श्रावण आणि आठवणींची संततधार !!!
त्याकाळी श्रावण म्हणजे काय ? हे अजिबात काळात नव्हतं. अचानक शाळा सोमवारी आणि शनिवारी लवकर भरायची आणि सुटायची. माझ्या बाबांचे सोमवार, गुरुवार, मंगळवार असे उपवास नेहमीच असायचे. त्यामुळे उपवास करणं हे काही नवीन नसायचं. फ़क़्त माझ्या बाबांप्रमाणेच इतर लोकं अचानक उपवास का करायला लागली ? या एका गोष्टीचा कुतूहल वाटायचं. शाळेत असताना पाऊस म्हणजे काही विशेष वाटायचाच नाही. कोकणातला मुसळधार पाऊस बघत आणि त्यात मनसोक्त भिजत शाळेत जाण आणि येणं ह्यातला आनंद अवर्णनीय असायचा. त्याची शाळा भरण्यापुर्वीची आणि सुटल्यावरची अचूक उपस्थिती 'चिंब' करूनच सोडायची.आणि त्यातही घरी जायला मिळावा म्हणून शाळेच्या टाकीवर जावून कपडे भिजवून घरी जायची परवानगी मागण्यात मजा यायची. ती सुधा नुसता घरी जाण्यासाठी नाही तर गावातल्या देवळात असणाऱ्या 'सप्त्याला' जाण्यासाठी !! सहावी सातवी ला असताना संदेश वाडकर या माझ्या मित्राबरोबर "सर, गावातल्या देवळात 'एक्का' आहे. आम्ही जाऊ का ? " असा विचारून 'श्री. जोशी' सरांच्या परवानगीने जेवा बाहेर पडलो त्या वेळेला पुसटशीही कल्पना नव्हती कि हा 'श्रावणी' आनंदाचा 'सुंदर' प्रवास सुरु झाला आहे.
प्रत्यक्षात शाळेतून आल्यावर घरी दप्तर टाकून, 'लक्ष्मीकांताच्या' मंदिराच्या कळसाला बाहेरून नमस्कार करून, आम्ही आमचा मोर्चा थेट मंदिरा शेजारच्या जोगळेकरांच्या घराकडे वळवला. दोघांनी जावून कॅरम चा डाव मांडला.तो थेट संध्याकाळी अरुण काका, कामावरून घरी येई पर्यंत !! आल्यावर काकांनी आस्थेने आमची चौकशी केलीच, " हे भोसडीचे शाळेत एक्क्याला जातो सांगून आलेत ते , हा इथे एक्का करत बसलेत का काय ??? मेल्यानो देवाच्या नावावर थापा मारून येत शाळेतून, ते देवाला तोंड तरी दाखवा मेल्यानो !!! " काकांच्या बोलण्यामुळे नाखुशी ने कॅरम चा डाव गुंडाळून मग देवळात जाण. देवळात गेल्यावर तिथे लहानांपासून मोठ्यापर्यंत बरीच माणसा उतसाहाने उभी असायची. देवाच्या मूर्तीसमोर केळीच्या खांबामध्ये 'बांधलेली' सत्यनारायणाची पूजा. त्या समोर दोन्ही बाजूला एकमेकांकडे तोंड करून उभ्याने हातात टाळ घेवून भजन म्हणणारी माणसे. प्रत्यक्ष देवासमोर नाळ/ मृदुंग वाजवणारा असायचा. आणि या माणसापासून समोरच्या पूजे पर्यंतच्या अंतरामध्ये खांद्यावर 'वीणा' घेवून एक जण डोक्यावर टोपी घालून अखंड पुढे मागे असा चालत असतो. देवळात येणारी -जाणारी लोक देवाला, पूजेला नमस्कार केल्यानंतर हाताने (त्याच्या) कपाळाला बुक्का लावून त्याला आवर्जून नमस्कार करतात. दिवसा बरीच माणसा उपस्थित असताना हि 'वीणा' हातात घ्जेण्यासाठी अक्षरशः आमची चढाओढ लागत असे. एकाने वीणा घेतालीरे घेतली कि पाठोपात जाऊन दुसरा माणूस त्याच्या कपाळाला बुक्का लावून, त्याला नमस्कार करून त्याच्या डोक्यावरची टोपी आणि हातातली वीणा हिसकावून घ्यायचा. त्या काळी हातात वीणा असताना आपल्याला कुणा मोठ्या माणसाने नमस्कार केला याचा कोण आनंद वाटायचा. अर्थात हि वीणा हे नारदाचा प्रतिक समजून हा नमस्कार त्या 'नारद' मुनींना केलेला आहे याची जाणीव त्या वयात नसायची. तर सप्तकात ओरडणारे टाळकरी, आणि आम्हा मुलांची वीणा हातात घेण्यासाठी चढा ओढ यात हा वेळ पटकन निघून गेला. दुसर्या दिवशी दुपारी एक्क्याची सांगता होताना, भजन म्हणत देवळाला सगळ्यांनी घातलेल्या तीन प्रदक्षिणा, जोडीला गुलालाची उधळण मग म्हटलेल्या आरत्या. प्रसादातला पेढा मिळण्यासाठी केलेली धावपळ......!!!! हे एक्क्याचा स्वरूप अगदी काहीही कळत नव्हतं तेव्हाचं !!
