डॉ. राधिका राघव सामंत.
"मनु आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !"
"आपण एशती ने जाऊया आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा
समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत नव्हतं मला …! हौशीने घेतलेली
चारचाकी विकावी लागणार याचं वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या मनाची
घालमेल होत असताना
या चिमुरडीने
किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं खरच
समंजस असतात. मुल समजूतदार आहेत याचाच खूप आनंद अहे,'माई' "
"राधिका माझ्या लेकीच्या वयाची. पूर्वी राहायला आमच्या शेजारीच होति. आता
दवाखाना असतो. अधे मध्ये वेळ मिळाला कि फेरी मारते. दोघींचा हि मन मोकळा
होता.सावंतांची मुलगी आंतरजातीय विवाह करून सामंताकडे आलेलि.
सुरवाती सुरवातीला मला 'काकी' म्हणयचि तेवढाच बाकी उच्चार वगैरे स्पष्ट,
नंतर तीही मला 'माई' म्हणायला लागलि . नवरा बायको दोघाही डॉक्टर ! पण
मनाने एकदम साधी माणसं.
"
: डॉ. राधिका राघव सामंत.
मनुला विचारलं,"मनु आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !"
तर म्हणे "आपण एशती ने जाऊया आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत नव्हतं मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या मनाची घालमेल होत असताना या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं खरच समंजस असतात.माझी मुलगी समजूतदार आहे याचाच जास्त आनंद वाटतो, 'माई' . "
मनूची आई म्हणजे राधिका फार पूर्वी आमच्या शेजारी राहायला होति. आता अधे मध्ये भेटायला येते केव्हा तरी . मन मोकळ होतं दोघींचा हि. माझ्या लेकीच्याच वयाची आहे. कष्टाळू आहे लग्न होऊन नुकता संसार सुरु झाला तेव्हा आमच्या वाड्यात राह्यला होति. आंतरजातीय लग्न करून
सावंतांच्या घरातून 'सामंतांच्या घरात आलि आहे हे सांगितल्या शिवाय कळणार नाही असा 'जोडा' दिसत होता. दोघही डॉक्टर !
मला वाड्यात बाकी सगळे 'माई' म्हणायचे हीच एकटी 'काकी' म्हणायची. तेवढी एक गोष्ट सोडली तर विशेष काही खटकण्या जोगं नव्हताच.वाड्यातच तिचा दवाखाना सुरु झाला आणि मग हळू हळू खरी ओळख होत गेलि. आधी मला 'काकी' म्हणणारी राधिका मग 'माई' केव्हा म्हणायला लागली तेच कळलं नाही
'मनुच्या' वेळी राधिका माहेरी गेली आणि राघव ची ओळख झाली.
मनुला विचारलं,"मनु आपण आज्जी आजोबांकडे कशं जायचं? आपल्याकडे आता गाडी नशणार !"
तर म्हणे "आपण एशती ने जाऊया आई "… मी तुझ्या जवळ बश्नार… !"
"लेकीचा समजूतदार पणा बघून मी हसु का रडू तेच कळत नव्हतं मला …! हौशीने घेतलेली चारचाकी विकावी लागणार याचं वाईट वाटतय पण दुसरा उपाय नाही. माझ्या मनाची घालमेल होत असताना या चिमुरडीने किती चटकन मनाची तयारी केली. माझाच विश्वास बसला नाही . लहान मुलं खरच समंजस असतात.माझी मुलगी समजूतदार आहे याचाच जास्त आनंद वाटतो, 'माई' . "
मनूची आई म्हणजे राधिका फार पूर्वी आमच्या शेजारी राहायला होति. आता अधे मध्ये भेटायला येते केव्हा तरी . मन मोकळ होतं दोघींचा हि. माझ्या लेकीच्याच वयाची आहे. कष्टाळू आहे लग्न होऊन नुकता संसार सुरु झाला तेव्हा आमच्या वाड्यात राह्यला होति. आंतरजातीय लग्न करून
सावंतांच्या घरातून 'सामंतांच्या घरात आलि आहे हे सांगितल्या शिवाय कळणार नाही असा 'जोडा' दिसत होता. दोघही डॉक्टर !
मला वाड्यात बाकी सगळे 'माई' म्हणायचे हीच एकटी 'काकी' म्हणायची. तेवढी एक गोष्ट सोडली तर विशेष काही खटकण्या जोगं नव्हताच.वाड्यातच तिचा दवाखाना सुरु झाला आणि मग हळू हळू खरी ओळख होत गेलि. आधी मला 'काकी' म्हणणारी राधिका मग 'माई' केव्हा म्हणायला लागली तेच कळलं नाही
'मनुच्या' वेळी राधिका माहेरी गेली आणि राघव ची ओळख झाली.
"एकदम
बोल घेवड्या स्वभावाचा माणूस, हुशार आणि माणुसकी अस्लेला ! रुबाबदार
व्यक्तिमत्व असलेला राघव हा संपूर्ण महाविद्यालयात चर्चेचा विषय असयचा.
मुलींमध्ये तर तो प्रसिद्ध होत. एकाच वर्गात अस्साल्यामुळे, प्रात्यक्षिक,
अभ्यास, सहली, ग्रंथालय इ कारणाने आमचा सहवास वाढला आणि आम्ही उभयता
एकमेक्न्च्या प्रेमात पडलो ! यथावकाश लग्न झालं आणि आम्ही वाड्यात राहायला
आलो" असा राधिका कडून ऐकला होता.
"वाचन,
गप्पा, आणि गाड्या यांची अत्यंत आवड असणारा हुशार, निर्व्यसनी माणूस.
प्रश्नांच्या सरबत्तीने रुग्ण हैराण होत. एकच गोष्ट तीन तीनदा विचारल्यावर
दुसरा काय होणार ? तेवढी एक बाजू सोडली तर माणूस एकदम छान! पण उपयोग नाही.
दिवसभरात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावत गेलि. मनूच्या
जन्मानंतर राधिका आली आणि मग कुठे गाडी रुळावर आली . तिने मात्र छान नाव
कमावलं ! अख्या गावातून रुग्ण यायला लागले. ती नसेल तर रुग्ण दुखणं अंगावर
काढत पण इतर डॉक्टरांकडे जात नसत.नंतर मग त्यांनी सदनिका घेतलि. तिकडे
राहायला गेलि. पण दवाखाना सुरूच अहे. अधे मध्ये येते वेळात वेळ काढून मला
भेटायला !"
"माई, माणूस
प्रगती करतो म्हणजे नेमका काय करतो ? स्वतःवर गरजे पेक्षा जास्त जबाबदार्या
लादून घेण आणि त्या पेलतां येण म्हणजे प्रगती का ? मग त्यात समाधानाचा हि
विचार झाला पाहिजे ना?"
"मागच्या वेळेला सदनिकेचा व्यवहार झाल्यावर आली तेव्हा सहज म्हणाली, म्हटला "हो ग पोरी !" बरोबर आहे तुझा !"
"माई,लग्नानंतर च पहिला वर्ष कसा मजेत गेलं . नंतर संसार किती कठीण आहे ते
कळायला लागलं . सुरवातीला सगळ्यांनी मदत केली कौतुक केलं. आता काळात नकळत
आमची इतरांशी तुलना होत रहते. राघव च घरच्या मदतीवर अवलंबून राहणं पटत
नाही मला ! आम्ही दोघाही डॉक्टर असताना सासू सासार्यांना आमचा भार वाहवा
लागू नये अशी इच्छा अहे. राघव चा दवाखाना निट चालत नाही . समुपदेशकाची
नोकरी ज्यामध्ये त्याचा हातखंडा आहे तशी काही संधी त्याने शोधावी म्हटलं
तर ते 'नाही ' म्हणतो . इकडे माझाच संसार मी कसा बस चालवते आहे . जमेल तसा
माझ्या परीने, सासू सासरे , नातेवाईक , आई बाबा आणि भावंड यांचा आदरातिथ्य,
कौतुक करत अहे. तरीही 'बाबांची' अपेक्षा आहे कि "मोठी बहिण म्हणून तू इतर
दोन बहिणींचा लग्नाचा खर्च केला पहिजेस. "! एकीकडे मुलाचा दवाखाना चालत
नाही याच्या पेक्षा सुनेचा दवाखाना चांगला चालतो म्हणून सासू सारे नाराज
आहेत . रुग्णाचा / रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला आणि त्यांनी "डॉक्टर
बाई आहेत का ? " असा विचारल्यावर राघवच्या कपाळावर पडणारी आठी ! "हि अवस्था
तुझी तू करून घेतली आहेस ! काय बघितलास याच्यात ? हेच का ते प्रेम ? " हा
आई बाबांकडून होणारा उद्धार . गाडीवरून दवाखान्यात येवून प्रवासाने आणि
दग्दगिने शरीर दमत 'माई' "
"शरीरापेक्षा मन
नाजूक आहे .एक वेळ औषधाने ठणका थांबेल, वेदना कमी होईल पण दुखाची जाणीव
आणि भय नाही काढून टाकता येत ! बाटलीत बंद केलेल्या विषारी सापासारखा आपण
मुळ प्रश्न कैद करून ठेवतो. पण प्रश्न कैद केला म्हणून त्याची दाहकता
आपल्याला लगेच त्रास देत नाही इतकच. बाटलीच्या आत दाबून ठेवलेला विषारी
