्वारगेट पासून शिवाजी नगर आणि पुणे स्टेशन पासून स्वारगेट किंवा शिवाजीनगर ला रात्री अपरात्री रिक्षाने यायचा म्हणजे दिव्यच ! आत्यंतिक गुर्मी आणि मनाला येतील ते दर..मला पटत नाहीं. माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवलाय...'चालत जायचं. सरळ. जो पर्यंत माझ्या विचारात आणि पायात जोर आहे तो पर्यंत यांचे लुटमारीचे मनसुबे उधळून लावायचे.' परवाच पुणे स्टेशन ते शिवाजी नगर रात्री दोन वाजता चालत गेलो...तीन किलोमीटरच्या अंतराला ऐंशी रुपये मी का देवू ?? आपण शरण जातो म्हणून लोकं गैरफायदा घेतात.
आपली जडण घडणच चुकीच्या प्रकारे होते असं वाटतं केव्हा केव्हा..म्हणजे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात...पालिकेची, महापालिकेची कर्तव्ये....या खाली दिवाबत्ती करणे पाणी पुरवठा करणे ..इ.इ दिलेला असता. महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणा आता लोकांसाठी राबत नाहीं...इथे प्रत्येक ठिकाणी वशिलेबाजी आणि नेत्यांची मस्ती चालते. निवडून कोन येणार हे आता फक्त या देशाचे नागरिक ठरवत नाहीत..बांगलादेशी घुसखोर आणि महाराष्ट्रात 'परप्रांतीय' भय्ये याचं सहकार्य ज्या पक्षाला मिळेल तो गट सत्तेत येतो. प्रत्येक उमेदवारी 'विकली आणि विकत घेतली जाते' इ उपयोगाची माहिती आपण का नाहीं देत शाळेपासून..?
एखाद्या सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांच्या घरातली पत्रे..इ. गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. पण ती पत्रे / लेख / धडे निवडणुकीतली गणिते डोळ्यासमोर ठेवून समाविष्ट / वगळली जातात...यातही राजकारण चालता..हे आपण मुलांना सांगताच नाहीं...एखाद्या प्रभागात..चारचाकी धुण्यायेव्हाधा पाणी का येता...आणि दुसर्या प्रभागात...पाणी भरण्यासाठी एव्हढी रांग का लागते हे मुलांना का नाहीं शिकवत आपण ?
असं केल्याने दोन गोष्टी साध्य होतील...नवीन पिढी लवकर निगार गट्टा होईल...आदर्श गिरवत वेळ घालवून मग जीवनाच्या लाचारीशी जुळवून घेताना जाणारा वेळ -पैसा आणि मनस्ताप कमी होईल.
आणि चुकून माकून कुणाच्या जाणिवा जागृत झाल्याच तर काहीतरी चांगला घडेल.
अजून अभ्यासक्रमाच धोरण माझ्या अखत्यारीत नाहीं .... होतं होईल तो विचार करायचा.. आणि विचाराशी प्रामाणिक आणि सुसंगत कृती करायची. निराश मूळीच व्हायचा नाहीं..लढत राहायचं...'कणा' कविता आणि 'कोलंबसाच गर्वगीत' आठवत बिनधास्त जगायचं.. "बस..आता शांत बिलकुल राहायचा नाहीं...पलटून वार करायचा.." हे पुन्हा एकदा ठरवला तेव्हापासून...मी हळू हळू पूर्ववत व्हायला लागलो. शांत राहणं, संयम वगैरे गोष्टींचा लोक गैरफायदा घेतात..तुम्हाला व्हायचा तो त्रास होतोच..तो जर असाही होणार आणि तसाही होणार मग निदान आपणही प्रत्युत्तर दिलं याचा समाधान का मिळवू नये ? माझी 'मात्रा' एकदम लागू पडली..! मलाही आणि त्यानाही..
लिखाण-वाचन करणं ..दरम्यानच्या काळात खूप अशक्य झाल. नंदुरबारच्या तुलनेत बर्याच सोयी सुविधा..आणि वेळ हाताशी असताना असं झालं याचा शल्य आहे ...पुण्या- मुंबईतल्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी...रत्नागिरी ला जाण या निमित्याने प्रवास मात्रं होतोय आजकाल...
स्वातंत्र्याचे उरलेले शेवटचे काही महिने...वर्ष..(देव जाणे ! ) मस्त धमाल करत जगतोय.परवा तर झोपताना खूप सारे विचार आले डोक्यात...त्यातले काळजीचे विचार एका पिशवीत भरले..ती पिशवी सरळ बाजूला ठेवली...उठल्यावर बघू असं म्हणत ! मस्त झोप लागली. येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आहे.'ती' जर का 'जाणीव' घेवून आली तर मजा येईल.
बरीच स्वप्नं बाकी आहेत...ती प्रत्यक्षात कशी आणायची याचीही चाचपणी करतोय...'पुस्तकाचा' विचार तर आहेच आहे..पण सहज स्फुरलेल्या एखाद्या कवितेचा समाधान बर्याच काळात अनुभवला नाहीये, आकाश केव्हा भरून येता बघायचा....
Thursday, January 26, 2012
Saturday, January 21, 2012
प्रिय बाबा,
प्रिय बाबा,
आत्ता चालत येताना एका माणसाच्या डोळ्यात बघितला, आणि तुमची प्रकर्षाने आठवन आली.
थेट तुम्हाला कडकडून मिठी मरावी असा वाटला. ३१ ऑक्टोबर २००५ ला तुम्ही अचानक गेल्यापासून..
खरतर, पूर्वी सारखी घराची ओढ़ राहिली नाहीं. आईचा आणि तुमचं स्वभाव हा मुळात पूर्ण वेगळा.
काळजी करणारी आई घरी असली तरी, ज्याच्या जीवावर बिनधास्तपणे मोकाट जगात आलो तो आधार-(बाप) घरी नाहीं ,
याची जाणीवच उरलेला जीवन निस्स:त्व करून टाकते. तुमच्या जाण्यानंतर सगळाच बदलला...आपली आर्थिक परिस्थिती आणि
मानसिक स्थिती दोन्ही. फरक इतकाच कि तुलनेने आपला कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्थिर झाला असला तरी, मानसिक समाधान जवळपास नाहीसच झाला आहे.
आईचा जीव आणि आशा माझ्यात गुंतलेली.. आणि मी..अनुभवतोय तुमचं विचारविश्व...
४० वर्षांपूर्वी २०० रुपये घेवून घरा बाहेर पडताना पासून ते लोकांच्या नजरेत स्थिर होई पर्यंतच !
तुमच्या इच्छेखातर दोन्हीकडच्या घरातल्यांशी मिळून मिसळून वागण्याबोलण्याचा प्रयत्न करतो...
पण, माझं पटतं ते इतरांशीच !! तोंड देखला भेटणं बोलणं झाला तरी त्यांच्या बडेजावामध्ये मन रमत नाहीं.
आपल्या गावातल्या कुठल्याही घरात किंवा जोश्यांच्या कुटुंबात जमलेले ऋणानुबंध या रक्ताच्या नात्यांमध्ये जमणं आणि रुजवणं मला अशक्य वाटता निदान माझ्या बाजूने !
आज एक काम धड झाला नाहीं कि जेव्हा माझी चिडचिड होते, त्या वेळी इतकी वर्ष परिस्थितीशी झगडा देतानाही तुमची नं ढळलेली शांतता आणि स्ठीतीप्रद्न्यता आठवतेच.
फरक इतकाच कि, तुम्ही तुमच्या बाबांच्या जीवावर घर सोडून निघू शकलात....आज माझं तसं नाहीये...!
तुम्ही असतात तर, नोकरी सोडून, मनात आल्याक्षणी नर्मदा किंवा हिमालय जवळ केला असता...एकच भरवशावर कि बाकी जगणे मला मुर्खात काढला तरी फक्त माझ्या
बाबांच्या डोळ्यात मुलाच्या ओढीचा आणि आवडीचा अभिमान तरळला असता. आणि अशीर्वादासह छुपा पाठींबा हि !!
खाडिलकर म्हणून दुनियेत वावरताना मान-अपमानांचा संघर्ष जेव्हा जेव्हा अपरिहार्य होतो तेव्हा माझ्या रक्तात असलेली स्वाभिमानाची उर्मी क्षणात जागी होते.
पिढीजात आलेली कडवट स्पष्टवक्ती जीभ, असे वार करते कि समोरचा आणि मी स्वतः दोन्ही घायाळ होतो. गप्पा बसणं हा माझं स्वभाव नव्हे.
तरीही तुमच्या जाण्यापासून मी तो निमूट स्वीकारला. काही जणांच्या मते मी 'सुधारलोय' काही जणांच्या मते माझा आत्मविश्वास कमी झालाय,
काही जणांच्या तर्का नुसार मीच अबोल झालोय इ इ .
असो तुम्हाला नक्की कळेलच कि मी का गप्पं आहे ते..! वाद घालण्याची माझी सर्वात हक्काची जागा नाहीशी झाल्या पासून बोलणं / व्यक्त होणा हा निव्वळ सोपस्कार होऊन राहिला आहे. कुणी आपल्याला समजून घेवो नं घेवो.. त्यांचा विचार करण्यासारखा कुणी उरलाय असं वाटतच नाहीं.
तूमचा जिभेवरचा संयम आणि शांत पणे चांगला / वाईट ऐकून घ्यायची ताकत ठरवूनही माझ्या अंगी मी आणू शकलो नाहीं. जिभेवर आणि वाणी वर संयम ठेवला कि शांततेचा भंग आपोआप होतो.
