कंगोरा ( बाप लेकीच्या नात्याचा)
'पहिला बाळंतपण हि माहेरची जबाबदारी' या तत्वानुसार माहेरी आलेली 'अदिती' आज बाळंतपणा नंतर दोन दिवसांनी रुग्णालयातून घरी आली. या वेळी घरी येताना तिला झालेला आनंद काही वेगळाच होता. यावेळी घरी येताना तिच्या सोबत असणारं तिचं स्वतःच 'कोकरू' हे एक कारण होतंच. पण त्याही पेक्षा तिच्या लक्षात आला होता कि हि आता परिचयाच्या रस्त्यावरून सुरु असलेली वाटचाल अस्सली तरी आता त्याच पावूल वाटेची दुसरी बाजू आत्ता कुठे तिच्या नजरेला दिसू लागली होती !!! नेहमीचीच वाट असली तरी वेगळ्या नजरेतून वेगळ्या मनस्थितीतून वेगळ्या जाणीवेतून बघितली कि येणारी अनुभूती काही निराळीच असते.
बाळंतपणाची चिंता आता मिटली होती. मोठ्या अदितीने छोट्या 'अदिती' ला नैसर्गिक जन्म दिला. माहेरी - सासरी सर्वत्र आनंदी आनंद झाला. जावईबापू 'अमित' स्वतः रुग्णालयात जबाबदारीने थांबला होता. आता 'वैद्यांनी' अदितीला घरी जाण्याची अनुमती दिल्यानंतर आज रात्रीच्या गाडीने तो आपल्या घरी म्हणजे पुण्याला जायला निघाला. तत्पूर्वी अदितीच्या आई बाबांची दवाखान्यामध्ये झालेली धावपळ, दापोली सारख्या छोट्या गावामध्ये मुलीचा बाळंतपण व्यवस्थित होईल का नाही ? या आणि अशा इतर शंका कुशंकांची चिंता आता सरली होती. बाल बलान्तीन सुखरूप पणे घरी आले होते आणि आई - बाबांचा जीव भांड्यात पडला. पाहिल्यन्दाच नातीसह घरी आलेली लेक आणि स्वग्रुहि परतलेला जावयी या मुळे एक प्रकारच वेगलच समाधान आणि निवांतपणा 'मुक्ता' आणि 'संजय' या 'बर्वे' दाम्पत्याच्या चेहऱ्यावर नांदत होता !!! जावयांचा गाडी सुटल्याचा दूरध्वनी आला त्यावेळी अदितीच्या बाबांनी, लाडक्या लेकीला आवडणारी पंच खाद्याच्या खिरीने भरलेली वाटी आणून हातात दिली होती. बिछान्यावर एका बाजूला आपल्या पिल्लाला घेवून बसलेली आई, आणि समोर अजून लेकीच्या आनंदासाठी सर्वकाही करणारे बाबा बघून अदितीच्या डोळ्याच्या कडा नकळत ओल्या झाल्या. तेवढ्याच तत्परतेने तिने त्या लपवल्या हि ! खीर तोंडात गेल्या गेल्या अदितीच्या लक्षात आलं कि खिरीची आणि नात्याची चव पूर्वी इतकीच 'अवीट गोड' आहे.
जेवणापूर्वी आता हि मधेच खीर कशाला ? असं आईच्या डोळ्यात दिसणारा खोटं खोटं अविरभावं आणि लेकीने आपण केलेली खीर आवडीने जेवणापूर्वी प्याली याचा आनंद बाबांच्या डोळ्यात अदितीला दिसला. तिघाही खळखळून हसली. नंतर थोड्यावेळाने मुक्ताईने पान वाढून अदितीला पोटभर जेवू घातला. आणि मग अदितीचे आई- बाबा सावकाशीने जेवले.
फार पूर्वी ती महाविद्यालयात असताना घरी यायची तेव्हा निवांत गप्पा मारत रात्रीचं जेवण व्हायचा. आज सगळेजण पुन्हा तस्शाच 'मूड' मध्ये होते. फ़क़्त आज नेहमी संवाद साधण्यात अग्रभागी असणारी आई शांत राहून आणि बाप-लेकींचा मुक्त संवाद ती ऐकत होती. अचानक वरवरच्या गप्पांना नाजूक मर्म बंधाचा वळण केवा लागला ते कुणालाच कळलं नाही.
