Sunday, June 30, 2013


डॉ. राधिका राघव  सामंत. 
"मनु  आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !" 
"आपण एशती ने जाऊया  आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत  नव्हतं  मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं  वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या  मनाची घालमेल होत असताना 
या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं  खरच समंजस असतात. मुल समजूतदार आहेत याचाच खूप आनंद अहे,'माई' "
"राधिका माझ्या लेकीच्या वयाची. पूर्वी राहायला आमच्या शेजारीच होति. आता दवाखाना असतो. अधे मध्ये वेळ मिळाला कि फेरी मारते. दोघींचा हि मन मोकळा होता.सावंतांची मुलगी आंतरजातीय विवाह करून सामंताकडे आलेलि. 
सुरवाती सुरवातीला मला 'काकी' म्हणयचि तेवढाच बाकी उच्चार वगैरे स्पष्ट, नंतर तीही मला  'माई' म्हणायला  लागलि  . नवरा  बायको दोघाही डॉक्टर ! पण मनाने  एकदम साधी माणसं. 
"

: डॉ. राधिका राघव सामंत.
मनुला विचारलं,"मनु आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !"
तर म्हणे "आपण एशती ने जाऊया आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत नव्हतं मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या मनाची घालमेल होत असताना या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं खरच समंजस असतात.माझी मुलगी समजूतदार आहे याचाच जास्त आनंद वाटतो, 'माई' . "
मनूची आई म्हणजे राधिका फार पूर्वी आमच्या शेजारी राहायला होति. आता अधे मध्ये भेटायला येते केव्हा तरी . मन मोकळ होतं दोघींचा हि. माझ्या लेकीच्याच वयाची आहे. कष्टाळू आहे लग्न होऊन नुकता संसार सुरु झाला तेव्हा आमच्या वाड्यात राह्यला होति. आंतरजातीय लग्न करून
सावंतांच्या घरातून 'सामंतांच्या घरात आलि आहे हे सांगितल्या शिवाय कळणार नाही असा 'जोडा' दिसत होता. दोघही डॉक्टर !
मला वाड्यात बाकी सगळे 'माई' म्हणायचे हीच एकटी 'काकी' म्हणायची. तेवढी एक गोष्ट सोडली तर विशेष काही खटकण्या जोगं नव्हताच.वाड्यातच तिचा दवाखाना सुरु झाला आणि मग हळू हळू खरी ओळख होत गेलि. आधी मला 'काकी' म्हणणारी राधिका मग 'माई' केव्हा म्हणायला लागली तेच कळलं नाही
'मनुच्या' वेळी राधिका माहेरी गेली आणि राघव ची ओळख झाली.
"एकदम बोल घेवड्या स्वभावाचा माणूस, हुशार आणि माणुसकी अस्लेला ! रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला राघव हा संपूर्ण महाविद्यालयात चर्चेचा विषय असयचा. मुलींमध्ये तर तो प्रसिद्ध होत. एकाच वर्गात अस्साल्यामुळे, प्रात्यक्षिक, अभ्यास, सहली, ग्रंथालय इ कारणाने आमचा सहवास वाढला आणि आम्ही उभयता एकमेक्न्च्या प्रेमात पडलो ! यथावकाश लग्न झालं  आणि आम्ही वाड्यात राहायला आलो" असा राधिका कडून ऐकला होता. 
"वाचन, गप्पा, आणि गाड्या यांची अत्यंत आवड असणारा हुशार, निर्व्यसनी माणूस. प्रश्नांच्या सरबत्तीने रुग्ण हैराण होत. एकच गोष्ट तीन तीनदा विचारल्यावर दुसरा काय होणार ? तेवढी एक बाजू सोडली तर माणूस एकदम छान! पण उपयोग नाही. दिवसभरात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावत गेलि. मनूच्या जन्मानंतर राधिका आली आणि मग कुठे गाडी रुळावर आली . तिने मात्र छान नाव कमावलं ! अख्या गावातून रुग्ण यायला लागले. ती नसेल तर रुग्ण दुखणं अंगावर काढत पण इतर डॉक्टरांकडे जात नसत.नंतर मग त्यांनी सदनिका घेतलि. तिकडे राहायला गेलि. पण दवाखाना सुरूच अहे. अधे मध्ये येते वेळात वेळ काढून मला भेटायला !"
"माई, माणूस प्रगती करतो म्हणजे नेमका काय करतो ? स्वतःवर गरजे पेक्षा जास्त जबाबदार्या लादून घेण आणि त्या पेलतां येण म्हणजे प्रगती का ? मग त्यात समाधानाचा हि विचार झाला पाहिजे ना?"
"मागच्या वेळेला सदनिकेचा व्यवहार झाल्यावर आली तेव्हा सहज म्हणाली, म्हटला "हो ग पोरी !" बरोबर आहे तुझा !"
"माई,लग्नानंतर च पहिला वर्ष कसा मजेत गेलं . नंतर संसार किती कठीण आहे ते कळायला लागलं . सुरवातीला सगळ्यांनी मदत केली कौतुक केलं. आता काळात नकळत आमची इतरांशी तुलना होत रहते.  राघव च घरच्या मदतीवर अवलंबून राहणं पटत नाही मला ! आम्ही दोघाही डॉक्टर असताना सासू सासार्यांना आमचा भार वाहवा लागू नये अशी इच्छा अहे. राघव चा दवाखाना निट चालत नाही . समुपदेशकाची नोकरी ज्यामध्ये त्याचा हातखंडा  आहे तशी काही संधी त्याने शोधावी म्हटलं तर ते 'नाही ' म्हणतो . इकडे माझाच संसार मी कसा बस चालवते आहे . जमेल तसा माझ्या परीने, सासू सासरे , नातेवाईक , आई बाबा आणि भावंड यांचा आदरातिथ्य, कौतुक करत अहे. तरीही 'बाबांची' अपेक्षा आहे कि "मोठी बहिण म्हणून तू इतर दोन बहिणींचा लग्नाचा खर्च केला पहिजेस. "! एकीकडे मुलाचा दवाखाना चालत नाही याच्या पेक्षा सुनेचा दवाखाना चांगला चालतो म्हणून सासू सारे नाराज आहेत . रुग्णाचा / रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला आणि त्यांनी "डॉक्टर बाई आहेत का ? " असा विचारल्यावर राघवच्या कपाळावर पडणारी आठी ! "हि अवस्था तुझी तू करून घेतली आहेस ! काय बघितलास याच्यात ? हेच का ते प्रेम ? " हा आई बाबांकडून  होणारा उद्धार . गाडीवरून  दवाखान्यात येवून प्रवासाने आणि दग्दगिने  शरीर दमत 'माई' "
"शरीरापेक्षा मन नाजूक आहे .एक वेळ औषधाने ठणका थांबेल, वेदना कमी होईल पण दुखाची जाणीव आणि भय नाही काढून टाकता येत ! बाटलीत बंद केलेल्या विषारी सापासारखा आपण मुळ  प्रश्न कैद करून ठेवतो. पण प्रश्न कैद केला म्हणून त्याची दाहकता आपल्याला लगेच त्रास देत नाही इतकच. बाटलीच्या आत दाबून ठेवलेला विषारी फुत्कारांच  अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. मनपटलावर आशा निराशेचा लपंडाव सतत सुरु असतो . प्रारब्ध, वास्तव आणि मन या तिन्हीचा परिणाम हा शरीराला भोगावा लागतो . शरीराला होणार्या वेदनेला, दुक्खाला आपण जर का समजुतीची फुंकर मारली तर तेच दुक्ख हे शरीरासाठी शक्तिस्थान होतं ! "
"आज नेमकी घडी इथेच विस्कटली आहे. मुला पालकांचा ऐकत नाहीत, पालक मुलांचा ऐकत नाहीत, नवरा बायकोचा ऐकत नाही, बायको नवऱ्याच ऐकत नाही, कुणी कुणाच ऐकायचं नाही असच जणू ठरवलंय ! 'माझा कुणी ऐकत नाही, माझ्या मताला किंमत नाही' याची जाणीव मनाला होणा हा एक आघात अहे. आणि असा आघात सतत होत राहिला तर त्याचा परिणाम हा मन;शक्तीवर आधी होईल आणि तद्नंतर त्याचे परिणाम हे शरीरावर दिसत राहतील. आपण जी काही धावपळ करतो, ती ज्यांच्या साठी करतो त्या 'आपल्या' माणसांनाच त्याची जाणीव नसणं हेच बरेचदा आपल्या दुक्खाच कारण असतं. निव्वळ कष्ट करून शरीर दमेल पण आजारी पडणार नाही, आणि समजा पडलच तरी विश्रांतीने ते बरं  होइल.मानसिक कष्टाचं  काय ? "
"म्हणूनच मी माझ्या दवाखान्यात फार मोजकं  बोलते, दवाखान्यातला बहुतांश वेळ मी डॉक्टर न राहता 'श्रोता' होते. 'डॉक्टर पण माझं ऐकतात म्हणजे मी कुणीतरी अहे. माझ्या मताला कुणीतरी मान देतं', अशा भावनेतून होणारा मनाचा निचरा हेच खरं औषध असतं !बर्याचशा आजारांच मुळ हे असा जाणीवपूर्वक स्वताकडे केलेल्या दुर्लाक्शातच असत, ते कधी आपण स्वतः करत असतो तरी आपल्या आजूबाजूची लोक करत असतात . "
"मला समजून घेणारं  कुणी भेटलं नाही . राघव हा अपवाद, म्हणून मी आज त्याच्या बरोबर आहे. मी जिद्द हरलेली नाही . आज मी दवाखान्यात असताना मुलांना भरवण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट राघव मनापासून करतो . याचा मला आनंद आहेच पण त्याच्यासारख्या माणसाचं , ज्याचा अभ्यास माझ्यापेक्षा अधिक आहे, चिकित्सा अचूक आहे हे असं व्हावं हे मलाच खटकत. दवाखाना चालत नाही, याचा दोष मी त्याला अजिबात देत नाही . हीच वेळ / हेच कारण असेल कि ज्याकरता त्याला माझी गरज लागेल, अशावेळी मी त्याच्यासोबत राहिलाच पाहिजे . भलेही आज लोकांच्या दृष्टीने मी त्याच्यापेक्षा यशस्वी असेन, पण माझ्या करता आज मला काही शंका आली / संकट आलं  तर तो माझ्याकरता इथे आहे हीच मोठी गोष्ट आहे! एक चांगला डॉक्टर होण्यापेक्षाही तो एक चांगला माणूस आहे हेच जास्ती महत्वाच आहे ."
"लग्नाचा निर्णय हा माझा होता, आज जे काही आहे त्याला मीही तितकीच जबाबदार आहे. माणसाला जगण्यासाठी प्रेम लागतं हे खरच, पण निव्वळ प्रेमात पडून संसार चालवण हे खूप जिकिरीच काम आहे. व्यवहाराचा तोल सांभाळता आला तर उत्तम. मुलांच्या शिक्षणाचा विचार करून हौशीने घेतलेली चारचाकी गाडी विकूया अस मी राघवला म्हटलं, तो तयार झाला माझ्यासाठी, मुलांसाठी पण  मुलं  समजून घेतील का ? का त्यांना वाईट वाटेल ? त्यांचा हिरमोड होईल असा वाटला होतं. पण 'माई' मनूच्या उत्तराने खरंच बरं  वाटलं ! याच वयात आलेला समजूतदार पणा  पुढच्या शंभर ठेचा वाचवतो. "