असाच मराठी शाळेत असताना बाबां बरोबर गावाच्या एका टोकाला असलेल्या श्री सिद्धेश्वराच्या देवळा मध्ये जाण्यात काही और मजा होती.देवळात जाण्याआधी बेलाची पानांची शोध मोहीम असायची. शंकराच्या पिंडी ला दही भाताचं लिंपण करण्यासाठी नदीच्या काठाने, हातात दहीभाताचा भरलेला डबा आणि तांब्याची पाण्याने भरलेली कळशी घेवून सोवळा नेसून अनवाणी जाणारे बाबा आणि त्यांच्या बरोबर तोंडाची बडबड अखानदा चालू ठेवून सोबत करणारा मी....!! नदीचा खालालणारा पाणी, अधेमध्ये लागणारे साकव, हिरव्यागार रानात शोधावी लागणारी पावूल वाट चालून जुन्या काळ्या दगडांची घाटी लागली कि हायसं वाटायचं !! थोड्याच वेळात देवळाचा कळस दिसायचा, प्रत्यक्ष देवळात गेल्यावर, गाभार्यातला काळोख आणि त्यातून अचानक उडत बाहेर पडणारी वातावघाला !!! प्रचंड घाबरायला वयाचा मला त्यावेळी !! मग बाबांच्या स्वरात स्वर मिसळून 'ओम नमः शिवाय' चा जप मोठ्याने आपोआप केला जायचा !!
दहावी बारावी च्या दरम्याने शंकराच्या देवळाच्या सप्त्याला जायला सुरुवात झाली ती शेजारच्या भाऊ मामा (भाटवडेकर) मूळे ! शंकराचा देवूळ हे गावाच्या टोकाला आहे. म्हणजे माझ्या घरापासून सुमारे ४-४.५ कि. मी. लांब. सप्त म्हणजे सतत सात दिवस अहोरात्र देवासमोर सुरु राहणारा भजन. या मध्ये गावातल्या १२ वाड्या ना प्रत्येकी ३ तासाचा वेळ 'पारा' असा विभागून दिलेला असतो. हे चक्र अखंड चालू राहता. कुठलाही वेळापत्रक प्रदर्शित ना करता दरवर्षी नित्य नेमाने प्रत्येक वाडी आपापल्या वेळेला येवून भजन करते. साधारणपणे प्रत्येक वाडीला ४ वेळा असे पारे करायला मिळतात. ढोबळमानाने सांगायचा झाला तर, दिवस- रात्र आणि पहाटे चे असे सर्व 'पारे' आमच्या वाडीला मिळायचे. आमच्या पर्यामध्ये मुख्यत्वे जोगळेकर, वाडकर, गुरव, भाटवडेकर, श्रोत्री आणि आम्ही खाडिलकर असे सगळे जना असायचो. यात खूप मजा यायची ती अर्थातच पहाटे ३- ते ६ च्या पाऱ्याला. रात्री ९ च्या दरम्याने मी जोगळेकरांच्या घरी जायचो. तिथे गेल्यावर कॅरम चा डाव मांडणा हे ओघाने आलंच !! कॅरम मांडून त्यावर पोस्टाच्या टेबल वरचा टांगलेला दिवा वायर सोडवून बरोबर बसवायचा. कॅरम तापे पर्यंत कागदाच्या कापत्याने कॅरम घासायचा, कापडी पुडीत बांधून बोरिक पावडर हि त्या बल्ब च्या 'टवाल्यावर' तापण्यासाठी ठेवायची. आणि कोण कुणाबरोबर खेळणार याची चाचपणी करायची !! भूपाल आणि समीरदादा हे उत्कृष्ठ खेळायचे !! समीरदादा चा खेळ हा आक्रमक तर भूपालाचा संथ पान मस्त असायचा ! संदेश वाडकर तर निर्विवाद 'भारी' खेळायचा. सगळ्यात मजा यायची ती 'विश्वास काका' आमच्या बरोबर खेळायला बसले कि ! माझा खेळ हा बे भाराव्शी असायचा. समोरच्याच्या मनात येणार नाही त्यावेळी, मी अशा काही सोंगट्या घ्यायचो कि समोरचा आश्चर्य चकित व्हायचा आणि समोरची सोंगटी मी नक्की घेणार असा वाटत असताना नेमकी ती जायची नाही.....