"बाबा आज बर्याच वर्षांनी नव्याने जाणवला कि, शाळेत, महाविद्यालयात आणि नंतर कार्यालयामध्ये भेटलेले मित्र आणि मैत्रिणी जरी चटकन आपले वाटले तरी सगळ्यात आधी मला मित्र आणि मैत्रीण होवून समजून घेणारे माझे 'आई- बाबाच' होते. तुम्ही कधी तसा वेगळेपणाने संगीतालाही नाहीत आणि दाखवलाही नाहीत. तुमचं माझ्या वाढत्या वयाबरोबर वाढत गेलेला वात्सल्य आणि काळजी ह्या दोन्ही गोष्टी मला तशा कळल्याच नाहीत कधीही. पान मागच्या महिन्यात माहेरी आल्यापासून आत्ता स्वतः आई झाल्यावर माझ्या नवर्याला जेवा 'नवर्याचा'- बाप होताना बघितला तेवा हळू हळू लक्षात यायला लागला 'हा' नजरे आड राहिलेला बदल !!! ज्या काळात घरात मुलगी जन्माला आली कि 'नाकं' मुरडली जायची त्या काळात पुरेशी आर्थिक ताकद नसताना तुम्ही दोघांनी माझी होता होईल ती सर्व हौस मौज आनंदाने केलीत.माझं 'मुलगी' असणा कधी हि तुमच्या वागण्याबोलण्यात दिसला नाहि. अर्थात तेही समाजाने माझ्या स्त्रीत्वाची दाखल घेई पर्यंत !! या एकाच टप्प्यावर नात्यांचे संदर्भ हळू हळू बदलत गेले, माझ्या दृष्टीने. त्यामागचा तुमचं हेतू आणि भावना किती स्वछ होती ते आता आज 'आई' झाल्यावर कलला मला."
" आग हे असं होतंच राहत. हे सगळं कळणारी, याची 'जाण' असणारी मुलगी आम्हाला मिळाली याचाच आनंद आहे आम्हाला, काय 'हो', हो का नाही ??? " मुक्ताई च्या या वाक्यावर बाबांनी मान डोलावली आणि लेकीकडे बघीतलं. सगळेच मनापासून हसले. आपल्या हसण्यामुळे 'बाळ' जागा झाला नाही हे बघून सगळे पुन्हा गप्पान मध्ये दंग झाले.
"बाबा, मी महाविद्यालयात असताना, किंवा एरवी नोकरी करताना जेव्हा घरी सुट्टीला यायचे ना, तेव्हा खरा म्हणजे बर्याच द असं व्हायचा कि तुम्हा दोघांना मी जास्तीत जास्त वेळ घरी राहायला हवा असं वाटत असे. पान व्हायचा कसा धावत पळत काही दिवसांकरता घरी येताना, गावी अल्यावारे कुणा कुणाला भेटायचा, कुणाकडे जायचा, बाकीच्या मैत्रिणीनी काय बेत ठरवला आहे या नुसारच सगळा बेत ठरायचा. त्यामुळे घरी आले तरी लक्ष बाहेर हुंदडन्यातच असायचा. अर्थात घरी परत यायच्या वेळा आवर्जून पाळल्या जायच्या. आणि घरी आल्यावर गप्पा झाल्या तरी त्या तशा नेहमीच्याच व्हायच्या. म्हणजे वर्गात काय झाला ? महाविद्यालयात, वसतिगृहामध्ये काय काय मजा केली ? या सत्राची परीक्षा कशी गेली, मागच्या वेळेला कमी अभ्यास करूनही परीक्षेत जास्त गुण कसे मिळाले ! इत्यादी इत्यादी. आता पुन्हा गेल्यावर काय काय करणार आणि सरते शेवटी पुन्हा घरी केव्हा येणार...अशा विषयाच्याच. त्यातल्या औत्सुक्या मूळे आपण काहीतरी खूप वेगळा करतो आहोत असं वाटायचा केव्हा केव्हा. घरी थोडे दिवस आल्यावर लेकीला मज्जा करता आली पाहिजे. तिला इतर विवान्चानांचा त्रास नको, या हेतूने तुम्ही कधीही इतर गंभीर विषयांची वाच्यता माझ्या समोर कटाक्षाने केली नाहीत. त्यामुळे सगळा निवांत आहे अशीच जाणीव कायम मनात होत राहिली. आणि गप्पा झाल्या तरी आपला एकत्र असा 'संवाद' फार कमी वेळा झाला."