गुरुप्रसाद हरी खाडिलकर . 
रांजणगाव 
पहाटे  ३. १२ वा 
पुनर्लिखित. 
(मुळ  लिखाण रात्री १. १ मिनिटांनी नजरचुकीने पुसले गेले. )

'वर्तुळ'  ! 


पुण्याच्या आय एफ बी आय मध्ये प्रवेशा पासून सुरु झालेला प्रवास (कि फरफट ?), उद्या  संपणार ! पुण्यातून सुरु झालेला एक वर्तुळ उद्या पुण्यापासून पन्नास किलोमीटर वर पूर्ण होणार . नंदुरबार , शिरूर आणि मग रांजणगाव अशी त्रिस्थळी यात्रा आटपून नवा प्रवास 'सुसाट' सुरु  होणार ! दापोली सोडताना डोक्यात बर्याच कल्पनांचं वावटळ घोंघावत होत. कुठल्यातरी क्षणी त्या वादळाची दिशा अकल्पित पणे 'केरळ' च्या दिशेने वळली . वादळ घोंघावत शांत झाल, त्या वेळी माझं अस्तित्व 'पालापाचोल्याहून' वेगळा उरला नव्हत !  'पुढे काय ?' हा प्रश्न माझं बोट सोडायलाच तयार नव्हता. अशा वेळी नाईलाज म्हणून आलेली एक संधी स्विकारली… उत्तर मिळाल्याचा आनंद व्हायच्या आत 'चालू असलेला प्रशिक्षण' सोडून मी रस्त्यावर (अक्षरश:) आलो ! 'माझ्या कामापेक्षा माझ्या पोशाखाला महत्व देवून त्याचाच 'बभ्रा' करणाऱ्या लोकांबरोबर मला काम करायचा नाही या एकाच विचाराने  मी तिथून निघालो . (१  मला त्यांनी काढला नव्हतं, २. माझा पोशाख गबाळा / अस्वच्छ नव्हता . ३ अपेक्षित  पोशाखा  संबंधी कोणतीही सूचना मला तिथे पोचण्या आधी केली गेली नव्हती .). 
माझ्या 'भारतीय' पोशाखाला  'नावं' ठेवणार्यांच्या हातातल्या  'विदेशी' बनावटीच्या 'सिगरेटी  त्यांना चालत होत्या पण माझा पोशाख चालला नाही .   हा प्रकार मला पटला नाही. मी बाहेर पडलो . 
'शेकड्यांनी' (होय !!) दिलेल्या बँक आणि इतर आस्थापनांच्या प्रवेश प्रक्रिया मी माझ्या 'सुमार दर्जाच्या ' गणितामुळे 'पास' होऊ शकलो नाही . दुसरा मार्ग दिसत नसताना वर्तमान पत्रात आलेल्या 'एका चार महिन्यात नोकरी मिळवा ' या जाहिरातीला बळी पडलो आणि आय एफ बी आय पुणे इथे दाखल झालो . कोर्स चालू व्हायलाच दोन महिने गेले. पुढचे आठ महिने 'कोर्स' चालूच होता … ! नातेवाईक, मित्र, आणि घर कुहेही  जाणं जीवावर यायचं. 'मग कधी नोकरी ??' या प्रश्नाच  उत्तरच नसायचं ! दुश्काळात तेरावा महिना म्हणजे 'हातात पडलेल्या 'नेमणूक पत्रावरच नेमकं  माझचं  नाव चुकीचा छापलेला असल्यामुळे आणि एक महिना वाया गेला . 

