Sunday, June 30, 2013


डॉ. राधिका राघव  सामंत. 
"मनु  आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !" 
"आपण एशती ने जाऊया  आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत  नव्हतं  मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं  वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या  मनाची घालमेल होत असताना 
या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं  खरच समंजस असतात. मुल समजूतदार आहेत याचाच खूप आनंद अहे,'माई' "
"राधिका माझ्या लेकीच्या वयाची. पूर्वी राहायला आमच्या शेजारीच होति. आता दवाखाना असतो. अधे मध्ये वेळ मिळाला कि फेरी मारते. दोघींचा हि मन मोकळा होता.सावंतांची मुलगी आंतरजातीय विवाह करून सामंताकडे आलेलि. 
सुरवाती सुरवातीला मला 'काकी' म्हणयचि तेवढाच बाकी उच्चार वगैरे स्पष्ट, नंतर तीही मला  'माई' म्हणायला  लागलि  . नवरा  बायको दोघाही डॉक्टर ! पण मनाने  एकदम साधी माणसं. 
"

: डॉ. राधिका राघव सामंत.
मनुला विचारलं,"मनु आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !"
तर म्हणे "आपण एशती ने जाऊया आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत नव्हतं मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या मनाची घालमेल होत असताना या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं खरच समंजस असतात.माझी मुलगी समजूतदार आहे याचाच जास्त आनंद वाटतो, 'माई' . "
मनूची आई म्हणजे राधिका फार पूर्वी आमच्या शेजारी राहायला होति. आता अधे मध्ये भेटायला येते केव्हा तरी . मन मोकळ होतं दोघींचा हि. माझ्या लेकीच्याच वयाची आहे. कष्टाळू आहे लग्न होऊन नुकता संसार सुरु झाला तेव्हा आमच्या वाड्यात राह्यला होति. आंतरजातीय लग्न करून
सावंतांच्या घरातून 'सामंतांच्या घरात आलि आहे हे सांगितल्या शिवाय कळणार नाही असा 'जोडा' दिसत होता. दोघही डॉक्टर !
मला वाड्यात बाकी सगळे 'माई' म्हणायचे हीच एकटी 'काकी' म्हणायची. तेवढी एक गोष्ट सोडली तर विशेष काही खटकण्या जोगं नव्हताच.वाड्यातच तिचा दवाखाना सुरु झाला आणि मग हळू हळू खरी ओळख होत गेलि. आधी मला 'काकी' म्हणणारी राधिका मग 'माई' केव्हा म्हणायला लागली तेच कळलं नाही
'मनुच्या' वेळी राधिका माहेरी गेली आणि राघव ची ओळख झाली.
"एकदम बोल घेवड्या स्वभावाचा माणूस, हुशार आणि माणुसकी अस्लेला ! रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला राघव हा संपूर्ण महाविद्यालयात चर्चेचा विषय असयचा. मुलींमध्ये तर तो प्रसिद्ध होत. एकाच वर्गात अस्साल्यामुळे, प्रात्यक्षिक, अभ्यास, सहली, ग्रंथालय इ कारणाने आमचा सहवास वाढला आणि आम्ही उभयता एकमेक्न्च्या प्रेमात पडलो ! यथावकाश लग्न झालं  आणि आम्ही वाड्यात राहायला आलो" असा राधिका कडून ऐकला होता. 
"वाचन, गप्पा, आणि गाड्या यांची अत्यंत आवड असणारा हुशार, निर्व्यसनी माणूस. प्रश्नांच्या सरबत्तीने रुग्ण हैराण होत. एकच गोष्ट तीन तीनदा विचारल्यावर दुसरा काय होणार ? तेवढी एक बाजू सोडली तर माणूस एकदम छान! पण उपयोग नाही. दिवसभरात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावत गेलि. मनूच्या जन्मानंतर राधिका आली आणि मग कुठे गाडी रुळावर आली . तिने मात्र छान नाव कमावलं ! अख्या गावातून रुग्ण यायला लागले. ती नसेल तर रुग्ण दुखणं अंगावर काढत पण इतर डॉक्टरांकडे जात नसत.नंतर मग त्यांनी सदनिका घेतलि. तिकडे राहायला गेलि. पण दवाखाना सुरूच अहे. अधे मध्ये येते वेळात वेळ काढून मला भेटायला !"
"माई, माणूस प्रगती करतो म्हणजे नेमका काय करतो ? स्वतःवर गरजे पेक्षा जास्त जबाबदार्या लादून घेण आणि त्या पेलतां येण म्हणजे प्रगती का ? मग त्यात समाधानाचा हि विचार झाला पाहिजे ना?"
"मागच्या वेळेला सदनिकेचा व्यवहार झाल्यावर आली तेव्हा सहज म्हणाली, म्हटला "हो ग पोरी !" बरोबर आहे तुझा !"
"माई,लग्नानंतर च पहिला वर्ष कसा मजेत गेलं . नंतर संसार किती कठीण आहे ते कळायला लागलं . सुरवातीला सगळ्यांनी मदत केली कौतुक केलं. आता काळात नकळत आमची इतरांशी तुलना होत रहते.  राघव च घरच्या मदतीवर अवलंबून राहणं पटत नाही मला ! आम्ही दोघाही डॉक्टर असताना सासू सासार्यांना आमचा भार वाहवा लागू नये अशी इच्छा अहे. राघव चा दवाखाना निट चालत नाही . समुपदेशकाची नोकरी ज्यामध्ये त्याचा हातखंडा  आहे तशी काही संधी त्याने शोधावी म्हटलं तर ते 'नाही ' म्हणतो . इकडे माझाच संसार मी कसा बस चालवते आहे . जमेल तसा माझ्या परीने, सासू सासरे , नातेवाईक , आई बाबा आणि भावंड यांचा आदरातिथ्य, कौतुक करत अहे. तरीही 'बाबांची' अपेक्षा आहे कि "मोठी बहिण म्हणून तू इतर दोन बहिणींचा लग्नाचा खर्च केला पहिजेस. "! एकीकडे मुलाचा दवाखाना चालत नाही याच्या पेक्षा सुनेचा दवाखाना चांगला चालतो म्हणून सासू सारे नाराज आहेत . रुग्णाचा / रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला आणि त्यांनी "डॉक्टर बाई आहेत का ? " असा विचारल्यावर राघवच्या कपाळावर पडणारी आठी ! "हि अवस्था तुझी तू करून घेतली आहेस ! काय बघितलास याच्यात ? हेच का ते प्रेम ? " हा आई बाबांकडून  होणारा उद्धार . गाडीवरून  दवाखान्यात येवून प्रवासाने आणि दग्दगिने  शरीर दमत 'माई' "
"शरीरापेक्षा मन नाजूक आहे .एक वेळ औषधाने ठणका थांबेल, वेदना कमी होईल पण दुखाची जाणीव आणि भय नाही काढून टाकता येत ! बाटलीत बंद केलेल्या विषारी सापासारखा आपण मुळ  प्रश्न कैद करून ठेवतो. पण प्रश्न कैद केला म्हणून त्याची दाहकता आपल्याला लगेच त्रास देत नाही इतकच. बाटलीच्या आत दाबून ठेवलेला विषारी फुत्कारांच  अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. मनपटलावर आशा निराशेचा लपंडाव सतत सुरु असतो . प्रारब्ध, वास्तव आणि मन या तिन्हीचा परिणाम हा शरीराला भोगावा लागतो . शरीराला होणार्या वेदनेला, दुक्खाला आपण जर का समजुतीची फुंकर मारली तर तेच दुक्ख हे शरीरासाठी शक्तिस्थान होतं ! "
"आज नेमकी घडी इथेच विस्कटली आहे. मुला पालकांचा ऐकत नाहीत, पालक मुलांचा ऐकत नाहीत, नवरा बायकोचा ऐकत नाही, बायको नवऱ्याच ऐकत नाही, कुणी कुणाच ऐकायचं नाही असच जणू ठरवलंय ! 'माझा कुणी ऐकत नाही, माझ्या मताला किंमत नाही' याची जाणीव मनाला होणा हा एक आघात अहे. आणि असा आघात सतत होत राहिला तर त्याचा परिणाम हा मन;शक्तीवर आधी होईल आणि तद्नंतर त्याचे परिणाम हे शरीरावर दिसत राहतील. आपण जी काही धावपळ करतो, ती ज्यांच्या साठी करतो त्या 'आपल्या' माणसांनाच त्याची जाणीव नसणं हेच बरेचदा आपल्या दुक्खाच कारण असतं. निव्वळ कष्ट करून शरीर दमेल पण आजारी पडणार नाही, आणि समजा पडलच तरी विश्रांतीने ते बरं  होइल.मानसिक कष्टाचं  काय ? "
"म्हणूनच मी माझ्या दवाखान्यात फार मोजकं  बोलते, दवाखान्यातला बहुतांश वेळ मी डॉक्टर न राहता 'श्रोता' होते. 'डॉक्टर पण माझं ऐकतात म्हणजे मी कुणीतरी अहे. माझ्या मताला कुणीतरी मान देतं', अशा भावनेतून होणारा मनाचा निचरा हेच खरं औषध असतं !बर्याचशा आजारांच मुळ हे असा जाणीवपूर्वक स्वताकडे केलेल्या दुर्लाक्शातच असत, ते कधी आपण स्वतः करत असतो तरी आपल्या आजूबाजूची लोक करत असतात . "
"मला समजून घेणारं  कुणी भेटलं नाही . राघव हा अपवाद, म्हणून मी आज त्याच्या बरोबर आहे. मी जिद्द हरलेली नाही . आज मी दवाखान्यात असताना मुलांना भरवण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट राघव मनापासून करतो . याचा मला आनंद आहेच पण त्याच्यासारख्या माणसाचं , ज्याचा अभ्यास माझ्यापेक्षा अधिक आहे, चिकित्सा अचूक आहे हे असं व्हावं हे मलाच खटकत. दवाखाना चालत नाही, याचा दोष मी त्याला अजिबात देत नाही . हीच वेळ / हेच कारण असेल कि ज्याकरता त्याला माझी गरज लागेल, अशावेळी मी त्याच्यासोबत राहिलाच पाहिजे . भलेही आज लोकांच्या दृष्टीने मी त्याच्यापेक्षा यशस्वी असेन, पण माझ्या करता आज मला काही शंका आली / संकट आलं  तर तो माझ्याकरता इथे आहे हीच मोठी गोष्ट आहे! एक चांगला डॉक्टर होण्यापेक्षाही तो एक चांगला माणूस आहे हेच जास्ती महत्वाच आहे ."
"लग्नाचा निर्णय हा माझा होता, आज जे काही आहे त्याला मीही तितकीच जबाबदार आहे. माणसाला जगण्यासाठी प्रेम लागतं हे खरच, पण निव्वळ प्रेमात पडून संसार चालवण हे खूप जिकिरीच काम आहे. व्यवहाराचा तोल सांभाळता आला तर उत्तम. मुलांच्या शिक्षणाचा विचार करून हौशीने घेतलेली चारचाकी गाडी विकूया अस मी राघवला म्हटलं, तो तयार झाला माझ्यासाठी, मुलांसाठी पण  मुलं  समजून घेतील का ? का त्यांना वाईट वाटेल ? त्यांचा हिरमोड होईल असा वाटला होतं. पण 'माई' मनूच्या उत्तराने खरंच बरं  वाटलं ! याच वयात आलेला समजूतदार पणा  पुढच्या शंभर ठेचा वाचवतो. "