अदितीचा म्हणणं ऐकून मुक्ताई म्हणाली, " आग 'आदी', येडाबाई कसा आहे माहित्ये का, वाढणाऱ्या मुलां मध्ये आई बाप एकाच वेळी आपलं तारुण्य म्हणजेच आपला भूतकाळ आणि मुलासाठी त्यांना अपेक्षित असणारा भविष्यकाळ शोधत असतात. वर्तमान काळ त्याची जाणीव सदैव करून देताच असतो. फक्त कसा असतं ना वर्तमानाची 'नाडी' हि प्रत्येकाला वेगवेगळी सापडत असते. ज्याच्या त्याच्या वैचारिक, मानसिक वकुबा नुसार आणि अनुभवानुसार. काही वेळा वर्तमानाची सापेक्षता तपासून घ्यावी लागते. आज जे योग्य वाटता ते उद्या 'योग्यच' असेल असा सांगता येत नाही. काय चूक, काय बरोबर हे कळण्याचं शहाणपण प्रत्येकाला उपजत मिळेलच असा नाही सांगता येत. पण प्रत्येक जण ते 'स्वानुभवातून' मिळवताच असतो. हे शहाणपण आपल्या मुलां मध्ये यावं पण त्यासाठी त्यांच्या आनंदाची उतसाहाची किंमत त्यांना मोजावी लागू नये यासाठी प्रत्येक आई-बाप आपापल्या परीने धडपडतच असतो बाळा. त्यात असा काही विशेष नसता. पालक होणार्या प्रत्येकाचा ते कर्तव्याच असतं. कुणाला पार पडता येत, तर कुणाला नाही जमत कधी कधी."
"सासरी गेल्यावर काय किंवा त्या आधीही काय, आई तुझ्या पेक्षाही बर्याचदा हलवा व्हायला झाला ते बाबांच्या आठवणी ने. म्हणजे कसा आहे ना, आईची माया हि नेहमी काळजी करणारी असतेच, पण बाबांची माया म्हणजे 'सायकल शिकताना - आता पाय उचलून दुसर्या 'पदाल' वर टाक असा सानागणाऱ्या शिक्षका सारखी असते.त्या क्षणी paya khalachi जमीन सोडून पाय अधांतरी उचलताना भीती वाटते, पण एकदा का ते ऐकून धाडस केला ना कि मग आपली वाट आपण शोधू शकतो'. मग पूर्ण तोल सावारेपार्यांता बर्याचदा पडायला होता, खरचटून जखमा हि होतात. पण चिकाटी सोडली नाही तरच त्या सल्ल्या मागचा आनंद आणि दृष्टी कळते."
अहो 'मंडळी' कळलं का आपली लेक किती समंजस झालीये ते !!! "हो अगदी माझ्यासारखी झालीय हो आपली लेक !!! एकदा का सायकल चालवायला यायला लागली कि मग पुन्हा कोण कशाला thanbatay आणि मागे वळून बघतंय ? पुन्हा पडल्यावर येणार ते आई जवळच ना, तेव्हा नाही जाणार अशा 'निष्ठुर' शिक्षकान कडे" ! काय हो कळलं का मी काय म्हणतेय ते ! आज भारीच प्रेम उतू जातंय लेकीचा ......, एरवी बाबांकडून लेकी कडे महापूर जात असतो, आज गंगा उलटी वाहतेय !!!"
" खरतर मागच्या वर्षी जेव्हा माझी नणंद तिच्या बालान्त्पानाला घरी आली होती तेव्हाच माझ्या लक्षात यायला लागला कि मुलांची काय चूक होते ते. मुलांचा आपल्या हातुन काही रहायला नको, या भावनेनं आई- बाबा सगळा करत असतात, आणि मुला आपल्याच विश्वात मश्गुल असतात. लग्न होण्यापूर्वी निदान आई बाबांना बोलण्याचा स्वातंत्र्य तरी असतं, पण लग्न नंतर सगळाच बदलता. म्हणजे मुलीला मिळालेला सासर जर का श्रीमंत असेल तर अर्थातच या ' श्रीमंती'ची सावली माहेरी आलेल्या मुली बरोबर माहेरच्या सगळ्या नात्यात वावरत राहते. नवर्याचा किंवा सासू-सासर्यानाचा थाट उचलताना असश नवागत 'सुना' त्य्नाचा कर्तुत्व आणि आपल्या करता होता होईल ते करणाऱ्या 'माहेराला' सोयीस्कर रीतीने विसरतात. आणि आपला बडेजाव गाजवण्याची आयती संधी त्यांना बाळ नतीन झाल्यावर मिळते. मग जणू काही आपण काही फार मोठा कर्तुत्व गाजवून रणांगणातून परत आलेल्याच्या त्ता मध्ये त्या वावरत राहतात. 'आई- बाबा' ना हे काळात असला, आवडत नसला तरी ते लेकीच्या मुला कडे बघून गप्पा बस्सतात. आणि याचाच गैर फायदा या मुली मग 'माहेरपण ' या नावा खाली करून घेतात."