एकदा एका अशाच पाऱ्याला आम्ही सगळे वाडकर, भाटवडेकर आणि जोगळेकर एकत्र खेळत बसलो. गुणांची आट नको म्हणून आम्ही गुणांची मर्यादा एवढी वाढवली कि थेट ३५० परेयान्ताचा डाव खेळलो ! म्हणजे झाला काय कि आम्ही रात्री ९.३०-१० ला डाव मान्दाल्यापासून एक एक जण जसा जसा येत गेला तास तसा तो हि खेळायला बसला. खूप मज्जा आली. कधी पहाटे जोगळेकरांच्या गाडीतून तर कधी रस्त्याने चालत शंकराच्या देवळात चालत जाताना मजा यायची ! हातातले टाळ वाजवत वाटेतल्या घरांना जाग देत चालण्यात मजा यायची. रात्री सगळ्यात 'बेक्कार' हालत व्हायची ती वीणा घेणाऱ्या माणसाची. बर्याचदा हि धुरा लहान मुलांना सांभाळायला लागायची. आणि नंतर त्यांना सोडवायला कुणी वाली नसायचा !!! ....
अगदी अंत पाहिल्यावर कुणी तरी यायचा. पाऱ्याला सुरुवात करताना बर्याचदा आरंभाचा भजन हे नक्की भैरवी नाही या वरून बरीच मत मतांतरं व्हायची. म्हणजे कुणी तरी उत्साहात एखादा अभंग सुरु करायचा, मग कुणा माहित गराच्य लक्षात यायचा कि तो भैरवी आहे मग तो त्याला थांबवून दुसरा सुरु करायचा..... !!!!!!! मग त्या वरून भावकीत चर्चा चारच व्हायची. हक्काचा व्यासपीठ असायचा ते म्हणजे चहाची खोली. भजन करणाऱ्या माणसाना चहा मिळण्यासाठी ती थे व्यवस्था केलेली असायची.
हा चहा हि खास असायचा. स्टील चे कान अस्सालेले बारके कप.जे वाराशानुवार्षांच्या वापरणे कलकात मळकट झालेले असायचे. अशा लहान कप मध्ये लाल-मातकट रंगाचा चहा, चहा पावडर- साखर कोणत्याही प्रमाणात मिसळून केलेला असायचा. दुध जेमतेमच असायचा. (तरीही शहरातल्या घारण मध्ये प्याल्या जाणार्या चहा पेक्षा हि या चहा मध्ये साखर हि निर्विवाद जास्त असायची आणि चवही सुंदर असायची !!! ) तर असा चहा पिण्यात खरच आनंद वाटायचा, सगळ्यांच्या उपस्थितीत त्याला आपोआप अवीट चव यायची.