गुरुप्रसाद हरी खाडिलकर . 
रांजणगाव 
पहाटे  ३. १२ वा 
पुनर्लिखित. 
(मुळ  लिखाण रात्री १. १ मिनिटांनी नजरचुकीने पुसले गेले. )

'वर्तुळ'  ! 


पुण्याच्या आय एफ बी आय मध्ये प्रवेशा पासून सुरु झालेला प्रवास (कि फरफट ?), उद्या  संपणार ! पुण्यातून सुरु झालेला एक वर्तुळ उद्या पुण्यापासून पन्नास किलोमीटर वर पूर्ण होणार . नंदुरबार , शिरूर आणि मग रांजणगाव अशी त्रिस्थळी यात्रा आटपून नवा प्रवास 'सुसाट' सुरु  होणार ! दापोली सोडताना डोक्यात बर्याच कल्पनांचं वावटळ घोंघावत होत. कुठल्यातरी क्षणी त्या वादळाची दिशा अकल्पित पणे 'केरळ' च्या दिशेने वळली . वादळ घोंघावत शांत झाल, त्या वेळी माझं अस्तित्व 'पालापाचोल्याहून' वेगळा उरला नव्हत !  'पुढे काय ?' हा प्रश्न माझं बोट सोडायलाच तयार नव्हता. अशा वेळी नाईलाज म्हणून आलेली एक संधी स्विकारली… उत्तर मिळाल्याचा आनंद व्हायच्या आत 'चालू असलेला प्रशिक्षण' सोडून मी रस्त्यावर (अक्षरश:) आलो ! 'माझ्या कामापेक्षा माझ्या पोशाखाला महत्व देवून त्याचाच 'बभ्रा' करणाऱ्या लोकांबरोबर मला काम करायचा नाही या एकाच विचाराने  मी तिथून निघालो . (१  मला त्यांनी काढला नव्हतं, २. माझा पोशाख गबाळा / अस्वच्छ नव्हता . ३ अपेक्षित  पोशाखा  संबंधी कोणतीही सूचना मला तिथे पोचण्या आधी केली गेली नव्हती .). 
माझ्या 'भारतीय' पोशाखाला  'नावं' ठेवणार्यांच्या हातातल्या  'विदेशी' बनावटीच्या 'सिगरेटी  त्यांना चालत होत्या पण माझा पोशाख चालला नाही .   हा प्रकार मला पटला नाही. मी बाहेर पडलो . 
'शेकड्यांनी' (होय !!) दिलेल्या बँक आणि इतर आस्थापनांच्या प्रवेश प्रक्रिया मी माझ्या 'सुमार दर्जाच्या ' गणितामुळे 'पास' होऊ शकलो नाही . दुसरा मार्ग दिसत नसताना वर्तमान पत्रात आलेल्या 'एका चार महिन्यात नोकरी मिळवा ' या जाहिरातीला बळी पडलो आणि आय एफ बी आय पुणे इथे दाखल झालो . कोर्स चालू व्हायलाच दोन महिने गेले. पुढचे आठ महिने 'कोर्स' चालूच होता … ! नातेवाईक, मित्र, आणि घर कुहेही  जाणं जीवावर यायचं. 'मग कधी नोकरी ??' या प्रश्नाच  उत्तरच नसायचं ! दुश्काळात तेरावा महिना म्हणजे 'हातात पडलेल्या 'नेमणूक पत्रावरच नेमकं  माझचं  नाव चुकीचा छापलेला असल्यामुळे आणि एक महिना वाया गेला . 

शेवटी एकदा नेमणूक पत्र मिळालं ! मुंबई, रत्नागिरी ,सुरत आणि पुणे असा अपेक्षित ठिकाणांचा क्रम दिलेला असताना … माझी रवानगी थेट 'नंदुरबार' मुक्कामी केली होती ! पहिल्याच दिवशी बँकेत गेलो, काहीही काम न करता निव्वळ बाकड्यावर बसून सर्वांची ओळख परेड होऊन जेव्हा रात्री खोली वर परत आलो तेव्हा इतका दमायला झाल होतं कि बस्स ! गाढ झोपलो . तीन चार दिवसांनी बँकेपासून तीन चार किलोमीटर लांब अंतरावर  खोली भाड्याने घेतली . 
पहिल्या दोन दिवसातच मी झोपेत असताना चोर खोलीत फिरून माझे खिसे साफ करून, खिशातले देवाचे फोटो आणि इतर कपडे , पिशव्या बाहेर फेकून गेले हे सकाळी कळलं ! पहिल्या मजल्यावर 'लागतील तशा आणि लागतील तेवढ्या' बादल्या भरून न्यायच्या ! सकाळी आठ सव्वा आठ ला बाहेर पडायचा  आणि रात्री नऊ  दहा वाजेपर्यंत परत यायचा ! रविवारी धोबीघाट काढायचा  ! 'कागदावर बहुल आणि प्रत्यक्षात मारवाडी बहुल अस्सालेल्या या भागात सकाळी भजी, फाफडा, तिखट पोहे  इ  आणि  एरवीच्या जेवणात  कांदा आणि मिरची यांची सवय व्हायला लागली तो पर्यंत नंदुरबार सोडायची वेळ आली . सुरभी ची खिचडी, घी  बाजारातल्या गणपती देवाला जवळची 'कच्छी  दाबेली' , तिथलाच 'दही वडा' यांची आजही आठवण येते. 

नंदुरबार पासून काऊनटर क्रमांक एक आणि मी एकरूप झालो ! ती शाखा अशी नव्हतीच मुळी ! एक साधी चिंचोळी पट्टी  होती ज्यामध्ये एका रेषेत टेबल आणि खुर्च्या मांडून तिची 'बँक' केलेली होती ! एसी नव्हताच… पंखे होते पण कागदपत्रे उडतील म्हणून तेही बंदच ठेवावे लागायचे ! 'घामाघूम ' व्हायला व्हायचं ! विवेक, जितु, तुषार, आणि विजू  यांच्या करामती आणि कसरती मुळे  मजा यायची .दिवसातून दोन वेळा चालत 'क्लिअररिंग हाउस ' ला जावं  लागायचं… बाजारातली माणसांची गर्दी , गाढवं , गुरं , बकऱ्या, हातगाड्या,गाड्या  आणि 'भाजून ' काढणार ऊन , या सगळ्यातून ख्न्द्याला लावलेली पिशवी 
घेवून सुसाट धावत सुटायचं - रोज तेही दोन वेळा- बारा वाजून पंधरा मिनिटांनी आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी ! दुपारच्या फेरीत 'गाणी ऐकणा, एखादि डुलकी काढणं, आणि नंतर  'टी टी ' करून  एखाद्यावेळी वाटे तल्याच  वाचनालयातून पुस्तक बदलून आणणे इ कामे करावी लागत ! 

नंदुरबार ला वैतागलो होतो आणि आता इथून सुटका होणारच नाही असं लक्षात  आल तितक्यात 'निव्वळ' नशिबाने  ध्यानी मनी नसताना 'शिरूर' ला बदली मिळाली .
 शिरूर ला आलो याचा आनंद फार काळ टिकला नाही. तिथल्या शाखेतल्या  माणसांची (प्रमुख), वागण्याबोलण्याची पद्धत आणि 'विमा' विकण्याची केली जाणारी सक्ती या गोष्टी मला न पटणार्या होत्या ! तिथल्या प्रमुखाच्या या मुजोरीचा 'बंदोबस्त' करण्याचा एक छोटा प्रयत्न मी तिथल्या फक्त दीड महिन्याच्या कालखंडात केला . 'ग्राहकाला' दुरुत्तरे करणारा हा प्रमुख 'माझ्या' 'खेळी' ने नामोहरम झाला ! त्याला त्याच ग्राहकाच्या मागे माघार घेत फिरावं  लागलं. मी शांतपणे सगळं पाहत होतो !