"तू म्हणते आहेस ते खरा असला तरी सगळ्या घरात तसाच चित्र नसता अगं. अजूनही काही चांगल्या मुली समाजात आहेत. काही वेळा मुलीच्या सासरची परिस्थिती हि माहेर पेक्षा अधिक चांगली नसेल, तर आपल्या मुलीला घरी आहे तो पर्यंत तरी सगळा व्यवस्थित मिळावा असा हेतू असतो आई-बाबांचा. आणि कुणीही किती डोळे बंद करून दुध प्याला तरी नंतर ते ज्याचा त्याला पचवावा लागताच ना ? आपण आपल्या परीने होता होईल ते करीत राहायचा."
आईचा म्हणणं ऐकून 'अदिती' आणखीनच खवळली, " अगं माहेरपणाला येवून आई -बाबा आजारी पडे पर्यंत त्यांना छळत राहायचा ? कहर म्हणजे आई-बाबा आजारी पडल्यावरही माहेरात टाळ ठोकून महिनो महिने राहायचा याला माहेरपण नाही 'सूड' उगवणा म्हणता येईल माझ्या मते. रात्री अपरात्री आपला तान्हा मुल जागा असताना, ते आईच्या / बाबांच्या ताब्यात देवून आपण स्वतः निवांत झोप काढायच्या. येवढा होवूनही दिवसा जेव्हा मुल झोपलेला असेल तेव्हा आईलाच जागेवर बसून आदेश द्यायचे, कि 'हे आण, ते आण' म्हणून ! आई, बाबा, भाऊ, घरातल्या प्रत्येकाला सक्ती करून दूरदर्शन संच बंद करायला लावायचा, आणि स्वतः मात्र वेळ मिळेल तेव्हा 'एम' पासून 'एफ' पर्यंत सगळी केंद्र बघत रहायची.तान्हा मुल आई च्या हवाली करून भ्रमण ध्वनीवर तासंतास नवर्याशी गप्पा मारत बसायच्या. या सगळ्या मध्ये आपलेच आई- बाबा दामले असतील, त्यानाही काही विश्रांती मिळणा गरजेचा आहे हे यांच्या लक्षातच येत नाही. आई-बाबा ना होता होईल तेव्हडा नामोहरम करूनही परत ' आमच्या कडे ना किती मस्त झाला असतं हे' असा वर ऐकवत राहायचा. आपल्याच लेकीचा हे बदललेला रूप बघताना त्या आई-बाबांना किती मनस्ताप होतो हे यांना कळत नाही. आई- बाबाही लेक आज ना उद्या सासरी जाणार आहे उगाच बोलून शोभा नको म्हणून या सगळ्या गोष्टीकडे काना डोळा करतात. हे मी जेव्हा माझ्या सासरी बघीतलं ना तेव्हाच ठरवला कि आपण आई-बाबांना असा त्रास द्यायचा नाही."
"येडा बाय ! कुठनं झाला एव्हडा बदल? मला वाटलं होता माझ्या आग्रहामुळे तुला विज्ञान शाखेला अकरावीला प्रवेश घ्यायला लावला तेव्हा पासून माझ्यावर हळू हळू रुसत गेलेली माझी लेक इतक्या लवकर परत माझ्याशी मना मोकळा बोलेल म्हणून. बेत कसा असतं माहित्ये का पुरुषाच्या आयुष्यात स्त्रियांचा स्थान हे अत्यंत निर्णायक असतं. म्हणजे सुरुवातीला, आई कशी मिळते यावर त्याच्या मनाची रचना ठरते. आईच जर का कुढत राहणारी आणि घराची अब्रू चव्हाट्यावर आणणारी असेल तर, त्याच्या मनात आई बद्दल आदर कमी आणि आधी जास्त निर्माण होते. या उलट आईच जर का खंबीर आणि ना डगमगता येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी असेल तर मग काय, अशा 'माय' च्या लेकरांना आपले पंख हि तितकेच ताकदीचे करायचे आहेत याची खुणगाठ आपसूक मनाशी बांधता येता. तारुण्यात जेव्हा 'पुरुष' आपला जोडीदार निवडतो, ,( म्हणजे आमच्या काळी घरचे लोकच तो निवडून देत), तेव्हा त्याचा बायकांकडे / स्त्री जातीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याकडे आणि तिच्या मानसिकतेचा त्यांना जास्त अप्रूप असतं. म्हणजे आई ने सांगितलेली एखादी गोष्ट ना ऐकणारा मुलगा जेव्हा तीच गोष्ट बायको ने सांगितल्यावर करतो तेव्हा तो निर्विवाद पणे तिच्या 'vashikranacha ' तो जय असतो.