आज नोकरी करताना तूमचा व्यवसायच करायचा हा निर्णय १००% पटतो. त्याही प्रांतात उडी मारायची आहे पण...आणि थोड्या कालावधी नंतर.
एखादा लहान मुलगा जेव्हा पटकन 'बाबा' म्हणून हक मारतो आणि बाबांना बिलगतो त्या वेळी एकीकडे खूप पोरका वाटता, आणि दुसरी कडे आठवतं ते कुवारबाव फाट्यापासून, घरापर्यंत तुमच्या खांद्यावर बसून रात्री अपरात्री येणं! दातांचा तुमच्या पावलागणिक होणारं "टक टक टक" आवाज , आणि दोन्ही हातानी तुम्ही उचललेले बोजे.!!! एस टी, ट्रक , सायकल आणि चालत तुमच्याबरोबर केलेला प्रवास. दादरचा पूल उतरताना आठवतं ते तुमच्या बरोबर माझा पहिल्यांदा मुंबईत येणं ! तुम्ही दादरच्या पुलावर भर गर्दीत मला विचारला होतात, "लेका आत्ता हरवलास तर घरी कसा येशील ??" या अचाट प्रश्नावर मी आत्त्याच घर येईपर्यंत धरलेला मौन !
आज इतरांची लाडावलेली मुला बघितली कि मला तूमचा आभिमान वाटतो कि तुम्ही असले फालतू लाड कधीही केले नाहीत. बिनधास्तपणे स्वताला झोकून देणं (संस्कार आणि मर्यादा नं विसरता),
आणि धाडसाने पुढे जाण शिकवणारे तुम्ही आणि स्वताच्या तंद्रीत चालणारा मी..दोघांच अस्तित्व मला पदोपदी जाणवत.
वपुंचा 'सखी' पुस्तक आणि त्यातली एक कथा मी मुद्दाम परत परत वाचतो...वपू नि रेखाटलेला 'बाप' = डी. जी. वाचताना मला तुम्हीच दिसता.
सगळ्यात महत्वाच, तूमचा घर सोडून बाहेर पडण्याचा निर्णय खरच खूप धाडसी पण मस्त होता !!
त्या मूळे मी माझ्या माणसांमध्ये राहू शकलो. मला माझा गाव मिळाला !!
माझा घरी जाण आणि राहाण दोन्ही पुष्कळ कमी झाला असला तरी, आई चि खरच कमाल आहे.
काम ती म्हणूनच करत्येपुरेशा सोयी सुविधा नसणाऱ्या आपल्या घरात, भूतकाळाच्या असंख्य आठवणी घेवून, एकाकी राहण हे फार कठीण! पण ती आजही त्याच जिद्दीने झगडते आहे.
घरात आणि घराबाहेर नियमित दिसणारी, भिंतीवर सरपटणारी जनावर, आणि घरादारावरून फिरणाऱ्या काही अतृप्त माणसांच्या आणि लोभी आप्तांच्या नजरेला समोर जात ती तिचं कर्तव्य त्याच शांततेने पार पाडत आहे. नानाविध विचारांनी अस्वस्थ होऊन आराम खुर्चीत रात्र भर जागत बसताना तिला किती त्रास होत असेल पण या बद्दल कधीही चकार शब्द नाहीं!
तिच्या मनात कदाचित एकच शंका असावी, "बाबांच्या विचारांचं आकर्षण आणि स्वभावाची ओढ असलेला हा मुलगा बाबांच्या पावलावर पूल टाकून पुढे जायचा विचार करतोय...पण त्याला कसा समजाऊ कि तेवढी इच्छा शक्ती आणि लाधान्याच सामर्थ्य मिळवायची तुझी ओढ रास्त असली तरी, आता हे सगळं सहन करायची आणि बघायची माझी ताकद उरली नाहीये....."
तिचा वाढलेला हळवेपणा कमालीचा त्रास दायक होतो...आणि मग वाटता कि आत्ता बाबा हवे होते, "चल चालू लाग, पाऊल पुढे टाकल्यावर रडत पाठी यायचा नाहीं "
असं सांगायला......
ओ "बा बा" !!!!
असं म्हणून पूर्वी सारखीच तुमच्या कपातली अर्धी कॉफी..(आवडली तर सगळीच)...प्यायचि आहे......
मिष्ट गोड कॉफ्फी...तुम्ही गेल्यापासून गेली ती कायमचीच....
जीवनच सपक झालय असं म्हटलात तरी हरकत नाहीं..
लोकांना आई वडिलांमध्ये देव दिसतो, मला दत्तागुरूनच्या तसबिरीकडे बघितल्यावर,
तुम्ही दिसता...!!!
फक्त तुमचाच ,
येडा पांडुरंग !!!!
नंदुरबार.
१०.उ रात्रौ.
११-०५-२०११

Subscribe to:
Posts (Atom)