फुत्कारांच अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. मनपटलावर आशा निराशेचा लपंडाव
सतत सुरु असतो . प्रारब्ध, वास्तव आणि मन या तिन्हीचा परिणाम हा शरीराला
भोगावा लागतो . शरीराला होणार्या वेदनेला, दुक्खाला आपण जर का समजुतीची
फुंकर मारली तर तेच दुक्ख हे शरीरासाठी शक्तिस्थान होतं ! "
"आज
नेमकी घडी इथेच विस्कटली आहे. मुला पालकांचा ऐकत नाहीत, पालक मुलांचा ऐकत
नाहीत, नवरा बायकोचा ऐकत नाही, बायको नवऱ्याच ऐकत नाही, कुणी कुणाच ऐकायचं
नाही असच जणू ठरवलंय ! 'माझा कुणी ऐकत नाही, माझ्या मताला किंमत नाही' याची
जाणीव मनाला होणा हा एक आघात अहे. आणि असा आघात सतत होत राहिला तर त्याचा
परिणाम हा मन;शक्तीवर आधी होईल आणि तद्नंतर त्याचे परिणाम हे शरीरावर दिसत
राहतील. आपण जी काही धावपळ करतो, ती ज्यांच्या साठी करतो त्या 'आपल्या'
माणसांनाच त्याची जाणीव नसणं हेच बरेचदा आपल्या दुक्खाच कारण असतं. निव्वळ
कष्ट करून शरीर दमेल पण आजारी पडणार नाही, आणि समजा पडलच तरी विश्रांतीने
ते बरं होइल.मानसिक कष्टाचं काय ? "
"म्हणूनच मी
माझ्या दवाखान्यात फार मोजकं बोलते, दवाखान्यातला बहुतांश वेळ मी डॉक्टर न
राहता 'श्रोता' होते. 'डॉक्टर पण माझं ऐकतात म्हणजे मी कुणीतरी अहे.
माझ्या मताला कुणीतरी मान देतं', अशा भावनेतून होणारा मनाचा निचरा हेच खरं
औषध असतं !बर्याचशा आजारांच मुळ हे असा जाणीवपूर्वक स्वताकडे केलेल्या
दुर्लाक्शातच असत, ते कधी आपण स्वतः करत असतो तरी आपल्या आजूबाजूची लोक करत
असतात . "
"मला
समजून घेणारं कुणी भेटलं नाही . राघव हा अपवाद, म्हणून मी आज त्याच्या
बरोबर आहे. मी जिद्द हरलेली नाही . आज मी दवाखान्यात असताना मुलांना
भरवण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट राघव मनापासून करतो .
याचा मला आनंद आहेच पण त्याच्यासारख्या माणसाचं , ज्याचा अभ्यास
माझ्यापेक्षा अधिक आहे, चिकित्सा अचूक आहे हे असं व्हावं हे मलाच खटकत.
दवाखाना चालत नाही, याचा दोष मी त्याला अजिबात देत नाही . हीच वेळ / हेच
कारण असेल कि ज्याकरता त्याला माझी गरज लागेल, अशावेळी मी त्याच्यासोबत
राहिलाच पाहिजे . भलेही आज लोकांच्या दृष्टीने मी त्याच्यापेक्षा यशस्वी
असेन, पण माझ्या करता आज मला काही शंका आली / संकट आलं तर तो माझ्याकरता
इथे आहे हीच मोठी गोष्ट आहे! एक चांगला डॉक्टर होण्यापेक्षाही तो एक चांगला
माणूस आहे हेच जास्ती महत्वाच आहे ."
"लग्नाचा निर्णय
हा माझा होता, आज जे काही आहे त्याला मीही तितकीच जबाबदार आहे. माणसाला
जगण्यासाठी प्रेम लागतं हे खरच, पण निव्वळ प्रेमात पडून संसार चालवण हे खूप
जिकिरीच काम आहे. व्यवहाराचा तोल सांभाळता आला तर उत्तम. मुलांच्या
शिक्षणाचा विचार करून हौशीने घेतलेली चारचाकी गाडी विकूया अस मी राघवला
म्हटलं, तो तयार झाला माझ्यासाठी, मुलांसाठी पण मुलं समजून घेतील का ? का
त्यांना वाईट वाटेल ? त्यांचा हिरमोड होईल असा वाटला होतं. पण 'माई'
मनूच्या उत्तराने खरंच बरं वाटलं ! याच वयात आलेला समजूतदार पणा पुढच्या
शंभर ठेचा वाचवतो. "
गुरुप्रसाद हरी खाडिलकर .
रांजणगाव
पहाटे ३. १२ वा
पुनर्लिखित.
(मुळ लिखाण रात्री १. १ मिनिटांनी नजरचुकीने पुसले गेले. )
No comments:
Post a Comment