अलीकडच्या काळातली तुमची पिढी तर आणखी चोखानादल, म्हणजे ते वर वर दाखवतील कि, आम्ही खूप आधुनिक आहोत म्हणून पण त्यांची शोध मोहीम फार विचारपूर्वक सुरु असते. भपकेबाज मैत्रीण त्यांना मैत्रीण म्हणून चालते पण बायको हि कुलीन आणि शालीन, जमलीच तर घरंदाज मिळाली पाहिजे असा त्यांचा म्हणणं असतं. मुलींचा हि तसाच. जाता येता खाण्याचा खर्च करण्यासाठी, महाविद्यालयात जोडीने फिरण्यासाठी त्यांना एखादा तग मुलगा चालतो पण नवर्याचा विचार करताना त्याला 'छान पगार' असणा, घरात कमीत- कमी' माणसा असणा आणि आपला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यची त्याची तयारी असावी अशा माफक अपेक्षा असतात. त्यात गैर काहीही नाही. पण खरी गम्मत इथून पुढच्याच आयुष्यात सुरु होते. 'शाळेतून बाहेर पडल्यानंतर जसे पुन्हा तेच जुने वर्ग आणि तीच बाकडी बर्याच वर्षांनी बघितली कि जसा मान आनंदी होता ना अगदी तसाच होत जाता. फ़क़्त शाळेत जाणारा विद्यार्थी म्हणजे आपण नसतो तर ते आपलंच मुल असतं. शाळेत होणारं राष्ट्रगीत, दर त्सानान्ताराची 'घंटा' नियमित पणे दिला जाणारा गृहपाठ आणि तो नियमित पणे 'पूर्ण' ना करणारे माझ्या सारखे विद्यार्थी हे सगळा तसाच अखानदा सुरु असतं, फार तर शाळेची वेळ, आणि अभ्यासक्रम बदलतो थोडा बहुत. पण त्यामुळे बिघडत काहीही नाही. पालक झालेल्या जुन्या 'विद्यार्थाला' मग जीवनाच्या शाळेत निघालेली आपली पुढची पिढी दिसत असते. आपल्याला जे जमलं नाही, करता आलं नाही,ते सर्व आपल्या पाल्याने करावा, आपल्याला जे कमी पडला ते त्याला कमी पडू द्यायचा नाही एवढी एकाच जाणीव त्याच्या मनाशी व्हायला लागते. बायकांचा ठीक असतं बेत, त्यांना चटकन रडून मोकळा होता येता. पुरुषांना 'purusha सारखा पुरुष तू रडतोस कसला ?' असाच शिकवलेला असतं. लहानपणी पासून कांकणभर अधिक मिळणाऱ्या स्वातंत्र्यात, आणि या natarachya हिकमतीच्या काळात पुरुषाला रडण्याची संधीच मिळत नाही कधी. आणि आलीच तर तोंड लपवून रडण्याची कसरत त्याला करावी लागते. नुसता दुखणे रडता नाही आला तरी फार फरक पडत नाही, पण काहीवेळा अलगद येणारे आनंदाश्रू जेव्हा कुणालाच दिसत नाहीत त्यावेळेला होणारं त्रास हा जास्त असतो.
आधी घरातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे 'पुरुषाचे' मित्र मंडळ फार मोठा असतं. या चौकटीला थांगपत्ता लागू नादेता कुणी आपल्याला हवी 'तशी' आहे का नाही याचा शोध घ्यायचा. नसेल तर उत्तम. पण जर का असेल तर, 'ती' ला समजून घेताना हजार वेळा चिरडला जाणारा 'स्वाभिमान' इतरांपासून लपवत त्या 'मुली'च्या जवळ जायची कसरत करायची. सासर- माहेर आणि मित्रमंडळ या सगळ्यांच्या नजरेतील 'अनपेक्शित्पणा' पचवून नात्याची गुंफण करायची. हि गुंफण म्हणजे ' कडाक्याच्या थंडी मध्ये नेहमी विरजण लावणाऱ्या बाईच्या मनात, रोजचा विरजण लावताना उद्या दही लागेल का नाही हि शंका असते तेव्हड्याच अस्थिर वातावरणात उद्याला 'गोड' दही लागो अशी प्रार्थना करून झाकण ठेवण्या येव्हाडी अवघड गोष्ट असते. आणि विरजण नीट लागला कि नाही हे घुसळून बघणाऱ्या अनेक रव्या प्रपंचात भांड्यासकट तयार असतात. काही आपल्याच तर काही सासरच्या. असो.
तर त्या मूळे पुरुषाला जेव्हा स्त्रीचा पुढचा रूप आपल्या लेकीच्या स्वरुपात घरात अवतरलेला दिसत त्यावेळी पहिल्यांदा तो 'स्त्री' वर स्वतः संस्कार करण्याच्या जागी असतो. आधीचा आईविषयीचा आदर, नंतर जोडीदाराबद्दल वाटणारा प्रेम आणि शेवटच्या स्वरूपातला पित्याचा ममत्व आणि सगळ्यात महत्वाचा लेकीचा कौतुक !!! आपल्याला घडवणारी, नंतर दमवणारी 'स्त्री' नामक चीज पालक झाल्यावर प्रत्येक 'पुरुष' एका वेगळ्याच नजरेतून आणि समजेतून पाहत असतो. या वेळी पहिल्या दोन्ही वेळेपेक्षा त्याची समज थोडी अधिक वाढलेली असते. त्यामुळे एखाद्या आई पेक्षाही एखादा बाप हा लेकीला समजून घेण्यात निश्चित उजवा असतो. त्यामुळेच तर, लहानग्या लेकीची वेणी-फणी' करण्यापासून, तिला सायकल शिकवण्यापर्यंत, तसाच छान छान कपडे शोधून आणून ते घालण्यापासून ते लेक शाळेत जायला लागल्या वर तिच्या वह्या पुस्तकांना 'कव्हरं' घालण्या पर्यंत प्रत्येक गोष्टीत मला मजा वाटली. त्यातही मुलगी जर का मुला आधी जन्माला आली असेल तर या उत्साहाला पुढचं मुलही काही प्रमाणात मुकत. इतका वर्षाव त्या मुलीवर होतो. कारण हि वात्सल्याची मात्रा पहिल्या जाणीवे बरोबर अम्मळ जास्तच असते. नन्तर ती पहिल्या इतकी तीव्र नाही होत दरवेळेला. "
"म्हणून तर तुम्ही व्यवसायाचा नावही लेकीच्या नावाच्या अद्याक्षारांपासून ठेवलात होय !!! आत्ता मला कळलं. लेकीचा किती कौतुक, खिशात पैसे असोत नसोत तिने हत्त केल्यावर वस्तू आली नाही असा कधी झालाच नाही तुझ्या लहान पाणी."- मुक्ताई.
"अगं लेकीची हौस तिच्या लहानपणीच भागवणार नाहीतर केव्हा ? आणि त्यातूनही जर का तिच्या मागण्या या समंजस असतील आणि तिला परिस्थितीची जाणीव असेल तर, उगाच 'दारिद्र्य' कवटाळून कशाला बसायचा. चांगला काय आणि वाईट काय हे एकदा नीट समजावून सांगितला, त्यांना पटवून दिला कि मुलही मग हट्टा नाही करत अनाठायी." " हे तुम्ही अदिती बद्दल म्हणालात तर ठीक आहे, पण धाकट्या चिरंजीवांचा काय ?"
"नको ती धाडस करण्याला तुमचीच फूस पहिल्या पासून त्याला. आधी छोटी मोठी केली तेव्हा कौतुक केलंत.त्या ने तो आणीच डोक्या वर बसला. वावगं काही करणार नाही हे मान्य पण म्हणून कुणाचा काही ऐकणा हा प्रकार आहे का नाही? काय चालू आहे ते सांगायचा नाही शेवट पर्यंत ! विचारला तर स्वताला' अडकायला होणार नाही असा कावेबाज उत्तर देण्यात तर स्वारी पटाईत. लेकीच्या वेळेला असलेल्या समस्या चिरंजीवांच्या वेळी सुटत गेल्या त्यामुळे आणीच चैन झाली लेकाची. लेकीने 'नवरा' शोधला असतं तर मान्य केला नसतात कधी, पण चिरंजीवानी मागच्या महिन्यात जेव्हा ' जाहीर' केला कि "आम्ही स्वतासाठी 'वधु' निवडली आहे, सुशील आणि आपल्याच जातीतील आहे. बाकी सर्व उत्तम आहे चिंता नसावी. आपले आशीर्वाद लाभावेत एवढीच श्रींची इच्छा आहे". त्या वेळी कसा तत्काळ होकार निघाला तोंडातून." muktaichya ya विवेचनावर काहीही ना बोलता, अदिती- बाबांनी एकमेकांकडे बघीतलं. अगं विरोध कशा साठी करायचा ? त्याची बायको माहेरपणाला जाईल तेव्हा तो हि असाच बोलेल समंजस pane आपल्याशी !!! आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवायचा नाही तर कुणी ? आपले संस्कार योग्य असतील तर त्याची निवडही योग्यच असेल. कळेल ना आता थोड्या दिवसात. आपल्या 'भूता'वर प्रेम करणारी कुणी आहे हेच आश्चर्य म्हणायचं !!!"