निव्वळ एक दिवसाकरता म्हणून मला 'रांजणगाव' ला पाठवला गेलं ! कोणताही पूर्वानुभव नसताना पहिल्याच दिवशी एकशे दहा ' क्याश एन्ट्री'  केल्या ! 
दुसर्या दिवशी परत निघालो . वाटेत असतानाच उप व्यवस्थापकांनी बोलावून घेतलं ! "तुझं काम आवडलं तू इथेच थांब आजपासून … वरिष्ठांशी बोलणं झालाय ! " त्या दिवसापासून उद्या पर्यंत या शाखेत आहे ! सह कर्मचारयांबरोबर  यथेच्छ भांडण, मस्करी , मजा  अनुभवली . सर्व प्रकारच्या ग्राहकांशी, त्यांच्या माणसांशी बोलण्यात , भेटण्यात  एक प्रकारचा आपलेपणा आहे . हा आपलेपणा  आणि आदर असे पर्यंत इथून बाजूला होण्यात मजा आहे . हा एक भाग  आणि दुसरा म्हणजे वाढत चाललेली अंतर्गत अरेरावी आणि मुस्कटदाबी . ज्यांनी कधी बँकेत काम केला नाही अशा माणसाच्या हातात हे जर का शाखेची सूत्रे देवू लागले तर अशा माणसाला वरिष्ठ मानून  काम करणं हे हाताखालच्या लोकांसाठी अवघड होत.  अशा व्यक्तींच्या अज्ञानाचा  आणि त्यांच्या अंदाधुंद  मनमानीचा मी मिळेल तेव्हा अधिकृत विरोध नोंदवला . माझ्या कृतीला  एकदा यश मिळालं . शाखा व्यवस्थापक बदलला. नको तिथे नियमावर  बोट ठेवून पदाच्या जोरावर डरकाळ्या फोडणाऱ्या लोकांना 'त्यांची' जागा दाखवून देण्यात मी हयगय केली नाही . माझा स्पष्ट विरोध, आणि योग्य आक्रमण ज्यांना पटला त्या माणसांनी मला मदतही केली . सुदैवाने मला दुसरी संधी मिळाली . 

'राजीनामा' दिल्यानंतर  मला अनेकांचे खरे चेहरे कळले . राजीनामा दिल्यावर झालेल्या भेटीत 'यांनी' आज पर्यंत   जाणीव पूर्वक  दुर्लक्षित केलेले 'गुण' कळले . त्या कौतुका पाठोपाठ 'कशाला जातोस ? जाऊ नकोस !! अशी विनवणी … आणि या विनंतीला मी पूर्ण सौजन्याने 'नकार'  दिल्यावर सुरु झालेला 'सुडाच' राजकारण ! हे सगळा पचवणं अवघड गेलं ! नऊ ते सहाच्या पलीकडे जाऊन समोरच्या माणसाला त्याच  स्वतः च आयुष्य आहे,  'मत आहे'  हा विचार हि समजून न घेणाऱ्या  या माणसाना 'वरिष्ठ' कसा म्हणायच ? ''तोंडाने' व्यावसायिकतेच्या गप्पा मारायच्या आणि स्वतः  असं  सूडबुद्धीने वागायच! 
'मला लेखी ताकीद देण्याचा केविलवाणा  प्रयत्न त्यांनी केला … मी  पुन्हा 'हल्ला ' केला ! त्यांच्या वर्मावर आणि कुकर्मावर बोट ठेवला ! बास … माझ काम झाल … माझा मार्ग मोकळा झाला ! 

'केरळ ' मध्ये मी पाला पाचोळा होऊन जमिनीशी एकरूप झालो होतो म्हणून मी हि हिम्मत करू शकलो .  

एकीकडे वरिष्ठांचा हा अनुभव येत असताना … ग्राहकांनी आणि सहकारयानी  उदंड प्रेम दिला . 'साहेब कशाला जाता ? या कि  इकडच … !
इथपासून ' सेटिंग लावून देवू का ? इकडचा पोष्टिंग देतो तुम्हाला … इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या . !!
गाडीवरून पडल्यावर तर सहकाररयानी  आणि ग्राहकांनी (सुहृदांनी ) केलेल्या मदतीला तर तोडच नाही ! 

योगायोग असा कि पहिल्या ठिकाणी मी ज्या पोशाखात 'रस्त्यावर' आलो तसाच पोशाख घालून मी इथला 'राजीनामा ' दिला !!

आणि एक वर्तुळ पूर्ण झाला . 
यावेळी माझ्याकडे संधी आहे आणि माझी स्वताची गाडीही आहे . 

श्री  महागणपती कृपा !

गुरुप्रसाद हरी खाडिलकर. 
रांजणगाव. 
२ ९ / ० ६ / २ ० १ ३ . 
संध्याकाळी ६. ० १वा . 

Friday, March 8, 2013



"Dear Sir,

Few years back, I started my career as an officer. I made few mistakes, no doubt. Professional life and routine work processes were something which I found boring initially. It was a time when I was living two different life's altogether.One with my physical presence in office and other on emotional plane. During first few day's some one asked me to to fill the pay-in-slip for the customer. such a small task one may fill, but while doing that little thing I became emotional, eyes full with tears.Tears about my condition,it was really painful experience for me. I realized at that moment, 'life has got changed, now I have become Clerk ! Yes an ordinary clerk in reputed organisation. With dream of grabbing any 'Post' with 'higher' responsibility, more powers and needless to say a 'hefty pay package' was crushed already I was no option but to fill the 'pay in slip' as dictated by others. Realization of having 'no self value in the 'eyes of others' broke me emotionally at that moment.   But with the co-operation of other team mates and your support I learnt many things. I don't know how successful I was, but for sure I saw you as an idol/ role model.

I trusted you at my best possible capacity thinking that  'you' understand the reality and treat others with humanity. All my colleagues were looking at you and treating you as a 'boss' or 'super boss', I never saw towards you with such a limited approach. Instead I respected you as a good human being who understands the 'next' person and tries to become a good individual at every moment. You did one personal favor on me and made my transfer possible.Without your initiative it was just impossible, I knew. You took me along, I was happy with the change.

With change in  profile, priorities changed I agree. In changing scenario distance between me and you grown slowly and steadily. It was not that 'belief' in you got changed, but kind of 'response' from your end got changed dramatically. I respect the difference of opinion, but I can never accept 'difference' in treatment. As you already know 'keeping myself in limelight' is something I don't like to do. I was and will never attempt to show a lavish goody goody picture  and win praises from you. instead I will prefer to get 'scolding' from you for my  lapses / wrong doing if any. To do artificial show casing of my work/ my ability is something  I will never prefer. Instead I believed 'yardstick' of customer satisfaction and 'reality' at workplace should judge my performance. Performance is something different from 'proving' your performance. Tendulkar or any player for that matter, only plays his game. He never keeps it's records.But cricket  fan knows  the 'player' by his game / talent first, bookish record comes latter.( I know I am no where in front of Tendulkar.) Fake reporting and fraudulent documentation can raise the 'name' and 'fame' of oneself for a shorter period of time, but it will not fulfill the purpose of accessing one's capacity from organisation's point of view in a larger perspective. As it is made up of many individuals ranging from peon to managing director. Each ones contribution to increase the profitability is necessary. 'delivering great results by forcing customers or co-staff may give unbelievable numbers for a shorter span of time, but eventually this  'greed' will kill the 'name' and 'stature' of the organisation.One can borrow the money but when it comes to the 'trust' you need the persons with integrity and principles. There are 'n' number of such silent and unheard ground level workers which are contributing to presence of 'organisation', there little contribution gets neglected and they suffer on professional and personal front. Without there silent  presence, 'roaring' business earners can not deliver. In order to grow high in the sky tree must spread it's roots deep in to the ground, without this support it will collapse at any times.

As a experience leader you may have different take on this subject but I am penning it for some other reason.
Earlier I used to believe that you always take 'your' own decision, and 'order' us accordingly. But sorry to say, for last couple of months I am finding that you are believing in 'what is shown' to you. The certain individuals which are 'over' ambitious and 'smart' enough to take advantage of your 'good'  nature and having direct access to you are 'taking you away from the reality. and influencing your decisions.' I know I am too small to say all this, but can't resist. I don't want to gain anything out of it, I am happy with the little what I have.

One may say that 'these things happen in all organisations...why are you becoming so emotional?" My simple answer to this logic is that, without emotions, you can not become a good human being. And when it comes to 'service' industry 'being human' is absolutely necessary.

We do have enough of  'life' waiting for us which is beyond annual ratings, professional achievements, and to enjoy every fraction of it, 'self' of every individual must be 'free' from any 'bitterness' which is  percolating in to each one's heart from such 'unhealthy' competition. Happiness is something which one must experience and share with all. You can not judge 'individual's' happiness/ 'performance of individual' when he is / was happy by any MIS for that you need to live the moment.

I writing this with great expectation and untimely intuition that you will read this unofficial, off the record letter and will definitely take note of my feelings.

Best Regards.
Manik.

------------------------------------------------------------------------------------------------------------

He went to meet Mr. Rohit Khanna with typed letter in his hand. He entered the cabin, and he realized that it takes great deal of courage to say upfront, "Yes, we are going wrong somewhere, and we have to correct it as early as possible."