शेवटी एकदा नेमणूक पत्र मिळालं ! मुंबई, रत्नागिरी ,सुरत आणि पुणे असा अपेक्षित ठिकाणांचा क्रम दिलेला असताना … माझी रवानगी थेट 'नंदुरबार' मुक्कामी केली होती ! पहिल्याच दिवशी बँकेत गेलो, काहीही काम न करता निव्वळ बाकड्यावर बसून सर्वांची ओळख परेड होऊन जेव्हा रात्री खोली वर परत आलो तेव्हा इतका दमायला झाल होतं कि बस्स ! गाढ झोपलो . तीन चार दिवसांनी बँकेपासून तीन चार किलोमीटर लांब अंतरावर  खोली भाड्याने घेतली . 
पहिल्या दोन दिवसातच मी झोपेत असताना चोर खोलीत फिरून माझे खिसे साफ करून, खिशातले देवाचे फोटो आणि इतर कपडे , पिशव्या बाहेर फेकून गेले हे सकाळी कळलं ! पहिल्या मजल्यावर 'लागतील तशा आणि लागतील तेवढ्या' बादल्या भरून न्यायच्या ! सकाळी आठ सव्वा आठ ला बाहेर पडायचा  आणि रात्री नऊ  दहा वाजेपर्यंत परत यायचा ! रविवारी धोबीघाट काढायचा  ! 'कागदावर बहुल आणि प्रत्यक्षात मारवाडी बहुल अस्सालेल्या या भागात सकाळी भजी, फाफडा, तिखट पोहे  इ  आणि  एरवीच्या जेवणात  कांदा आणि मिरची यांची सवय व्हायला लागली तो पर्यंत नंदुरबार सोडायची वेळ आली . सुरभी ची खिचडी, घी  बाजारातल्या गणपती देवाला जवळची 'कच्छी  दाबेली' , तिथलाच 'दही वडा' यांची आजही आठवण येते. 

नंदुरबार पासून काऊनटर क्रमांक एक आणि मी एकरूप झालो ! ती शाखा अशी नव्हतीच मुळी ! एक साधी चिंचोळी पट्टी  होती ज्यामध्ये एका रेषेत टेबल आणि खुर्च्या मांडून तिची 'बँक' केलेली होती ! एसी नव्हताच… पंखे होते पण कागदपत्रे उडतील म्हणून तेही बंदच ठेवावे लागायचे ! 'घामाघूम ' व्हायला व्हायचं ! विवेक, जितु, तुषार, आणि विजू  यांच्या करामती आणि कसरती मुळे  मजा यायची .दिवसातून दोन वेळा चालत 'क्लिअररिंग हाउस ' ला जावं  लागायचं… बाजारातली माणसांची गर्दी , गाढवं , गुरं , बकऱ्या, हातगाड्या,गाड्या  आणि 'भाजून ' काढणार ऊन , या सगळ्यातून ख्न्द्याला लावलेली पिशवी 
घेवून सुसाट धावत सुटायचं - रोज तेही दोन वेळा- बारा वाजून पंधरा मिनिटांनी आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी ! दुपारच्या फेरीत 'गाणी ऐकणा, एखादि डुलकी काढणं, आणि नंतर  'टी टी ' करून  एखाद्यावेळी वाटे तल्याच  वाचनालयातून पुस्तक बदलून आणणे इ कामे करावी लागत ! 

नंदुरबार ला वैतागलो होतो आणि आता इथून सुटका होणारच नाही असं लक्षात  आल तितक्यात 'निव्वळ' नशिबाने  ध्यानी मनी नसताना 'शिरूर' ला बदली मिळाली .
 शिरूर ला आलो याचा आनंद फार काळ टिकला नाही. तिथल्या शाखेतल्या  माणसांची (प्रमुख), वागण्याबोलण्याची पद्धत आणि 'विमा' विकण्याची केली जाणारी सक्ती या गोष्टी मला न पटणार्या होत्या ! तिथल्या प्रमुखाच्या या मुजोरीचा 'बंदोबस्त' करण्याचा एक छोटा प्रयत्न मी तिथल्या फक्त दीड महिन्याच्या कालखंडात केला . 'ग्राहकाला' दुरुत्तरे करणारा हा प्रमुख 'माझ्या' 'खेळी' ने नामोहरम झाला ! त्याला त्याच ग्राहकाच्या मागे माघार घेत फिरावं  लागलं. मी शांतपणे सगळं पाहत होतो !

निव्वळ एक दिवसाकरता म्हणून मला 'रांजणगाव' ला पाठवला गेलं ! कोणताही पूर्वानुभव नसताना पहिल्याच दिवशी एकशे दहा ' क्याश एन्ट्री'  केल्या ! 
दुसर्या दिवशी परत निघालो . वाटेत असतानाच उप व्यवस्थापकांनी बोलावून घेतलं ! "तुझं काम आवडलं तू इथेच थांब आजपासून … वरिष्ठांशी बोलणं झालाय ! " त्या दिवसापासून उद्या पर्यंत या शाखेत आहे ! सह कर्मचारयांबरोबर  यथेच्छ भांडण, मस्करी , मजा  अनुभवली . सर्व प्रकारच्या ग्राहकांशी, त्यांच्या माणसांशी बोलण्यात , भेटण्यात  एक प्रकारचा आपलेपणा आहे . हा आपलेपणा  आणि आदर असे पर्यंत इथून बाजूला होण्यात मजा आहे . हा एक भाग  आणि दुसरा म्हणजे वाढत चाललेली अंतर्गत अरेरावी आणि मुस्कटदाबी . ज्यांनी कधी बँकेत काम केला नाही अशा माणसाच्या हातात हे जर का शाखेची सूत्रे देवू लागले तर अशा माणसाला वरिष्ठ मानून  काम करणं हे हाताखालच्या लोकांसाठी अवघड होत.  अशा व्यक्तींच्या अज्ञानाचा  आणि त्यांच्या अंदाधुंद  मनमानीचा मी मिळेल तेव्हा अधिकृत विरोध नोंदवला . माझ्या कृतीला  एकदा यश मिळालं . शाखा व्यवस्थापक बदलला. नको तिथे नियमावर  बोट ठेवून पदाच्या जोरावर डरकाळ्या फोडणाऱ्या लोकांना 'त्यांची' जागा दाखवून देण्यात मी हयगय केली नाही . माझा स्पष्ट विरोध, आणि योग्य आक्रमण ज्यांना पटला त्या माणसांनी मला मदतही केली . सुदैवाने मला दुसरी संधी मिळाली . 

'राजीनामा' दिल्यानंतर  मला अनेकांचे खरे चेहरे कळले . राजीनामा दिल्यावर झालेल्या भेटीत 'यांनी' आज पर्यंत   जाणीव पूर्वक  दुर्लक्षित केलेले 'गुण' कळले . त्या कौतुका पाठोपाठ 'कशाला जातोस ? जाऊ नकोस !! अशी विनवणी … आणि या विनंतीला मी पूर्ण सौजन्याने 'नकार'  दिल्यावर सुरु झालेला 'सुडाच' राजकारण ! हे सगळा पचवणं अवघड गेलं ! नऊ ते सहाच्या पलीकडे जाऊन समोरच्या माणसाला त्याच  स्वतः च आयुष्य आहे,  'मत आहे'  हा विचार हि समजून न घेणाऱ्या  या माणसाना 'वरिष्ठ' कसा म्हणायच ? ''तोंडाने' व्यावसायिकतेच्या गप्पा मारायच्या आणि स्वतः  असं  सूडबुद्धीने वागायच! 
'मला लेखी ताकीद देण्याचा केविलवाणा  प्रयत्न त्यांनी केला … मी  पुन्हा 'हल्ला ' केला ! त्यांच्या वर्मावर आणि कुकर्मावर बोट ठेवला ! बास … माझ काम झाल … माझा मार्ग मोकळा झाला ! 

'केरळ ' मध्ये मी पाला पाचोळा होऊन जमिनीशी एकरूप झालो होतो म्हणून मी हि हिम्मत करू शकलो .  

एकीकडे वरिष्ठांचा हा अनुभव येत असताना … ग्राहकांनी आणि सहकारयानी  उदंड प्रेम दिला . 'साहेब कशाला जाता ? या कि  इकडच … !
इथपासून ' सेटिंग लावून देवू का ? इकडचा पोष्टिंग देतो तुम्हाला … इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या . !!
गाडीवरून पडल्यावर तर सहकाररयानी  आणि ग्राहकांनी (सुहृदांनी ) केलेल्या मदतीला तर तोडच नाही ! 

योगायोग असा कि पहिल्या ठिकाणी मी ज्या पोशाखात 'रस्त्यावर' आलो तसाच पोशाख घालून मी इथला 'राजीनामा ' दिला !!

आणि एक वर्तुळ पूर्ण झाला . 
यावेळी माझ्याकडे संधी आहे आणि माझी स्वताची गाडीही आहे . 

श्री  महागणपती कृपा !