"आई, आपला विन्या तसा उगाच कुणाला भाळणारा नक्की नाहीये हं !!, बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. माझ्या बाबतीत मी त्यांचं नक्की ऐकेन अशी खात्री होती म्हणून त्यांनी शब्द खर्ची घातला. त्यांचं ऐकला म्हणूनच तर माझं सगळा व्यवस्थित आहे आज. काहीही कमी नाहीये. आणि माझी हौस मौज तुम्ही दोघांनी हरप्रकारे सांभाळली आहेच. मला घर पासून लांब राहून नोकरी करायला देणा, दापोलीतून लांब जावून रत्नागिरी मध्ये शिक्षण करणं या सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे मला करता आल्या त्या तुमच्या पठीम्ब्यामुळेच तर !! आणि काय गा आई, आज येव्हाडी सगळी सुख दाराशी असताना हि आमची येव्हाडी कौतुका, होतायत. तू लहानपणी आम्हाला साम्भालालास तेव्हा, शाळेची नोकरी आणि परक्या गावातल्या अनोळखी मानासंवारती विसंबून राहून असेल तशा परिस्थिती कधी कुणाकडे ना जाता, कोणतीही तक्रार ना करता तू जेव्हा संसार केलास तेव्हा कोण होता गा तुझ्या मदतीला ? बाबाही नव्हते दरवेळेला बरोबर. तरीही तू पळून ना जाता येईल त्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात राहिलीस. आणि बाबा नि सुधा कधीही, पैशांचा, व्यापाराची चिंता आहे म्हणून आमच्यावर चीड चीड केली, चेहरा दुर्मुखलेला ठेवला असा कधीही झाला नाही".
"खरा सांगू का, आता सासरची आणि माहेरची हि परिस्थिती सुधारल्यावर कुठल्याही 'हॉटेल' मध्ये जावून काही हवं असेल तर खायची ताकद आली आहे, पण बाबांच्या हाताच्या ' दही-भाताच्या' डब्याची, आणि आई तुझ्या हाताच्या गरम-गरम पोळ्यांची चव आणि ते समाधान, बाकी कुठे हि नाही मिळत गं. बाबांच्या कपातली कॉफी, हक्काने पिण्यातली मज्जा आणि, तुझ्या एम-८० वर तुझ्या पाठी बसून गाडीवरून फिरण्यातल्या आनंदाची किंमत आत्ता खरया अर्थाने कळते. आपण उगाच इतरांकडे बघत धावत राहतो त्यंच्या पाठी मागे. कारण 'पुढे' दिसणारे सुखात आहेत असा नकळत आपण समाजात असतो. पण खरा तर, आपणही तितकेच सुखात असतो गं. फक्त हे आपल्या त्या वेळी लक्षात येत नाही. कधी तरी ठेच लागून पडल्यावर थांबून मागे वळण्यापेक्षा थोडा विवेकाने आपणच सिंहावलोकन केला तर हे ज्याचा त्याला कळू शकेल." तिघांच्या हि डोळ्यात अश्रू केव्हा आले हे कुणालाच कळलं नाही. मुक्ताई ने 'आदि' ला कवटाळून जवळ घेतला. बाबांनी 'मस्त पैकी 'बृ' कॉफी करून तिघांसाठी केव्हा आणली हे कुणालाच कळलं नाही." बाबा, मस्त !! अजून अगदी तशीच चव, 'strong आणि मिष्ट गोड' लेकीने पाठोपात शिट्टी वाजवून दाद दिली !!
" आज लेक आहे म्हणून दुधात केली आहे 'मला मात्रा पाणी मिश्रित' देता." मुक्तीच्या या वाक्यावर पुन्हा एकदा अदिती आणि तिचे बाबा खळाळून हसले. "बी, आता झोप शांतपणे, लेकीलाही झोपू द्या स्वस्थ पणे !! लेक मोठी झाली आहे आता. लेकीची लेक घरी आली तरी तुम्ही अशा भांडत बसता, 'नात' काय म्हणेल उद्या मोठी झाल्यावर ?"