Thursday, February 28, 2013

उर्जा-



उर्जा-

'स्व'त :च्या अस्तित्वाची जाणीव करून आपल्या अंगभूत  क्षमतेवर आधी  स्वताला आणि  मग जगाला  विश्वास ठेवायला संप्रेरित करणारी  गोष्ट म्हणजे उर्जा. या उर्जेच अस्तित्व प्रत्येकाला जाणवत असत. या उर्जेचा स्त्रोत  मात्र व्यक्तीनुरूप भिन्न असतो. तो दृश्य,अदृश्य,तात्कालिक, काल्पनिक,वास्तविक असा काहीही  असू शकतो. या स्त्रोता पर्यंत घेवून जाणारी मनोवस्था हि व्यक्तीसापेक्ष आहे. 'आहे ते सगळं उत्तम आहे'किंवा 'आहे ते सगळा उत्तम होईल'  असं मानून वाटचाल करणारी माणसं ज्यांना आपण  आशावादी म्हणतो त्यांच्या दृष्टीने अपेक्षित भविष्यकालीन बदल हे त्यांचं उर्जास्थान असतं. त्यांना अपेक्षित बदल भविष्यात होईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणारी हर एक गोष्ट हि अशा उर्जेचा स्वाभाविक 'उगम्स्त्रोत' असते. या उलट आपण ज्यांना 'निराशावादी' माणसं  म्हणून नाकं मुरडतो त्यांच्या लेखी 'अपेक्षित आणि आवश्यक असणारा स्थायी स्वरूपाचा बदल होणं  सद्यस्थितीत जेव्हा पूर्ण पणे अशक्य आहे' या गोष्टीची जाणीव करून देणारा हर एक प्रसंग अथवा घटना हि त्यांना जगाप्रती / जीवनाप्रती असणारी 'हतबलता'/ 'विवशता'/'अगतिकता' अधोरेखित करत असते. व अशा 'निराशेचे' / दुक्खाचे मुळ (नकारात्मक उर्जेचा स्त्रोत ! ) त्यांचा दृष्टीकोन  'नकारात्मक' करत असते. अशा माणसाचे अंतिम ध्येय पक्के  असेल आणि त्याप्रती त्याचा निश्चय दृढ असेल तर 'निराशावादी माणूसही उत्तुंग भरारी मारू शकतो ! नकारत्मक बाजूंची एकदा का  'कल्पना' आली कि त्याचं भय वाटत नाही ! ज्या क्षणी भय संपतं तीथुन पुढे  'निराशावादी' माणसाचा आत्मशोध सुरु होतो. या शोधामध्ये 'टोकाची निराशा' हीच अद्भुत उर्जा म्हणून काम करते !
'आशा आणि निराशा मिळून जीवन घडत असते. निव्वळ आशावादी राहून आयुष्य जगता येइलच असं नाही ! निराशेची जाणीव तीव्रतेने होणं हे हि  अत्यंत आवश्यक आहे, कारण निराश होणारा माणूस आधी केव्हा न केव्हा आशावादी असतोच, ज्याक्षणी त्याचा 'कल्पित' आशावादावरून कडेलोट होतो त्या क्षणी तो निराशेच्या गर्तेत जातो. कोसळणाऱ्या माणसालाच 'गुरुत्विय  बलाची आणि आकाश ठेंगण करणाऱ्या उंचीची महती कळते ! एखाद्या गोष्टीकडे बघताना निव्वळ नफा / तोटा
या पलीकडे जाऊन त्यामुळे होणारे परिणाम, त्यामागचा हेतू, स्थूल आणि सूक्ष्म कारणे, ईश्वरी नियमन यांचाही विचार व्हायला हवा ! चूक आणि बरोबर हि पट्टी तोकडी अहे. आजचं बरोबर उद्या चूक वाटू शकतं  आणि आजच चूक उद्या बरोबर सिद्ध होऊ शकतं ते सर्वस्वी 'काळाच्या' हातात आहे ! 
एखादा प्रश्न आणि त्याला दिलं  जाणारं उत्तर हे प्रश्न विचारणाऱ्या माणसाबरोबर बदलत जात ! प्रत्येक उत्तराचं  समर्थन करणारे असंख्य युक्तिवाद  आपलंच  मन आपल्याबरोबर करत असतं त्या त्या क्षणी आपणही 'हेच' बरोबर म्हणून आपली पाठ थोपटत असतो ! विविध भारती वर केव्हातरी लागलेलं  आणि चुकून ऐकलेला गाणं आपलं  मन प्रसन्न करतं, गाणं आवडला म्हणून ते भ्रमणध्वनी मध्ये साठवून बरोबर ठेवला आणि हव त्या वेळी ऐकला तर 'पहिला' आनंद काही केल्या होत नाही ! खर तर गाणं ऐकणं शब्दश: आपल्या हातात असताना असं होतं. 'गाण्याचे बोल, चाल, आवाज  आणि संगीत जरी तेच असेल तरीही आपल्या मनाची अवस्था बदलत असते, त्यामुळे असं  होता. 'गाणं' मी हवा तेव्हा ऐकू शकतो  हा फाजील विश्वास त्या गाण्याचा आनंद घालवून टाकतो, 'आशेच हि तसच आहे !' अनपेक्षित घटनांमध्ये खूप जास्त ताकद असते. अशा घटना माणसाला आणि त्याच्या विश्वासाला  मुळापासून हादरवून टाकतात. 'पर्याय' आला कि नकळत  'तुलना' होते. माणूस त्यातल्यात्यात 'सुरक्षित' वाट निवडतो. आणि पर्यायाच नसेल तर वाटेत येईल त्या दगड गोट्याला, खड्याला तुडवत माणूस आपली पायवाट तयार करतो. अशावेळी,'दुसरा पर्याय उरलाच नाहीये या निराशेची जाणीवच त्याला पुढे मार्गक्रमण करायला प्रवृत्त करते."नेमका काय चाललाय हे कळत नाही " असा ज्यावेळी आपण म्हणतो त्याच वेळी आपण अंतर्मुख होऊन विचार करतो… मग हळू हळू बर्याच गोष्टी कळायला लागतात !

उर्जा हि प्रत्येक गोष्टीत असते, पण तिचं  अस्तित्व सर्वाना जाणवेलच असं नाही. तो भाग अनुभुतिचा ! कधी "खूप खाल्लं पण भूक भागलीच नाही / चटकन भूक लागली" असं  वाटत, तर कधी "दिवसभर इतकं काम होतं कि भूक लागलेली कळलीच नहि" असा म्हणतो विज्ञानाचे निकष लावले तर इतकि 'उर्जा'शरीराला मिळाली' आणि 'इतकी खर्च झाली' असं गणित मांडाव लागेल। 'कॅलरिचा' हिशोब जुळला तरी 'समाधान' मिळेलच असा नहि, आणि मनाला  समाधान मिळून येणारी प्रस्संनता हि आपोआप व्यक्त होणारी बाब आहे त्या साठी 'वैज्ञानिक' ठोकताळे नकोत.रोज सकाळी एकाच साबण अंगाला लावून  अंघोळ केली तरी रोज वाटणारा तजेला निरनिराळा असतो. लहानपणी 'सकाळच्या' शाळेत जाण्यासाठी म्हणून बाबांनी जबर्दस्तीने घातलेली 'अंघोळ' त्यावेळी नकोशी वाटली तरी  आज 'आठवल्यावर' परत असा कुणीतरी कडेवर उचलून घेवुन, थेट 'हर् गंगे SSSS  भागीरथी SSSSS !!!! " म्हणत अंगावर पाणी ओतावं असं  वाटतं ! 
त्या वयात अंगावरून निथळून गेलेलं पाणी आजही मनाला हर्षभरित करतं !  

उर्जा हि प्रत्येकाच्या आजूबाजूला आणि प्रत्येकात दडलेली आहेच तिचा शोध लागणं आणि सत्कार्याकरता उपयोग होणं  महत्वाचं. उर्जा हि कधीही एकटी येत नाही,ती तिची इतर  रूपे (गती,स्थिती) सोबत घेवून येते, या उर्जेला उर्ध्व /अधो गती देणं हे काम संस्कारांचं आणि अंगभूत वृत्तीचं ! योग्य काय अयोग्य काय हि तार्किकता कालानुरूप विकसित होत जाते. 'बालपण' संपलं  आणि 'मी' पणाची  जाणीव झाली कि, 'आत्मकेंद्री' विचार सुरु होतो. हि स्वाभाविक क्रिया अहे. 'मी' जसा आहे 'तसाच' लोकांना दिसणं आणि त्यांनी स्वीकारणं  हे झालं स्वीकृत बालपण. 'मला जसं हवं तसा माझं आयुष्य मी घडवू शकतो, लोकांना मी माझी दाखल घ्यायला लावीन . हे आहे स्वाभाविक 'तारुण्य', 'लोकांना' मी जसा अभिप्रेत आहे तसा होण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं  हा 'गृहस्थाश्रम, आणि "मी' हे काही करू शकेन असा अजिबात वाटला नव्हतं  पण झालं !असा वाटत असतानाच  'मी' अमुक तमुक होऊ शकलो असतो पण झालो नाही किंवा होऊ शकलो नाही याची बोच लागणं हे झालं हतबल वार्धक्य !!!

'नाळ' वेगळी झाल्यावर फोडलेल्या पहिल्या 'टाहो' पासून घेतलेल्या अंतिम श्वासापर्यंत चा प्रवास ज्या विश्वासावर प्रत्येक माणूस करतो 'तो'  विश्वास म्हणजेच जीवनाच्या जाणिवेची खरी  उर्जा .