गुरुप्रसाद हरी खाडिलकर. 
रांजणगाव. 
२ ९ / ० ६ / २ ० १ ३ . 
संध्याकाळी ६. ० १वा . 

Friday, March 8, 2013



"Dear Sir,

Few years back, I started my career as an officer. I made few mistakes, no doubt. Professional life and routine work processes were something which I found boring initially. It was a time when I was living two different life's altogether.One with my physical presence in office and other on emotional plane. During first few day's some one asked me to to fill the pay-in-slip for the customer. such a small task one may fill, but while doing that little thing I became emotional, eyes full with tears.Tears about my condition,it was really painful experience for me. I realized at that moment, 'life has got changed, now I have become Clerk ! Yes an ordinary clerk in reputed organisation. With dream of grabbing any 'Post' with 'higher' responsibility, more powers and needless to say a 'hefty pay package' was crushed already I was no option but to fill the 'pay in slip' as dictated by others. Realization of having 'no self value in the 'eyes of others' broke me emotionally at that moment.   But with the co-operation of other team mates and your support I learnt many things. I don't know how successful I was, but for sure I saw you as an idol/ role model.

I trusted you at my best possible capacity thinking that  'you' understand the reality and treat others with humanity. All my colleagues were looking at you and treating you as a 'boss' or 'super boss', I never saw towards you with such a limited approach. Instead I respected you as a good human being who understands the 'next' person and tries to become a good individual at every moment. You did one personal favor on me and made my transfer possible.Without your initiative it was just impossible, I knew. You took me along, I was happy with the change.

With change in  profile, priorities changed I agree. In changing scenario distance between me and you grown slowly and steadily. It was not that 'belief' in you got changed, but kind of 'response' from your end got changed dramatically. I respect the difference of opinion, but I can never accept 'difference' in treatment. As you already know 'keeping myself in limelight' is something I don't like to do. I was and will never attempt to show a lavish goody goody picture  and win praises from you. instead I will prefer to get 'scolding' from you for my  lapses / wrong doing if any. To do artificial show casing of my work/ my ability is something  I will never prefer. Instead I believed 'yardstick' of customer satisfaction and 'reality' at workplace should judge my performance. Performance is something different from 'proving' your performance. Tendulkar or any player for that matter, only plays his game. He never keeps it's records.But cricket  fan knows  the 'player' by his game / talent first, bookish record comes latter.( I know I am no where in front of Tendulkar.) Fake reporting and fraudulent documentation can raise the 'name' and 'fame' of oneself for a shorter period of time, but it will not fulfill the purpose of accessing one's capacity from organisation's point of view in a larger perspective. As it is made up of many individuals ranging from peon to managing director. Each ones contribution to increase the profitability is necessary. 'delivering great results by forcing customers or co-staff may give unbelievable numbers for a shorter span of time, but eventually this  'greed' will kill the 'name' and 'stature' of the organisation.One can borrow the money but when it comes to the 'trust' you need the persons with integrity and principles. There are 'n' number of such silent and unheard ground level workers which are contributing to presence of 'organisation', there little contribution gets neglected and they suffer on professional and personal front. Without there silent  presence, 'roaring' business earners can not deliver. In order to grow high in the sky tree must spread it's roots deep in to the ground, without this support it will collapse at any times.

As a experience leader you may have different take on this subject but I am penning it for some other reason.
Earlier I used to believe that you always take 'your' own decision, and 'order' us accordingly. But sorry to say, for last couple of months I am finding that you are believing in 'what is shown' to you. The certain individuals which are 'over' ambitious and 'smart' enough to take advantage of your 'good'  nature and having direct access to you are 'taking you away from the reality. and influencing your decisions.' I know I am too small to say all this, but can't resist. I don't want to gain anything out of it, I am happy with the little what I have.

One may say that 'these things happen in all organisations...why are you becoming so emotional?" My simple answer to this logic is that, without emotions, you can not become a good human being. And when it comes to 'service' industry 'being human' is absolutely necessary.

We do have enough of  'life' waiting for us which is beyond annual ratings, professional achievements, and to enjoy every fraction of it, 'self' of every individual must be 'free' from any 'bitterness' which is  percolating in to each one's heart from such 'unhealthy' competition. Happiness is something which one must experience and share with all. You can not judge 'individual's' happiness/ 'performance of individual' when he is / was happy by any MIS for that you need to live the moment.

I writing this with great expectation and untimely intuition that you will read this unofficial, off the record letter and will definitely take note of my feelings.

Best Regards.
Manik.

------------------------------------------------------------------------------------------------------------

He went to meet Mr. Rohit Khanna with typed letter in his hand. He entered the cabin, and he realized that it takes great deal of courage to say upfront, "Yes, we are going wrong somewhere, and we have to correct it as early as possible."