'पारा' संपल्यानंतर घरी जाण्यासाठी पुन्हा प्रत्येकाची घाई सुरु वयाची. काही वेळा पखवाज / नाळ/ मृदुंग वाजवणारा एखादा माणूस दुसर्या पर्यातल्या लोकांमध्ये अडकून पडायचा. त्याला बाहेर यायला आणि १०-१५ मिनिटा लागायची. पावसाची रिप रिप सुरु असेल तर जागरणाने दमलेले डोळे उघडे ठेवून कधी एकदा घरी जातो असा व्हायचा. एकमेकांच्या सोबतीने हा वेळ चटकन निघून जायचा.
लाक्ष्मिकानाताच्या देवळात श्रावणात येणाऱ्या पहिल्या बुधवारी एका दिवसाचा (२४ तास चालणारा ) भजनाचा कार्यक्रम असायचा त्याला 'एक्का' म्हणतात. या दिवशी रात्री १२ ते ३ चा 'पारा' आमचा म्हणजे -भाटवडेकर- जोगळेकर-खाडिलकर मेस्त्री आणि खास भजनासाठी रत्नागिरी हून येणारी 'टिळक आळी' तली 'जोशी' कंपनी !!! ठरल्याप्रमाणे मी रात्री ९-१०वजतच जोगालेकारांकडे डेरेदाखल व्हायचो ! कॅरम काढून खेळ सुरु व्हायचा. ११ नंतर जोशी कंपनी हळू हळू यायला लागायची. ती आल्यानंतरचा जोगळेकर an कडचा चहा ठरलेलाच !!! ते आल्यानंतर असशी काही मजा- मस्करी आणि गाड्यांच्या गप्पा सुरु व्हायच्या कि बस !!! वेळ संपूच नये असा वाटायचा.
'पारयाला' जाण्यासाठी सर्वात आधी उत्साहाने पुढे जाण्यात सर्वात ज्येष्ठ अस्सणारे 'तात्या काका' यांचं पुढाकार असायचा. या थोड्याशा अंतरात हि गाडी घेवून जाणारी तरुण मुला असताना हे काका आपलं ८० च्या पुढे असणारा वय बाजूला ठेवून अनवाणी पायाने चालत उत्साहाने जात असत "गाडी नको इथल्या इथे" असं सांगत !!
प्रत्यक्ष पाऱ्याला सुरुवात 'जोश्यांच्या' खास शैलीत व्हायची ती - 'वंदू गणराज सरस्वती भावे हरी भजनी रंग यावे ii' या अभंगाने ! पुढचे ३ तास मंत्रमुग्ध करणारा वातावरण असायचा. रमेश दादा, गिरीश दादा, धनुदादा, गुरुप्रसाद (गुल्लू ), हृषीकेश, गौरव या सगळ्या जोश्यांची वेगवेगळ्या प्रकारची भजनं म्हणण्यात हातोटी !! रमेश दादा ने एकदा म्हटलेला, 'क्षणभरा उघड नयन देवा' हा अभंग इतका अप्रतिम होतं कि देव खरोखर डोळे उघडणार आता असं वाटलं होतं मला !!! तात्या काका म्हणजे खरच कमाल. रात्रीच्या पाऱ्याला वीणा घ्यायला आम्हा मुलांची का- कु सुरु असताना हे आनंदात वीणा तास -तास घेवून राहायला तयार असत. एवढाच नवे तर वाढत्या वयामुळे दात पडलेले asatana हि जास्तीत जास्त सुरात अभंग म्हणण्याचा त्यांचा कटाक्ष असे. "मला काय करायचं? मी कशाला जावू एवढ्या रात्री?" अशी 'नेहमीची' फालतू करणं न देता, ज्या तळमळीने ती हि प्रभूसेवा करतात त्याला खरच तोड नाही. आणि आपण काही करतोय याचा गाजावाजा हि नाही ! हे सगळे 'जोशी' खरच 'ग्रेट' आहेत, या बाबतीत !
आमचा पारा सुरु असताना इतरही काही गोष्टी लाक्ष्मिकांताच्या 'पाठी मागे' सुरु असायच्या ! वर्गणीच्या पैशातून आणलेल्या 'विड्या' देवळात बसूनच काही 'नग' फुकट असायचे. ( नेहमी न ओढणारे हि त्या रात्री निव्वळ mandalachya पैशाने आहेत म्हणून राजी खुशीने 'फुकत' बसतात. काही जना मेंढीकोट चा डाव मांडून असतात. या कशातही रस नसलेले / करून करून दमलेले तिथेच झोपलेले. (या मध्ये पुढच्या पाऱ्याला 'उभे' राहणारे मुक्ख्यात्वे असायचे. इथेही चहा असायचा. जोश्यानमूळे आमचा 'पारा' सुश्राव्य' आणि ' संस्मरानिया होतो.
