Tuesday, August 10, 2010

काही 'विस्मरणीय' क्षणांची निरीक्षणं !!!

आपण बर्याचदा वाईट गोष्टींबद्दल जास्त बोलतो, पण लिहितो कमी.त्यातूनही जे काही लिखाण होता ते वाईट गोष्टींचा समर्थन करण्याच्या उद्देशाने ! आज हे टाळण्यासाठीच काही खटकणार्या सवयीन विषयी रोख ठोक लिखाणाचा हा खटाटोप !!!

सकाळी सकाळी तोंड धुताना जोरजोरात खाकारणारा रूम मेट दिसला कि आधी त्याचा राग येतो आणि नंतर कीव ! आपण काही चुकीचा , किंवा आक्षेपार्ह असा काही करतोय हे त्याच्या गावीही नसता. दात घासत घासत अख्या फलाट भर फेरफटका मारणं ( ते हि फ़क़्त अंतर्वस्त्रांवर) इतरांना किती किळसवाण वाटता हे यांना बाप जन्मात कळणारच नाही. दाढीच्या न धुतलेल्या ब्रश पासून, कपडे धुतल्यानंतर बादली मध्ये शिल्लक 'ठेवलेल्या' पाण्या पर्यंत पर्त्येक गोष्ट यांना 'कान' पकडून दाखवायला हवी का प्रत्येक वेळी ?
बरं हे सगळा गृहीत धरायला हि काही झोपड पट्टीतली लोक आहेत का ? तर मुळीच नाहीत. हे सर्व डॉक्टर, इंजिनियर, एम बी ए, असे उच्चशिक्षण घेतलेले (तथाकथित) हुशार लोक आहेत, या सारखा दुर्दैव दुसरा काय असू शकता !! मळके कपडे १०-१५ दिवस साठवून, मग ते हि 'चुर्याच्या' पाण्यातून काढून टाकले कि हे हुस्षा करायला तयार. कपडे नीट ब्रश ने घासून (धोपटून नव्हे ! ) धुणे, नीट पिळून ,झटकून, उलटे करून वाळत टाकणे यांना खरच कुणी शिकवला नाही, का यांना करायचा नाही हे देव जाणो. आपण नीट न पिळता, न पसरता टाकलेल्या कपड्याचा पाणी पाघळंताना सारखा निनादत (टपकत) राहत, आणि इतरांना त्रासदायक होतं.

'फलाट' मध्ये प्रत्येक खोलीत पायातले बूट घालून वावरणं, अंथरूण - पांघरुनांची घडी अमावस्या पौर्णिमेला करणं, बेड शीट्स वर्ष- सहा महिन्यांनी धुणं (पाण्यातून काढणं !!), खोलीतला केर हा फ़क़्त कामवाल्या 'बाईं' नीच काढणं हे यांचा मुलभूत सूत्र असतं. आपण केरसुणी हातात घेणा म्हणजे 'पातक' अशी यांची मानसिकता असते. हीच लोक फलाट बाहेर पडताना मात्र, ब्रानडेड कपडे आणि वर दिवोद्रांत चा फवारा मारून अशा थाटात बाहेर पडतात कि बास.....! बाहेर असाच थाटात राहणारा एक 'प्राणी' प्रत्यक्षात त्याच्या खोलीत, अक्षरशः कचरा कुंडीतल्या झुरळासारखा राहताना मी बघितला आहे.

असे प्राणी जगतात कशाला ??? एक तर, इतरांना त्रास देणाऱ्या या 'पिसवा' तयार होण्याआधीच ठेचून काढल्या पाहिजेत किंवा या प्राण्यांना लहानपणा पासूनच 'माणूस' बनून जगणं शिकवला पाहिजे. आयुष्य चवीने जगण्यात मजा आहे, कधीतरी 'मिसळ' ठीक आहे, पण म्हणून चौरस आहाराचा महत्व कमी होत नाही ना ? अर्थात चव फार दूरची गोष्ट आहे !! इथे लोकांना चव आणणारं 'मीठ' वाटीत चमचा ठेवलेला असताना हाताच्या बोटाने (वाढलेली, घाण अडकलेली नखं सोबतीने आलीच !! ) घेण्याची 'घाण' सवय आहे. माझ्या बरोबर शिकणारी मुलं ज्यावेळी एकत्र डबा खातात त्यावेळी मला तर एकाच घमेल्यातला 'आंबोण' खाणारी 'जोगळेकरांच्या' गोठ्यातली गुरं जास्त सुसंस्कृत वाटतात. खाताना 'चक-चक' आवाज करत खाणे, 'डाव्या-उजव्या' हाताने एकाचवेळी पोळी/ भाकरी खाणे, त्यातही भलत्या उत्साहाने ती इतरांना देणे. संपणार नाही एवढी भाजी, भात मागून घेणं, आणि नंतर पानात 'टाकणा' या मध्ये 'मेस' च्या मालकाला डूबवणं येवढा एकच हेतू असावा बहुतेक. यांचा हेतू, किंवा कारण काहीही असला तरी अन्न वाया जातंच ना ?

एवढ्या सध्या सध्या गोष्टी जर यांना कळत नसतील, किंवा यांच्या अंगी बाणल्या नसतील तर एकतर शिक्षणाच्या पद्धतीत दोष आहे. किंवा यांच्यावर होणार्या संस्कारात तरी. आणि हि दोन्हीही करणं नसतील तर याना 'आपण नक्की 'पिसवाच ' म्हटला पाहिजे असा माझं ठाम मत आहे. तुम्हाला काय वाटतं ??

No comments:

Post a Comment