गुरुप्रसाद हरी खाडिलकर. 
२८-०२-२०१३   
रांजणगाव 
मध्यरात्री २. ० वा !!!

Thursday, December 6, 2012

माधवी साने.

माधवी साने.
" मित्रा  एक लोचा झालाय.अरे आज सकाळी  'सीमा' घरी भांडून घर सोडून निघाली. संध्याकाळ पर्यंत पुण्यात येईल.मी उद्या पोचतोय सकाळी. पण .आजची रात्र ती कुठे थांबणार हा प्रश्न आहे..!"
"अजिबात काळजी करू नकोस. माधवी आहे घरी. तिला आमच्याकडे येवू दे.माधवीला फोन करायला सांग  तिला. तू आल्यावर बोलू बाकीचं, तू लवकर निघ मुंबईतून   "-मिलिंद.
"पुढचे चार- पाच  दिवस नुसती पळापळ. सीमा-सागर चं 'आळंदीला जावून लावलेला लग्न, आणि नंतर मुंबईत मित्राच्याच सदनिकेत केलेला  स्वागतसमारंभ पार पडे पर्यंत माझ्या डोक्याला नसतं  'टेन्शन' मुलीच्या घरच्यांनी पोलीस केस केलेली.मुलगी राहायला माझ्या घरी.ज्याच्या करता पळून आली तो  मुलगा हि माझाच मित्र ! दोन्ही घरच्यांचा राग  आणि संशय माझ्यावरच ! पण हे सगळं 'एन्जॉय' केला ते 'माधवी' नेच ! "
"अरे सीमाचा घर बाहेर पडल्यानंतर मला फोन आला ! मग काय, 'हाफ डे' टाकून घरी आले. खूप महत्वाच काम असल्यामुळे जाव लागतंय, उद्या परवाही बहुतेक रजेवरच असेन, असा सांगून बाहेर पडले आणि थेट घरी आले."
 "अगं 'माधवी' खूप मनस्ताप झाला मला. अति झालं  म्हणून बाहेर पडले शेवटी."
'सिमे जेवण तयार आहे. आपण जेवायला बसू आणि मग बोलू."
"अगं  नकोय मला..खरच..अजिबात इच्छा नाहीये.."
"हा हा हा..वा  वा  काय बाकी प्रेम ! म्हणे जेवणार नाही. आज ज्याच्या साठी जेवणार नाही म्हणते आहेस न उद्या लग्न  झाल्यावर त्यालाच सांगशील 'जेवायचं तर जेव ...माझं झालं. चल आवर  पट  पट, खूप कामं  बाकी आहेत.
सगळी खरेदी करायची आहे."
"तिथून पुढे अडीच दिवस आमच्या घरात नुसती 'लगीन घाई'. पहिल्या दिवशी खरेदी संपली नाही म्हणून पुन्हा दुसऱ्या  दिवशी  'लक्ष्मी रोड', 'तुळशी बाग' पालथी घालूनहि माधवीचा उत्साह काही ओसरेना.हि आणि हिच्या जोडीला तिच्या कॉलेज पासूनच्या मैत्रिणी,रात्रभर मेहंदीचा कोन घेवून..'वधु' च्या हाता-पायावर  'बारिक' नक्षीकाम..वधू झाल्यावर यांच्या  हातावर आणि दोन्ही पायांवर 'कोरीव' काम सुरूच.."
मध्ये उगाचच "हात लागेल हं इकडे तिकडे.अधांतरी ठेव .झोपू नकोस..खपली पडतेय असं  वाटलं तर त्यावर चहाचं पाणी घाल  मेहंदी कशी 'डार्क' झाली पाहिजे."
"ए माधवी तुला  आठवतं का गं ? आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदा 'मेहंदी' डे  साजरा झाला होता..त्या वेळी आपल्याच 'ग्रुप' ने मेहंदी काढली होती..!"
"अय्या..काय भारी दिवस होते रितू..!"
"तू तर सगळ्यात मजा केलीस..अगदी 'फस्ट' 'इयर' पासून 'कॉलेज  संपे पर्यंत..! फस्ट  इयर मध्ये आलीस तेव्हा फक्त पंजाबी ड्रेस होते तुझ्याकडे.कॉलेज संपताना..एकही पंजाबी ड्रेस नव्हता तुझ्याकडे.सगळ्या जीन्स,आणि टोप्स, कुर्ते.. "
"रितू आणि माहित्ये का गम्मत..सुरवातीला फक्त हिच्या पुस्तकात 'सभ्य' राहुल द्रविड चा फोटो होता.नंतर..कपाटावर 'टी' शर्ट  भिरकावून  नाचणाऱ्या 'उघड्या' गांगुलीचा फोटो लागला..नंतर नंतर होस्टेल मधल्या  हिच्या खोलीच्या भिंतीवर 
तीन फोटो सतत असायचे.'.सलमान', 'ऱ्हीत्तिक' आणि ' रॉजर फेडरर'...!"
"त्यात हिचा चेहरा एकदम सभ्य, त्यामुळे कुणाला संशयही नाही यायचा.! खूप हुशार आणि अभ्यासू मुलगी आहे 'माधवी साने' असाच समाज होता कॉलेज  मध्ये."
"हं, त्या बिचाऱ्या वाचमन ला सांगायची कि 'काका' जाताना या 'नोट्स' तेवढ्या द्या ना 'मिलिंद' ला..! त्याला बिचार्याला काय माहित 'हिच्या प्रेमाच्या नोट्स तो पोचवतोय  ! त्याकाळी काही मोबाईल नव्हते. होस्टेल च्या फोन वरच  फोन यायचे.त्यातहि हिच्या कुण्या भावाचा फोन यायचा ! एकदा रेक्टर नि उचलला..तर म्हणे मिलिंद बोलतोय..माधवीला बोलवा बर. त्यानि बरोबर ओळखला 'हिच्या' भावाचा आवाज  आणि त्याचा 'भाव'हि  !! 
"फस्ट इयर ला खरच तशी शांत होती..सेकंड इयर ला आपला ग्रुप जमला आणि  मग हिचे रंग दिसायला लागले. कधीही कुठल्याही गोष्टीचं  टेन्शन घ्यायचं नाही हा हिचा स्वभाव. बघावं  तेव्हा खिदळत असायची ! दुसर्यांची मस्करी करणं हा हिचा छंद च जणु !"-रितू.
'अगं  हो न, एकदा तर सेकंड इयर ला त्या 'मंदार' चा लायब्ररीच्या स्टेप्स वरच इंट्रो घेतला शहाणीने !"
"त्याच्या पुढे कहर म्हणजे हिची जर्नल्स कायम फस्ट इयर ची मुलं पूर्ण करून द्यायची..हिला काय मिलिंद कडून त्याची जर्नल्स मिळायची...हि तीच घायची आणि नव्या मुलांना द्यायची..!"
"व्हायवाच्या वेळी तर कहर व्हायचा..हि गंभीर चेहरा करून बसायची..थोडंस  बोलायची आणि शेजारच्या मुलाकडे बघायची..! प्रश्न विचारणारा पुढच्याला धरायचा- हि सुटायची.!"
"पण काहीही म्हणा समोरच्याला दुखावणं हा हेतू नसायचा..त्या मुळे तिचा खट्याळपणा लोभस व्हायचा.मजा यायची."
"अक्खा होस्टेल अभ्यासात बुडलेला असायचं तेव्हा हिला गाणी ऐकायची इच्छा व्हायची..रात्रभर जागून  अभ्यास थोडाच व्हायचा..पण हिच्या हातची 'चोरून' लावलेल्या हिटर वरची 'मेगी'  आणि नेस कॉफी  अप्रतिम लागायची..!"
"शहाणी आपल्यापेक्षा कमी अभ्यास करायची  आणि मार्क मात्र आपल्यापेक्षा जास्त ! "
"एरवी कधी वर्गात लक्ष नसायचं पण शिक्षकांचा 'कोण'  विश्वास कि हि खूप हुशार आणि सभ्य मुलगी आहे !"
"अर्ध्या वह्या तर नुसत्या कोर्याच असायच्या.."
"शेवटची पानं  तर बघण्याजोगी असायची..काही हि लिहिलेलं असायचा त्यावर..कशाचा कशाला अर्थ लागायचा नाही..मध्येच नक्षीकाम..त्यातसुधा 'एम' हे अक्षर हजारदा गिरवलेला..कुणी विचारला तर म्हणायची माझ्या नावच पहिला अक्षर आहे..म्हणून लिहिलंय.."
"शेवटच्या वर्षानंतर जगाला कळलं 'एम'' हे अक्षर कुणाच होता ते !!" 
"बघ बरं 'माधवी' सीमाच्या हातावरचं 'एस' हे अक्षर कुठे आहे ते? मेहंदी वाळली  आहे आता...!