Thursday, February 28, 2013

उर्जा-



उर्जा-

'स्व'त :च्या अस्तित्वाची जाणीव करून आपल्या अंगभूत  क्षमतेवर आधी  स्वताला आणि  मग जगाला  विश्वास ठेवायला संप्रेरित करणारी  गोष्ट म्हणजे उर्जा. या उर्जेच अस्तित्व प्रत्येकाला जाणवत असत. या उर्जेचा स्त्रोत  मात्र व्यक्तीनुरूप भिन्न असतो. तो दृश्य,अदृश्य,तात्कालिक, काल्पनिक,वास्तविक असा काहीही  असू शकतो. या स्त्रोता पर्यंत घेवून जाणारी मनोवस्था हि व्यक्तीसापेक्ष आहे. 'आहे ते सगळं उत्तम आहे'किंवा 'आहे ते सगळा उत्तम होईल'  असं मानून वाटचाल करणारी माणसं ज्यांना आपण  आशावादी म्हणतो त्यांच्या दृष्टीने अपेक्षित भविष्यकालीन बदल हे त्यांचं उर्जास्थान असतं. त्यांना अपेक्षित बदल भविष्यात होईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणारी हर एक गोष्ट हि अशा उर्जेचा स्वाभाविक 'उगम्स्त्रोत' असते. या उलट आपण ज्यांना 'निराशावादी' माणसं  म्हणून नाकं मुरडतो त्यांच्या लेखी 'अपेक्षित आणि आवश्यक असणारा स्थायी स्वरूपाचा बदल होणं  सद्यस्थितीत जेव्हा पूर्ण पणे अशक्य आहे' या गोष्टीची जाणीव करून देणारा हर एक प्रसंग अथवा घटना हि त्यांना जगाप्रती / जीवनाप्रती असणारी 'हतबलता'/ 'विवशता'/'अगतिकता' अधोरेखित करत असते. व अशा 'निराशेचे' / दुक्खाचे मुळ (नकारात्मक उर्जेचा स्त्रोत ! ) त्यांचा दृष्टीकोन  'नकारात्मक' करत असते. अशा माणसाचे अंतिम ध्येय पक्के  असेल आणि त्याप्रती त्याचा निश्चय दृढ असेल तर 'निराशावादी माणूसही उत्तुंग भरारी मारू शकतो ! नकारत्मक बाजूंची एकदा का  'कल्पना' आली कि त्याचं भय वाटत नाही ! ज्या क्षणी भय संपतं तीथुन पुढे  'निराशावादी' माणसाचा आत्मशोध सुरु होतो. या शोधामध्ये 'टोकाची निराशा' हीच अद्भुत उर्जा म्हणून काम करते !
'आशा आणि निराशा मिळून जीवन घडत असते. निव्वळ आशावादी राहून आयुष्य जगता येइलच असं नाही ! निराशेची जाणीव तीव्रतेने होणं हे हि  अत्यंत आवश्यक आहे, कारण निराश होणारा माणूस आधी केव्हा न केव्हा आशावादी असतोच, ज्याक्षणी त्याचा 'कल्पित' आशावादावरून कडेलोट होतो त्या क्षणी तो निराशेच्या गर्तेत जातो. कोसळणाऱ्या माणसालाच 'गुरुत्विय  बलाची आणि आकाश ठेंगण करणाऱ्या उंचीची महती कळते ! एखाद्या गोष्टीकडे बघताना निव्वळ नफा / तोटा
या पलीकडे जाऊन त्यामुळे होणारे परिणाम, त्यामागचा हेतू, स्थूल आणि सूक्ष्म कारणे, ईश्वरी नियमन यांचाही विचार व्हायला हवा ! चूक आणि बरोबर हि पट्टी तोकडी अहे. आजचं बरोबर उद्या चूक वाटू शकतं  आणि आजच चूक उद्या बरोबर सिद्ध होऊ शकतं ते सर्वस्वी 'काळाच्या' हातात आहे ! 
एखादा प्रश्न आणि त्याला दिलं  जाणारं उत्तर हे प्रश्न विचारणाऱ्या माणसाबरोबर बदलत जात ! प्रत्येक उत्तराचं  समर्थन करणारे असंख्य युक्तिवाद  आपलंच  मन आपल्याबरोबर करत असतं त्या त्या क्षणी आपणही 'हेच' बरोबर म्हणून आपली पाठ थोपटत असतो ! विविध भारती वर केव्हातरी लागलेलं  आणि चुकून ऐकलेला गाणं आपलं  मन प्रसन्न करतं, गाणं आवडला म्हणून ते भ्रमणध्वनी मध्ये साठवून बरोबर ठेवला आणि हव त्या वेळी ऐकला तर 'पहिला' आनंद काही केल्या होत नाही ! खर तर गाणं ऐकणं शब्दश: आपल्या हातात असताना असं होतं. 'गाण्याचे बोल, चाल, आवाज  आणि संगीत जरी तेच असेल तरीही आपल्या मनाची अवस्था बदलत असते, त्यामुळे असं  होता. 'गाणं' मी हवा तेव्हा ऐकू शकतो  हा फाजील विश्वास त्या गाण्याचा आनंद घालवून टाकतो, 'आशेच हि तसच आहे !' अनपेक्षित घटनांमध्ये खूप जास्त ताकद असते. अशा घटना माणसाला आणि त्याच्या विश्वासाला  मुळापासून हादरवून टाकतात. 'पर्याय' आला कि नकळत  'तुलना' होते. माणूस त्यातल्यात्यात 'सुरक्षित' वाट निवडतो. आणि पर्यायाच नसेल तर वाटेत येईल त्या दगड गोट्याला, खड्याला तुडवत माणूस आपली पायवाट तयार करतो. अशावेळी,'दुसरा पर्याय उरलाच नाहीये या निराशेची जाणीवच त्याला पुढे मार्गक्रमण करायला प्रवृत्त करते."नेमका काय चाललाय हे कळत नाही " असा ज्यावेळी आपण म्हणतो त्याच वेळी आपण अंतर्मुख होऊन विचार करतो… मग हळू हळू बर्याच गोष्टी कळायला लागतात !