अहो, मी भांडणार भांडणार भांडणार !!! तुमच्याशी भांडायचं नाहीतर कुणाशी ??? कळलं का हो !!!
"हो कळलं ना, पुरुषांसाठी, शिकणा कधी संपत नाही हे कळलं ना !!!"
-
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
मिरजोळे, रत्नागिरी.
९५६१४३४९८८
२९-०९-२०१० रोजी लिहून पूर्ण झाली.
( 'पुण्या' मध्ये रस्त्यात जाताना कथेची कल्पना सुचली.)
Wednesday, September 29, 2010
Wednesday, September 15, 2010
'श्री स्वामी स्तवन'
'श्री स्वामी स्तवन'
'गौरी' पुत्रा 'गजानना', सामर्थ्य दे मम लेखणीसी,
'सरस्वती' प्रसन्न व्हावी, इप्सित साधण्यासी !!!
मम पित्यासी ओढ लावून कृतार्थ केलेस त्याचे जीवन
येता शरण तुला 'स्वामी' राया, संकटे हि सर्व निवारिली !!
दारिद्र्याचे फाडून लक्तर, संपन्नतेचे महावस्त्र स्वये नेसविले,
गृहा संनिध प्रगटुनी 'औदुंबर', दिधले 'अधिष्ठान' प्रभू साधनेसी !!
मंगल कार्ये कित्येक संपन्न जाहली ,
लाभता साथ माता 'गायत्री' ची !!
अनुपम रूपे उभा राहुनी, साह्य करिसी नित्य आम्हासी !
स्वामी साक्षात ' समर्थ' असे, याची नित्य प्रचीती देसी !!
वियोग होता पित्याचा, माझा भार 'तू' च वाहियला !
सेवेत पडला सकारण खंड, तरीही तुझी कृपा अखंड राही !!
'बाकी' जे 'नवस' फेडून घ्यावे सत्वरी, सेवेत अंतर पडो नये !
चंचल चित्त, स्थिर व्हावे तुझिया चरणांशी,
हातुन सेवा घडू द्यावी !!
'ब्रह्म' मुहूर्ती मज हे स्फुरण जाहले,
प्रातः समयी प्रत्यक्षात आले 'श्री स्वामी' कृपेने !!
उत्तमाची ओढ लागू दे या जिवा,
'सर्वोत्तमा' द्यावा हा 'गुरुप्रसाद' मजसी !!!
- गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
१५/०९/२०१०
सकाळी- ०९.३० वा.
'गौरी' पुत्रा 'गजानना', सामर्थ्य दे मम लेखणीसी,
'सरस्वती' प्रसन्न व्हावी, इप्सित साधण्यासी !!!
मम पित्यासी ओढ लावून कृतार्थ केलेस त्याचे जीवन
येता शरण तुला 'स्वामी' राया, संकटे हि सर्व निवारिली !!
दारिद्र्याचे फाडून लक्तर, संपन्नतेचे महावस्त्र स्वये नेसविले,
गृहा संनिध प्रगटुनी 'औदुंबर', दिधले 'अधिष्ठान' प्रभू साधनेसी !!
मंगल कार्ये कित्येक संपन्न जाहली ,
लाभता साथ माता 'गायत्री' ची !!
अनुपम रूपे उभा राहुनी, साह्य करिसी नित्य आम्हासी !
स्वामी साक्षात ' समर्थ' असे, याची नित्य प्रचीती देसी !!
वियोग होता पित्याचा, माझा भार 'तू' च वाहियला !
सेवेत पडला सकारण खंड, तरीही तुझी कृपा अखंड राही !!
'बाकी' जे 'नवस' फेडून घ्यावे सत्वरी, सेवेत अंतर पडो नये !
चंचल चित्त, स्थिर व्हावे तुझिया चरणांशी,
हातुन सेवा घडू द्यावी !!
'ब्रह्म' मुहूर्ती मज हे स्फुरण जाहले,
प्रातः समयी प्रत्यक्षात आले 'श्री स्वामी' कृपेने !!
उत्तमाची ओढ लागू दे या जिवा,
'सर्वोत्तमा' द्यावा हा 'गुरुप्रसाद' मजसी !!!
- गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
१५/०९/२०१०
सकाळी- ०९.३० वा.
Subscribe to:
Posts (Atom)