"मी कशाला शोधू..सागर आहे कि..बघेल तो !"-माधवी.
लग्नाच्या दिवशी तर काही बोलून सोयच नाही.सकाळी सकाळी 'माधवी'ने कुणा 'ब्युटी शिअन ' ला बोलवून घेतलं.
"पुढचे दोन तीन तास मंदार तुम्ही कुणी इकडे येवू नका..सीमाचं 'ब्राइडल स्पेशल' फेशिअल करायचं आहे..तिचा मेक अप व्हायला तेवढा वेळ लागेल. तो पर्यंत तुम्ही जायची तयारी करा.गाडी पण सजवायची आहे.'
"ओ के . मालकीण बाई !"
"फौंडेशन हिच्या 'स्कीन' ला सूट  होईल असाच घ्या..लेटेस्ट हर्बल ब्रान्डच वापरा. 'आय ब्रो' निट करा.. मस्करा व्यवस्थित करा..डोळ्याभोवती अजिबात काळी वर्तुळं नकोत, दोन दिवसच जागरण फोटोत दिसायला नको. आय शाडो, आय लायनर.. काळजीपूर्वक लावा.डोळ्यात काजळ घाला.लिपस्टिकची शेड सौम्य राहू द्या .गालावर 'ब्लशर' लाऊन झालं  कि मग काजळाची 'तीट' काढा नाजुकशी 'नवरी'च्या गालावरच ! केशभूषा तिच्या आवडीनुसार करा..मोगर्याचे गजरे..उंची अत्तराची कुपी..हेअर पिना,परफ्युम  इ इ सगळं इथेच काढून ठेवलं आहे. तुम्ही सुरुवात करा..मी आलेच.."
"माधवी रांगोळी एकदम मस्तच ! कुणालाही खरं वाटणार नाही कि हि अचानक ठरलेल्या आणि पळून जाऊन होत असलेल्या लग्नाची तयारी आहे म्हणून !"
"मिलिंद आणि माधवी तुमच्या मुळे आमचं  लग्न इतक्या थाटात लागलं ! तुम्ही खूप आपुलकीने आमचं  लग्नकार्य केलं.पळून जाऊन लग्न करताना एवढे लाड खचितच कुणाचे होत असतील !"
वर्ष दोन वर्ष निघून गेली..परत एकदा सागर चा फोन .."मित्रा लोचा  झालाय .सीमा अचानक भांडून घरातून  निघाली आहे..!" 
"टेन्शन घेवू नको...असा त्याला उसनं अवसान आणून म्हणालो आणि जागेवर खाली बसलो..पुन्हा असंख्य  प्रश्न  नजरे समोर..! "
"सीमा घरून भांडून बाहेर पडली..हेच न? मला माहिती आहे ! ती इथेच येणार आहे !मी बघते काय करायचं ते. तू 'रीलाक्स" राहा."-माधवी.
बेल वाजली ! दरवाजा उघडायला मीच..दारात सीमा..या खेपेला गळ्यात मंगळसूत्र इतकाच बदल..!
माधवी वर कसलाच परिणाम नाही...मस्त आलं घालून केलेल्या चहाने तिने सीमाच स्वागत केलं. रात्रीच्या शो ची तिकीट बुक केली.
"माधवी प्रसंग काय आणि तुझ चाललय काय ? निवांत राहायचं म्हणजे किती ?ती आपली मैत्रीण नवर्याशी भांडून घर सोडून आली आहे  आणि  तू तिला सिनेमाला घेवून निघाली आहेस ?"
"हो. तू फक्त बरोबर ये...मी बघते बाकीच..!"
पोपकोर्न खायला म्हणून मध्यंतराला उठलो.हातातली 'नेस कॅफे' संपली..मध्यंतर संपला..तरी माधवी काही चित्रपटगृहात जायला तयार नाही.
"मिलिंद..चाल आपण निघूया..सीमा तू बस सिनेमाला..हा येईल नंतर..!"
"अगं झालं तरी काय ?"
"काही नाही! "
"राहू दे सिनेमा  मी पण येते तुमच्या बरोबर..!"
"ओ के. मी गाडी घेवून येतो तुम्ही व्हा पुढे मग."
"मिलिंद..त्या सर्कल जवळ गाडी थांबवा..! सीमा उतर खाली तू पण."
"मी प्रत्येक गोष्ट निवांत घेते..असा तुम्ही म्हणता ! मला सांगा, इतक्या गांभीर्याने जगून तुम्ही असा वेगळ काय मिळवला आहे ? आदळ  आपट  करून, त्रागा करून काही फायदा आहे का ?
आधी आई वडिलांशी भांडून बाहेर पडलीस..त्यावेळी सावरायला सागर होता..! आज त्याच्याशीही भांडलीस..पुन्हा घरा  बाहेर पडलीस..का ?साध उत्तर- 'आहे' त्यात तू समाधानी नाहीस.आहे तिथे राहून परिस्थिती बदलणं तुला शक्य नाही असा म्हटल्यावर तू सोप्पा पर्याय निवडलास..पळ काढण्याचा..! आहे त्या गोष्टीत आनंद मानणारी मी कायम सुखात होते किंवा आहे असा नाही..पण एक नक्की कि माझ्या स्वभावामुळे मी इतरांच दुक्ख वाढवलं नाही.
मी समोर असणाऱ्या संकटाची चिंता कधीच करत नाही. चिंता करून समस्या सुटत नाही.उलट चिंता करून आपण समस्येवर मात करायची आपली उपजत शक्ती गमावून बसतो. तीच ताकद जर का..समस्येवर मार्ग शोधण्यात वापरली  तर उपाय सापडतो. जितके तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावाशी प्रामाणिक राहता तितका तुमचा प्रभाव वाढतो आणि  जितका तुम्ही दुसर्याच अनुकरण  करता तितके तुम्ही 'स्वत्वा' पासून दूर जाता-हतबल होता  इथूनच खरी फरफट चालू होते.
शुक्रवारी प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट हा कुठे न कुठे 'कमी' असतोच..तरीही लोक पुढचा चित्रपट पहिल्यापेक्षा चांगला असेल या अपेक्षेने गर्दी करतात..अपेक्षाभंग होत राहिला तरीही 'या पुढे काहीतरी चांगला आहे' या विश्वासावर हे वर्षानु वर्ष होत आलं आहे..! हा विश्वास आतून येण्यासाठी तुमचं मन  हे सजग आणि टवटवीत हवं !दुक्खालाही खिजवायची ताकद माझ्या हास्यात आहे.असा मी मानते. मी चिडले, वैतागले तर दुक्ख वाढणारच आहे..मग थोडस हसून मनाला आनंद का देवू नये ?
विचाराचा क्षण हा कृती करण्यापूर्वी येतो.चित्रपटगृहात येण्याआधी मी 'विचार' करायला हवा. चित्रपट सुरु झाल्यावर बाहेर जावसं  वाटणं  हा झाला  पलायनवाद ! संसाराचं  हि तेच आहे !!
मी मध्यंतरात बाहेर पडले नसते तर तुम्ही चित्रपट पूर्ण बघितला असता. बघताना तो आवडो किंवा न आवडो..तिथून पुढच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी त्या चित्रपटाचा विषय निघाल्यावर 'तो' चित्रपट आपण बघितला होता..असा स्मरेल त्या त्या वेळी फार समाधान जरी नाही मिळालं तरी आपण चित्रपट पहिला नाही हे शल्य तरी  तुमच्या मनाशी राहणार नाही. आता मी बाहेर पडले मागोमाग तुम्हीही आलात..माझ्या मुळे तुमचाही आनंद मी हिरावून घेतला.मला कितीही आवडला नाही आणि लोकांना आवडला तर ते तो चित्रपट  बघणारच. आणि लोकांना आवडला नाही पण मला आवडला तर मी हि बघणारच  !! माझ्या / लोकांच्या आवडीमुळे चित्रपटाची कथा बदलत नाही म्हणूनच तर सगळेजण तो बघायला जातात. जे चित्रपटाच तेच आपल्या आयुष्याच.. 'समाप्त' ची पाटी  दिसे पर्यंत खुर्ची सोडायची नाही..मजेत  बघत राहायचं..!"

गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
9960397773.
रांजणगाव,
७/१२/२०१२
पहाटे  ३.२० वा.



Sunday, December 2, 2012

जनाबाई पवार.

जनाबाई पवार.


"ओ पोराओ, उटा  पानि  भरु लागा..हौद भरा  आदी ...नंतर  पसरा पायजे  तर..ओ SS " चार  दिस झाले कामाला बी गेले नाय...ताब्येतच बरी नाय पान्याला बी रोग झालाय..
उगाच  टिपूर टिपूर येतया..मस्त सगळ्यांना पानी लागतया,  भराया  नगं  यास्नी  "ओ पोराओ  उटा  पटशिरी..उटले का ? आना  चला 'बालट्या' समद्या..घ्या भरून..पटा  पटा  ओतू लागा हौदात !
अगो रेस्मा  पार टिपका  नाय रहायला हौदात..भरू लाग जरा ! मी आन्घुल उराकते तवा पर्यंत..भरू लाग..!!! "
""आले मावशी, अवो उटा  कि..ह्या मावशे ला काय करावं  समजत नाय..रोजच्याला सक्काळ सक्काळ बडबड ..!!""- रेश्मा.
हौद भरला का ?  'बुचान' काढा म्हंजी पटा पटा भरतया, सोडा पियाच पानि  भरून घेते आदि ! कळशी विसळून घेते, शिळ पानी ओतून टाकते घमेल्यात, मग लुगडं धुवाय येतय त्यात. अरे 'नाम्देव' कळात का न्हाई?
अंघोळी उरका पटपटा  बाकीचे दोघे कुठाय? पानि  गेल्यावर जागे व्हता आत्ता भरू लागा कि ? नंतर नळा ला हात लाऊन  दिनार नाय  सांगून ठेवते "आय घाल्यानो" !!! "आल्ये आट कवा वाज्ले  ? आले दिना बाय थांबा संग जाऊ कामाला.
आल्ये कुलूप घालते पटकनी ...नळ निट  बंद करा बर का ? गळून देवू नका !!!
"मावशी पुरा दिवस खराब करते राव, सक्काळ सक्काळ जी बड्बड सुरु करते कि बस रे बस पुरा दिवस वाईट जातोया  मंग..त्या दिवशी तर आमाला प्याला भी पानी  दिला नाय..कितीदा मागित्ला  पन  नाय म्हणजे नाय एक घोट दिला नाय म्हातारीनं !! -"नामदेव आणि कंपनी !
"दिना आज  पोचू येळेत, नाश्ता भी मिळल आज..मस्त किती खाल्ला तरी चालतंय, नवीन सुपरवायजर का कोन  तो आलाय दिडशाना त्यास मस्त एकदाच सुनावलं तीत पासुर काय बोलत न्हाय मला.! सून नाय आली तुजी ? तरण्या पोरीस्नी काय रोग होतोया? यांनी काम करून आमास्नी खायला घालायचं  ते ह्याच मेल्या बसून र्हांतात !! त्या रेस्माच भी तेच..मेली दोघा नवरा बायको नुसती झोपून असतात..मला काय तवा भाडं मिळतय तोवर ठेवनार...नंतर लाव्ते हुसकावून !!! आयला आज लवकर आल्यावानी वाटतया ! कधी पोच्लो  कळालच न्हाय बग !" 
"दिसभर त्या बिस्किटाच्या कंपनीत येळ कसा भुर्कन  उडतोया...डायरेक सांच्याला कळतंय कि धा तास डूटी झाली ! लग्नाची  पोर घरात  हाय तोवर कामाला जावा लागनार, न्हंतर  बगू  जमेल तितके दिवस जायचं  नंतर द्याचं  सोडून काय तवा..!! जास्त नाय तरी सुदा  हुंडा म्हनू लेकीला  चार पाटल्या, जावयाला अंगटी, पोशाक  आणि लगीन लावायचा खर्च देवा लागेल..'हे' असताना सोन्याची तयारी हाय झाल्याली..आता फकस्त लगीन लाऊन दिला कि झाल !
समोरच्या पोरीबरोबर हिचा बी लगीन उरकला तर आणि बेस ! एका खर्चात दोन लग्न उरक्तील !! आमी बोलत नस्लो म्हनून काय  झालं ! शेवटाला दीर भावजय च हाय नात्यानं ! आनी  पोरी मस्त बोलून चालून असत्यात  मग आमी  कशा उगा नाक खुपसाया जायचं तेन्च्यात ! "

"मावशीच्या पोरीच्या लग्नात घरच्यावानी राबलो, खरकट बी उचललं पन मावशीने साद 'कौतुक' केला नाय त्याच..वरती ..अक्क्या वरदा समोर गुरकावून म्हन्तिया कशी ""माज्या घरावर नजर ठेवा पोरानो.."" अमी काय फारेकरी हाय होय ? येवड्या कमी वयात घरा भायेर र्हांतोय ,बारा चौदा  तास रात्रपाळी करून आल्यावर अंग मोडून निगत ...पानी  भरायचा  कंटाळा येतोया.. हि समजूनच घेत न्हाई...वय बगून गप बसावं  लागतंय !
" कपडे घालू नगा इथ, एकच दोरी हाय मला लागत्ये ती..काडून  घ्या कापड ..एक दोरी बांदा कि सोत्ता ..काय तवा..! सगळं काय मालक  देणार होय रे तुमाला !किती पगार घेता रे तुमी ? सात आट हजार  नक्की असेल न्हवं म्हणल ! हाय नवं ? मग बांदा  कि  दोरी  आनून !!
हि मला लागती..हाय का बगा जागा मला लुगडा वाळत घालायला ?" 
"जना मामी येती का कामाला ?" 
"न्हाय आता नाय येणार कामास्नी मी..पोरगी आल्येय चार दिस न्हाई आता..ये बस पाच मिंट  तुला चहा पाज्ते !"
"नगो जाती म्या  हुशीर झालाय अदिच..नंतर येती रातच्याला.."
"अगं  रेस्मा पाय मुऱगाळला न्हवं, आय आय गं दे जरा पाय दे इकडं..पोरगी असताना काय न्हाय झालं आनी आता  मेला काय  रोग झाला  नकळे "
"आट दीस झाले पाय काय उचलत नाय..येती का तू  ?"
"दिस भर मावशींची नुस्ती बड्बड चालू असतीया बघ..ठणका थांबत न्हाई, सहन भी होत न्हाई..रातच्याला भी आरडत  असत्यात.."
"आता घेऊन चाल्ले माझ्या संग तिला ! चांगल्या डाकटरला  दाकवून  आनते , ह्यांच्या गाडीत घालून घेवून जाते दुपारच्याला "
"'आय' आता निवांत र्हा माज्याकडा, आराम कर किती दिस अशे हाल  काढणार ? "
"इथ भी तेच का? चांगला आराम पडायला म्हनून इकड  आणला..तर गप  बसलं  आराम  केला त्ये न्हाइ. कशाला चौकशा करीत बसती ग तू ? जावय काय करतो ? दीर काय करतो ? कुठ जातो? त्याची बायको तशी का ? काय कराच  तुला ?? नुस्ती  बडबड कराची अन गावाला तमाशा...काय होऊन रहाले  तुला ? बाप असताना त्याच्यासंग भांडली, चुलत्या ला बोलून बोलून शेवटला वेगळ बिर्हाड कराया  लावलं. सोत्ताच असं काय केला तू जीवनात ? थोडा थोडा जे काय होत्त त्याचा भी लय गर्व तुला.नुसत्या चौकषा करायच्या आनी आग लावायची याची त्तेला, तेच्ही याला?  लोकास्नी काय कळत न्हाई ? हाय ते प्रेमानं  दिलं  दुसर्याला ते न्हाई, उगा चरफडत बसयाच ! प्याच  पानी  द्याचे भी सन्स्कार न्हाई केले तू माझ्यावर... आनी  माज्या  माग मस्त बोंबा मारत असते..'पूजाला'  अशी वाढवली नि तशी वाढवली.
हातात दोन पाटल्या काय घातल्या नि गावभर सांगत सुटलीस "पूजाच्या लग्नामुळ कर्जबाजारी झाले म्हणून म्हातार पणात  कामावर जाव लागतंय.."
"बा ची पुन्याई म्हनून  चुलत्यान  इतकं  होऊन सुदिक माझा लगीन तेच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवात लावून दिलं. पन अजुन्भी तू सुदरत  नाय...धा  फुटावर दुसर्या घरात रहातोय तरी बोलत न्हाई तेच्याशी तू ! गाव काय चांगलं  न्हाई म्हणीत तुला. तुला सोत्ताहून काय भी कराया  नग,  फुकटचा  मोटेपना पायजे फक्त!! मिरवायची हौस लय तुला! मिरवन्या  अगोदर ते आपल्याला शोभता का याचाभी इचार कर कि कवातरी..! उगा आदळआपट  करून भिक मागीत्ल्यावानी मान मागण्यात काई अर्त  हाय का ?पन  नाय.. तुज आपलं सुरूच..  आज पर्यंत गप हुते..पण आज माज्याच संसारात काडी टाकाय निगालीस म्हनून  सांगाव लागलं ! "

गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव,
9960397773
३/१२/१२
सकाळी ७-२७.वा.

Tuesday, November 27, 2012

बिल्वा इनामदार.

बिल्वा इनामदार.

'बिल्वा' ने खूप केला सगळ्यांसाठी ! सगळ्यांचा करून झाला आणि शेवटी नवऱ्याचा आजारपण निस्तरता निस्तरता गेली.मला खूप आधार होता बाई  तिचा ! आता घर म्हटलं  कि भांड्याला भांड लागायचंच  ! इनामदारांच्या वाड्यात तेव्हा आम्ही नुकते राहायला आलेलो. घरात पहिली सून येणार म्हणून अप्पा केवढे खुश होते. काकू ना  तर ते उघडपणे सांगायचे, "दुसर्याची पोर आपल्याघरी येणार आहे तिला आपल्या मुलीं सारखीच  वागणूक द्यायची ! सासुरवास करायचा मनात देखील आणू  नकोस." इनामदारांचा वाडा  तसा मोठा.पण  वाटणी  झाल्यावर मध्ये भिंत उभी राहिली ती कायमचीच. अप्पांच्या हिस्श्यात असलेल्या दोन खोल्यात आमचा नवा संसार सुरु झाला. यांचा शिक्षकी पेशा, हळू हळू आजू बाजूची मुलही शिकवणीला यायची.
त्या गरिबीच्या दिवसात खर्च मेले नव्हतेच. जे काही चार पैसे येतील त्यात जमवून घ्यायचा कि झाला. एखाद्या महिन्यात गणित चुकायचं भाड्याचे पैसे रखडायचे पण आधी अप्पांनी आणि अप्पांच्या पश्चात 'बिल्वाने' चुकूनही तगदा  लावला नाही ! 'बिल्वा' मस्करीत म्हणायची ताई बाई भिंतीवरचा महिना बदललात का नाही ? पण ते तितकाच. 