'जोगालेकारान्मुलेच' अनुभवता आलेली 'टिळक आली' तली दही हंडी. उंचावरून फेकलेले बुंदीचे लाडू झेलण्यासाठी केलेली धावपळ. वाळूची केलेली फेकाफेक. आणि वाळूतल्या खेळाची मजा. प्रत्यक्ष दही हंडी फुटे पर्यंतची उत्कंठा. आणि हंडी फुताल्यानान्ताराची 'खापरी' आणि इतर जे मिळेल ते पकडण्य साठीची धावपळ. या सगळ्या मध्ये पाण्याच्या अंगावर होणारा मारा.'गोविंदा-गोपाला' चा गजर. शेवटी दही काल्याचा प्रसाद. मग जोश्यांच्या घरी येवून चुलीतल्या गरम पाण्याने अंघोळ करून परतीचा प्रवास. खूप खूप वेगळा भासला आज, हाच आठवणीतला श्रावण मला. या वर्षी यातल्या एकाही गोष्टीला अनुभवता आला नाही, पण आठवणींची संततधार मात्र मनामध्ये आनंदाचा 'अभिषेक' करत राहिली.
Tuesday, August 31, 2010
Wednesday, August 25, 2010
मन हे श्रावणी माझे !!!
गर्द हिरवळ आनंदाची,
मोहक करतो नाजूक निर्झर,
धरा तोषली पर्जन्याने,
इंद्रधनू हि नभी प्रगटले,
मन हे 'श्रावणी' माझे !
धर्म जाहला भव भक्ती,
तृष्णा लागली साधनेची निर्मळ,
तन-मन भगवंती रंगले,
मन हे 'श्रावणी' माझे !!
सर्व स्वप्ने मानसीची,
अवतरणार हि प्रत्यक्षात,
लाभे स्वस्थता हि 'गुरु' कृपेने,
मन हे 'श्रावणी' माझे !!!
मोहक करतो नाजूक निर्झर,
धरा तोषली पर्जन्याने,
इंद्रधनू हि नभी प्रगटले,
मन हे 'श्रावणी' माझे !
धर्म जाहला भव भक्ती,
तृष्णा लागली साधनेची निर्मळ,
तन-मन भगवंती रंगले,
मन हे 'श्रावणी' माझे !!
सर्व स्वप्ने मानसीची,
अवतरणार हि प्रत्यक्षात,
लाभे स्वस्थता हि 'गुरु' कृपेने,
मन हे 'श्रावणी' माझे !!!
Tuesday, August 10, 2010
काही 'विस्मरणीय' क्षणांची निरीक्षणं !!!
आपण बर्याचदा वाईट गोष्टींबद्दल जास्त बोलतो, पण लिहितो कमी.त्यातूनही जे काही लिखाण होता ते वाईट गोष्टींचा समर्थन करण्याच्या उद्देशाने ! आज हे टाळण्यासाठीच काही खटकणार्या सवयीन विषयी रोख ठोक लिखाणाचा हा खटाटोप !!!
सकाळी सकाळी तोंड धुताना जोरजोरात खाकारणारा रूम मेट दिसला कि आधी त्याचा राग येतो आणि नंतर कीव ! आपण काही चुकीचा , किंवा आक्षेपार्ह असा काही करतोय हे त्याच्या गावीही नसता. दात घासत घासत अख्या फलाट भर फेरफटका मारणं ( ते हि फ़क़्त अंतर्वस्त्रांवर) इतरांना किती किळसवाण वाटता हे यांना बाप जन्मात कळणारच नाही. दाढीच्या न धुतलेल्या ब्रश पासून, कपडे धुतल्यानंतर बादली मध्ये शिल्लक 'ठेवलेल्या' पाण्या पर्यंत पर्त्येक गोष्ट यांना 'कान' पकडून दाखवायला हवी का प्रत्येक वेळी ?