उर्जा हि प्रत्येक गोष्टीत असते, पण तिचं  अस्तित्व सर्वाना जाणवेलच असं नाही. तो भाग अनुभुतिचा ! कधी "खूप खाल्लं पण भूक भागलीच नाही / चटकन भूक लागली" असं  वाटत, तर कधी "दिवसभर इतकं काम होतं कि भूक लागलेली कळलीच नहि" असा म्हणतो विज्ञानाचे निकष लावले तर इतकि 'उर्जा'शरीराला मिळाली' आणि 'इतकी खर्च झाली' असं गणित मांडाव लागेल। 'कॅलरिचा' हिशोब जुळला तरी 'समाधान' मिळेलच असा नहि, आणि मनाला  समाधान मिळून येणारी प्रस्संनता हि आपोआप व्यक्त होणारी बाब आहे त्या साठी 'वैज्ञानिक' ठोकताळे नकोत.रोज सकाळी एकाच साबण अंगाला लावून  अंघोळ केली तरी रोज वाटणारा तजेला निरनिराळा असतो. लहानपणी 'सकाळच्या' शाळेत जाण्यासाठी म्हणून बाबांनी जबर्दस्तीने घातलेली 'अंघोळ' त्यावेळी नकोशी वाटली तरी  आज 'आठवल्यावर' परत असा कुणीतरी कडेवर उचलून घेवुन, थेट 'हर् गंगे SSSS  भागीरथी SSSSS !!!! " म्हणत अंगावर पाणी ओतावं असं  वाटतं ! 
त्या वयात अंगावरून निथळून गेलेलं पाणी आजही मनाला हर्षभरित करतं !  

उर्जा हि प्रत्येकाच्या आजूबाजूला आणि प्रत्येकात दडलेली आहेच तिचा शोध लागणं आणि सत्कार्याकरता उपयोग होणं  महत्वाचं. उर्जा हि कधीही एकटी येत नाही,ती तिची इतर  रूपे (गती,स्थिती) सोबत घेवून येते, या उर्जेला उर्ध्व /अधो गती देणं हे काम संस्कारांचं आणि अंगभूत वृत्तीचं ! योग्य काय अयोग्य काय हि तार्किकता कालानुरूप विकसित होत जाते. 'बालपण' संपलं  आणि 'मी' पणाची  जाणीव झाली कि, 'आत्मकेंद्री' विचार सुरु होतो. हि स्वाभाविक क्रिया अहे. 'मी' जसा आहे 'तसाच' लोकांना दिसणं आणि त्यांनी स्वीकारणं  हे झालं स्वीकृत बालपण. 'मला जसं हवं तसा माझं आयुष्य मी घडवू शकतो, लोकांना मी माझी दाखल घ्यायला लावीन . हे आहे स्वाभाविक 'तारुण्य', 'लोकांना' मी जसा अभिप्रेत आहे तसा होण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं  हा 'गृहस्थाश्रम, आणि "मी' हे काही करू शकेन असा अजिबात वाटला नव्हतं  पण झालं !असा वाटत असतानाच  'मी' अमुक तमुक होऊ शकलो असतो पण झालो नाही किंवा होऊ शकलो नाही याची बोच लागणं हे झालं हतबल वार्धक्य !!!

'नाळ' वेगळी झाल्यावर फोडलेल्या पहिल्या 'टाहो' पासून घेतलेल्या अंतिम श्वासापर्यंत चा प्रवास ज्या विश्वासावर प्रत्येक माणूस करतो 'तो'  विश्वास म्हणजेच जीवनाच्या जाणिवेची खरी  उर्जा .

गुरुप्रसाद हरी खाडिलकर. 
२८-०२-२०१३   
रांजणगाव 
मध्यरात्री २. ० वा !!!