बाई  मोठी करारी.माहेरची गरिबी सोडून..सासरच्या दारिद्र्यात आलेली ! माहेरचा एकत्र कुटुंब. हिच्या आधीच्या दोन बहिणी आणि धाकटे बंधुराज ! त्या मुळे  निरनिराळी मतं, निरनिराळे स्वभाव आणि सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी लागणारा वचक या सर्वांची तिला चांगली जाण  आणि .जोडीला पुरेसा शिक्षण !
या शिदोरीवर तिने इनामदारांच्या घरात अल्पावधीत स्वताच स्थान निर्माण केला. घराच्या वाटणी नंतर अप्पांच्या वाट्याला आला ते फार अल्प  होता आणि जे मिळाला त्यातला बव्हंशी कोर्ट कचेऱ्या मध्ये संपला. हाताची शेतजमीन गेली..उपास मारीचेच  दिवस नशिबी होते..पण त्याच वेळी 'बिल्वा' ने  आणि थोरल्या शरद  ने नोकरी करून घर सावरलं !  नवरा हि तसाच कुटुंबाची जबाबदारी  अंगावर घेणारा होता हे मान्य पण अप्पाना शेवट पर्यंत कौतुक वाटला ते बिल्वाचच !!"दुसर्याच्या घरून येवून या मुलीने माझा संसार सावरला.घरातल्या स्वयपाका पासून गोठ्यातला शेण  उचलण्यापर्यंत सगळी काम हिने केली. हि चा हातभार लागतोय म्हणून माझी इतर चार मुलं  आज सुखात जगतायत...पोरीच खूप कौतुक वाटता !" अप्पानाच उर भरून यायचा. पुढे अप्पांच्या जाण्यानंतर घराची  सूत्र अलगदपणे 'बिल्वाच्याच' हातात आली. सासूबाई तशा नावालाच ! स्वताहून पुढे होऊन कुठली जबाबदारी अंगावर घेण हा मुळी त्यांचा स्वभावाच नव्हता. सतत कुणाच्या तरी आधाराने आणि दडपणाने जगायचं एवढाच त्यांना माहित. आधी अप्पांबरोबर  संसार करताना अप्पांचा ऐकत आल्या, पुढे मुलांच्या राज्यात  "बिल्वा वाक्यं प्रमाणाम.. !"या न्यायानं  चालल्या.

अकस्मात अप्पा गेले..आणि इनामदारांच्या वाद्याचा नूर हळू हळू बदलाल्याला लागला..बिल्वा शरद नोकरीत गुंतलेले..शेती कसायला कुणी नाही..गोठ्यातल्या गुरांना कसा सांभाळायचा ?  जीव गुंतलेला असला तरी  शक्य होत नव्हता...एका दिवशी बिल्वा ने आणि शरद ने निर्णय घेवून गोठा रिकामा केला...! वर्ष दोन वर्षात धाकटा भाऊ शिकून नोकरीला लागला..थोडी आर्थिक सुबत्ता यायला लागली..! मधल्या भावाने स्वताचा वेगळा मार्ग शोधला..तो कशातच अडकून पडला नाही..! या गोष्टीचा इतरांना होणारा मनस्ताप.. नवर्याच्या धाकट्या बहिणींची शिक्षण...अप्पांच्या जाण्याच दुक्ख  स्वताची नोकरी आणि  तान्ही मुला एवढ्या सर्व जबाबदार्या समर्थपणे पेलत तिने आणि शरद ने  त्या सगळ्यांची  लग्न कार्य हि केली !!!
हे सगळा करायला बिल्वा काही त्यावेळी चाळीशी पन्नाशी ला नव्हती किंवा तिला तसा सांगायलाही कुणी जात नव्हता. हे सगळा तिने कुटुंबा करता केलं ! 

तिच्या ह्या कर्तुत्वाची जाणीव घरात सर्वाना असल्यामुळे सगळे तिला खूप मानत.घरात नसलेली आर्थिक सुबत्ता आली...हळू हळू सुखाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पना बदलत गेल्या...!आधी जावा जावांमध्ये छुपा संघर्ष सुरु झाला..एकीकडे जावेच्या मुलांवर जीवापाड प्रेम त्यांचे लाड आणि त्याच वेळी कुठे तरी मोठ्यान्च्यातच चालणारं  असमंजसपणाच शीत युद्ध !!! मधला भाऊ आधीच  वेगळ्या वाटेने गेलेला.दोनही बहिणींना  चांगला सासर लाभलं ! एकत्र म्हणून कोण तर थोरला आणि धाकटा भाऊच ..पण नाही  उपाशी पोटी, गरिबीत एकत्र राहिलेला घर पुन्हा दुभंगला..! आणि एक भिंत !!

तिसर्या भावाचा मार्ग वेगळा असला तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बिल्वाने जेव्हा लागेल तेव्हा हरप्रकारे आधार दिला. 

एकीकडे मुलानी एकमेकांकडे  जाण.. येणा सुरूच ठेवला.मोठ्यांचे वाद आपसात आणले नाहीत..!शिक्षणा नंतर यथावकाश त्यांची हि लग्न कार्य झाली..! नातवंड आली. कार्यानिमित्त्याने घर एकत्र येत राहिल. स्वतः च्या  आई पासून थेट नातवंडा पर्यंत प्रत्येकासाठी तिने जे जे लागेल ते ते  केलं. स्पष्टवक्ता आणि रोखठोक स्वभाव यामुळे प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. एखाद्याची बाजू घेतानाही  इतर कोण काय म्हणेल याचा विचार केला नाही. काही वेळा हे योग्य असायचा..काही वेळा नसायचा...! एवढी धडाडीची बाई ती पण शेवटी कुटुंबात अडकून पडली. कुटुंबासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यावर स्वताच्या म्हणून हौशी मौजी उरल्याच नाहीत.
 अलीकडे माझी तिची भेट क्वचितच व्हायची. मी माझ्या आजारपणात आणि ती तिच्या नवऱ्याच्या...!

आज ती गेलेली कळलं  आणि भूतकाळात जीव गुंतला !

'बिल्वाच' मला एकदा म्हणाली होती.."ताई, खरा सांगू का? मी या घरात आले..तेव्हा काय गत  होती ? घरात चार माणस  होती पण गाठीला दोन पैसे नव्हते..आज नेमका उलट आहे हो..आर्थिक विवंचना काही नाही..पण निस्वार्थ प्रेम करणारी आपली माणसं  नाहीत..मुलं  आहेत पण ती तशी आपल्या विश्वात मश्गुल..नातवंडात मन रमत..पण पुन्हा त्यात डाव उजवा होत रहात ! या घरात माझं  वेगळा स्थान आहे..मला सगळे मानतात..अतिशयोक्ती नाही पण काही अंशी माझा वचकही आहे. हे सगळा  आपोआप झालेला नाही.
लहानपणाची एक गोष्ट सांगते, "आम्ही तिघी बहिणी जवळपास एकाच वयाच्या, गावातल्या शाळेत एकत्रच जायचो यायचो. डबा , अभ्यास, हाणामारी दंगा  सगळा एकत्र ! मोठी शांत असायची. धाकटी माझ्याच सारखी वात्रट. धाकटी नेहमी सापडायची आणि मार खायची..मोठी शांत म्हणून गुणी..मी वात्रट पण व्यवहारी आणि विचारी बर्याच वेळा सुटायचे.एकदा काय झालं  दहावीत असताना  आम्हा तिघींना बाबांनी एकसारखी तीन शाई  पेन आणून दिली. हातात पेन मिळाला याचा कोण आनंद झालेला.मोठी नेहमी प्रमाणे शांत. धाकटीने पेन उघडलं, आणि शाई झटकताना चुकून तिच्या हातून पेन पडला. शाईचा  सडा  कपड्यावर आणि जमिनीवर पडलेला. दोन मिनिटापुर्वीचा तिचा हसरा चेहरा रडकुंडीला आला. .मोठ्या  ताई ने तेवढ्यात 'आता बाबांना नावच सांगते म्हणून चिडवलं.' बिचारी खरोखर रडायला लागली. तो आवाज ऐकून बाबा आले..अपेक्षेप्रमाणे रागावले..'तुला मेलीला अक्कल नाही, ती मोठी बघ कशी हुशार आहे नाहीतर तू.. थांब आता पेनच  देत नाही परत...!' म्हणाले. मला खूप वाईट वाटल. मी पटकन बोलून गेले.."बाबा ते पेन माझा होता..तिचा पेन निट  आहे.हे बघा." पेनं सारखी असल्यामुळे माझा खोटेपणा लक्षात आला नाही. त्या दिवशी मला कळला कि ज्याची बाजू सावरून घ्यायला कुणी नाही त्यालाच मदत करावी.त्यातून दोन गोष्टी सध्या होतात..एक म्हणजे आपलं  सामर्थ्य  गरजू माणसासाठी वापरला जातं  आणि दुसरं  असा कि आपला महत्व आपोआप वाढतं ! एकदा का आपला महत्व वाढला कि आपण म्हणू तसा होतं ! मी म्हणेन तसा व्हावं  हीच माझी इच्छा असते ! पण त्यामुळे काय होत ना, आपल्यावाचून ज्याचा अडत नाही न त्याच्याबद्दल असूया वाटायला लागते.
कुणाच वाईट व्हावं  अशी माझी इच्छा मुळीच नाही पण त्याचं  कुठेतरी अडल्याशिवाय ते माझ्याकडे येणार कसे ? "हि " मला मदत नक्की करेल असा जो पर्यंत त्यांना वाटतंय तो पर्यंत माझा अस्तित्व आहे. त्यांचा परावलंबन ज्या क्षणी संपेल त्या क्षणी माझी सत्ता संपली.मी कर्तबगार आहे हे नुसता मला माहित असून उपयोग नाही.ते इतरांनी स्वीकारला पाहिजे. कुठल्याही गोष्टीची स्वीकारार्हता वाढण्यासाठी काही वेळा परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे.हे ज्याला जमत त्याचा लोक ऐकतात. "

गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव 
२८/११/२०१२
रात्रौ १.१६ वा.
९९६०३९७७७३