बरं हे सगळा गृहीत धरायला हि काही झोपड पट्टीतली लोक आहेत का ? तर मुळीच नाहीत. हे सर्व डॉक्टर, इंजिनियर, एम बी ए, असे उच्चशिक्षण घेतलेले (तथाकथित) हुशार लोक आहेत, या सारखा दुर्दैव दुसरा काय असू शकता !! मळके कपडे १०-१५ दिवस साठवून, मग ते हि 'चुर्याच्या' पाण्यातून काढून टाकले कि हे हुस्षा करायला तयार. कपडे नीट ब्रश ने घासून (धोपटून नव्हे ! ) धुणे, नीट पिळून ,झटकून, उलटे करून वाळत टाकणे यांना खरच कुणी शिकवला नाही, का यांना करायचा नाही हे देव जाणो. आपण नीट न पिळता, न पसरता टाकलेल्या कपड्याचा पाणी पाघळंताना सारखा निनादत (टपकत) राहत, आणि इतरांना त्रासदायक होतं.
'फलाट' मध्ये प्रत्येक खोलीत पायातले बूट घालून वावरणं, अंथरूण - पांघरुनांची घडी अमावस्या पौर्णिमेला करणं, बेड शीट्स वर्ष- सहा महिन्यांनी धुणं (पाण्यातून काढणं !!), खोलीतला केर हा फ़क़्त कामवाल्या 'बाईं' नीच काढणं हे यांचा मुलभूत सूत्र असतं. आपण केरसुणी हातात घेणा म्हणजे 'पातक' अशी यांची मानसिकता असते. हीच लोक फलाट बाहेर पडताना मात्र, ब्रानडेड कपडे आणि वर दिवोद्रांत चा फवारा मारून अशा थाटात बाहेर पडतात कि बास.....! बाहेर असाच थाटात राहणारा एक 'प्राणी' प्रत्यक्षात त्याच्या खोलीत, अक्षरशः कचरा कुंडीतल्या झुरळासारखा राहताना मी बघितला आहे.
असे प्राणी जगतात कशाला ??? एक तर, इतरांना त्रास देणाऱ्या या 'पिसवा' तयार होण्याआधीच ठेचून काढल्या पाहिजेत किंवा या प्राण्यांना लहानपणा पासूनच 'माणूस' बनून जगणं शिकवला पाहिजे. आयुष्य चवीने जगण्यात मजा आहे, कधीतरी 'मिसळ' ठीक आहे, पण म्हणून चौरस आहाराचा महत्व कमी होत नाही ना ? अर्थात चव फार दूरची गोष्ट आहे !! इथे लोकांना चव आणणारं 'मीठ' वाटीत चमचा ठेवलेला असताना हाताच्या बोटाने (वाढलेली, घाण अडकलेली नखं सोबतीने आलीच !! ) घेण्याची 'घाण' सवय आहे. माझ्या बरोबर शिकणारी मुलं ज्यावेळी एकत्र डबा खातात त्यावेळी मला तर एकाच घमेल्यातला 'आंबोण' खाणारी 'जोगळेकरांच्या' गोठ्यातली गुरं जास्त सुसंस्कृत वाटतात. खाताना 'चक-चक' आवाज करत खाणे, 'डाव्या-उजव्या' हाताने एकाचवेळी पोळी/ भाकरी खाणे, त्यातही भलत्या उत्साहाने ती इतरांना देणे. संपणार नाही एवढी भाजी, भात मागून घेणं, आणि नंतर पानात 'टाकणा' या मध्ये 'मेस' च्या मालकाला डूबवणं येवढा एकच हेतू असावा बहुतेक. यांचा हेतू, किंवा कारण काहीही असला तरी अन्न वाया जातंच ना ?
एवढ्या सध्या सध्या गोष्टी जर यांना कळत नसतील, किंवा यांच्या अंगी बाणल्या नसतील तर एकतर शिक्षणाच्या पद्धतीत दोष आहे. किंवा यांच्यावर होणार्या संस्कारात तरी. आणि हि दोन्हीही करणं नसतील तर याना 'आपण नक्की 'पिसवाच ' म्हटला पाहिजे असा माझं ठाम मत आहे. तुम्हाला काय वाटतं ??

Subscribe to:
Posts (Atom)