गर्द हिरवळ आनंदाची,
मोहक करतो नाजूक निर्झर,
धरा तोषली पर्जन्याने,
इंद्रधनू हि नभी प्रगटले,
मन हे 'श्रावणी' माझे !
धर्म जाहला भव भक्ती,
तृष्णा लागली साधनेची निर्मळ,
तन-मन भगवंती रंगले,
मन हे 'श्रावणी' माझे !!
सर्व स्वप्ने मानसीची,
अवतरणार हि प्रत्यक्षात,
लाभे स्वस्थता हि 'गुरु' कृपेने,
मन हे 'श्रावणी' माझे !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment