Wednesday, September 15, 2010

'श्री स्वामी स्तवन'

'श्री स्वामी स्तवन'
'गौरी' पुत्रा 'गजानना', सामर्थ्य दे मम लेखणीसी,
'सरस्वती' प्रसन्न व्हावी, इप्सित साधण्यासी !!!
मम पित्यासी ओढ लावून कृतार्थ केलेस त्याचे जीवन
येता शरण तुला 'स्वामी' राया, संकटे हि सर्व निवारिली !!
दारिद्र्याचे फाडून लक्तर, संपन्नतेचे महावस्त्र स्वये नेसविले,
गृहा संनिध प्रगटुनी 'औदुंबर', दिधले 'अधिष्ठान' प्रभू साधनेसी !!
मंगल कार्ये कित्येक संपन्न जाहली ,
लाभता साथ माता 'गायत्री' ची !!
अनुपम रूपे उभा राहुनी, साह्य करिसी नित्य आम्हासी !
स्वामी साक्षात ' समर्थ' असे, याची नित्य प्रचीती देसी !!
वियोग होता पित्याचा, माझा भार 'तू' च वाहियला !
सेवेत पडला सकारण खंड, तरीही तुझी कृपा अखंड राही !!
'बाकी' जे 'नवस' फेडून घ्यावे सत्वरी, सेवेत अंतर पडो नये !
चंचल चित्त, स्थिर व्हावे तुझिया चरणांशी,
हातुन सेवा घडू द्यावी !!
'ब्रह्म' मुहूर्ती मज हे स्फुरण जाहले,
प्रातः समयी प्रत्यक्षात आले 'श्री स्वामी' कृपेने !!
उत्तमाची ओढ लागू दे या जिवा,
'सर्वोत्तमा' द्यावा हा 'गुरुप्रसाद' मजसी !!!
- गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
१५/०९/२०१०
सकाळी- ०९.३० वा.

No comments:

Post a Comment