" मित्रा एक लोचा झालाय.अरे आज सकाळी 'सीमा' घरी भांडून घर सोडून निघाली. संध्याकाळ पर्यंत पुण्यात येईल.मी उद्या पोचतोय सकाळी. पण .आजची रात्र ती कुठे थांबणार हा प्रश्न आहे..!"
"अजिबात काळजी करू नकोस. माधवी आहे घरी. तिला आमच्याकडे येवू दे.माधवीला फोन करायला सांग तिला. तू आल्यावर बोलू बाकीचं, तू लवकर निघ मुंबईतून "-मिलिंद.
"पुढचे चार- पाच दिवस नुसती पळापळ. सीमा-सागर चं 'आळंदीला जावून लावलेला लग्न, आणि नंतर मुंबईत मित्राच्याच सदनिकेत केलेला स्वागतसमारंभ पार पडे पर्यंत माझ्या डोक्याला नसतं 'टेन्शन' मुलीच्या घरच्यांनी पोलीस केस केलेली.मुलगी राहायला माझ्या घरी.ज्याच्या करता पळून आली तो मुलगा हि माझाच मित्र ! दोन्ही घरच्यांचा राग आणि संशय माझ्यावरच ! पण हे सगळं 'एन्जॉय' केला ते 'माधवी' नेच ! "
"अरे सीमाचा घर बाहेर पडल्यानंतर मला फोन आला ! मग काय, 'हाफ डे' टाकून घरी आले. खूप महत्वाच काम असल्यामुळे जाव लागतंय, उद्या परवाही बहुतेक रजेवरच असेन, असा सांगून बाहेर पडले आणि थेट घरी आले."
"अगं 'माधवी' खूप मनस्ताप झाला मला. अति झालं म्हणून बाहेर पडले शेवटी."
'सिमे जेवण तयार आहे. आपण जेवायला बसू आणि मग बोलू."
"अगं नकोय मला..खरच..अजिबात इच्छा नाहीये.."
"हा हा हा..वा वा काय बाकी प्रेम ! म्हणे जेवणार नाही. आज ज्याच्या साठी जेवणार नाही म्हणते आहेस न उद्या लग्न झाल्यावर त्यालाच सांगशील 'जेवायचं तर जेव ...माझं झालं. चल आवर पट पट, खूप कामं बाकी आहेत.
सगळी खरेदी करायची आहे."
"तिथून पुढे अडीच दिवस आमच्या घरात नुसती 'लगीन घाई'. पहिल्या दिवशी खरेदी संपली नाही म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी 'लक्ष्मी रोड', 'तुळशी बाग' पालथी घालूनहि माधवीचा उत्साह काही ओसरेना.हि आणि हिच्या जोडीला तिच्या कॉलेज पासूनच्या मैत्रिणी,रात्रभर मेहंदीचा कोन घेवून..'वधु' च्या हाता-पायावर 'बारिक' नक्षीकाम..वधू झाल्यावर यांच्या हातावर आणि दोन्ही पायांवर 'कोरीव' काम सुरूच.."
मध्ये उगाचच "हात लागेल हं इकडे तिकडे.अधांतरी ठेव .झोपू नकोस..खपली पडतेय असं वाटलं तर त्यावर चहाचं पाणी घाल मेहंदी कशी 'डार्क' झाली पाहिजे."
"ए माधवी तुला आठवतं का गं ? आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदा 'मेहंदी' डे साजरा झाला होता..त्या वेळी आपल्याच 'ग्रुप' ने मेहंदी काढली होती..!"
"अय्या..काय भारी दिवस होते रितू..!"
"तू तर सगळ्यात मजा केलीस..अगदी 'फस्ट' 'इयर' पासून 'कॉलेज संपे पर्यंत..! फस्ट इयर मध्ये आलीस तेव्हा फक्त पंजाबी ड्रेस होते तुझ्याकडे.कॉलेज संपताना..एकही पंजाबी ड्रेस नव्हता तुझ्याकडे.सगळ्या जीन्स,आणि टोप्स, कुर्ते.. "
"रितू आणि माहित्ये का गम्मत..सुरवातीला फक्त हिच्या पुस्तकात 'सभ्य' राहुल द्रविड चा फोटो होता.नंतर..कपाटावर 'टी' शर्ट भिरकावून नाचणाऱ्या 'उघड्या' गांगुलीचा फोटो लागला..नंतर नंतर होस्टेल मधल्या हिच्या खोलीच्या भिंतीवर
तीन फोटो सतत असायचे.'.सलमान', 'ऱ्हीत्तिक' आणि ' रॉजर फेडरर'...!"
"त्यात हिचा चेहरा एकदम सभ्य, त्यामुळे कुणाला संशयही नाही यायचा.! खूप हुशार आणि अभ्यासू मुलगी आहे 'माधवी साने' असाच समाज होता कॉलेज मध्ये."
"हं, त्या बिचाऱ्या वाचमन ला सांगायची कि 'काका' जाताना या 'नोट्स' तेवढ्या द्या ना 'मिलिंद' ला..! त्याला बिचार्याला काय माहित 'हिच्या प्रेमाच्या नोट्स तो पोचवतोय ! त्याकाळी काही मोबाईल नव्हते. होस्टेल च्या फोन वरच फोन यायचे.त्यातहि हिच्या कुण्या भावाचा फोन यायचा ! एकदा रेक्टर नि उचलला..तर म्हणे मिलिंद बोलतोय..माधवीला बोलवा बर. त्यानि बरोबर ओळखला 'हिच्या' भावाचा आवाज आणि त्याचा 'भाव'हि !!
"फस्ट इयर ला खरच तशी शांत होती..सेकंड इयर ला आपला ग्रुप जमला आणि मग हिचे रंग दिसायला लागले. कधीही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही हा हिचा स्वभाव. बघावं तेव्हा खिदळत असायची ! दुसर्यांची मस्करी करणं हा हिचा छंद च जणु !"-रितू.
'अगं हो न, एकदा तर सेकंड इयर ला त्या 'मंदार' चा लायब्ररीच्या स्टेप्स वरच इंट्रो घेतला शहाणीने !"
"त्याच्या पुढे कहर म्हणजे हिची जर्नल्स कायम फस्ट इयर ची मुलं पूर्ण करून द्यायची..हिला काय मिलिंद कडून त्याची जर्नल्स मिळायची...हि तीच घायची आणि नव्या मुलांना द्यायची..!"
"व्हायवाच्या वेळी तर कहर व्हायचा..हि गंभीर चेहरा करून बसायची..थोडंस बोलायची आणि शेजारच्या मुलाकडे बघायची..! प्रश्न विचारणारा पुढच्याला धरायचा- हि सुटायची.!"
"पण काहीही म्हणा समोरच्याला दुखावणं हा हेतू नसायचा..त्या मुळे तिचा खट्याळपणा लोभस व्हायचा.मजा यायची."
"अक्खा होस्टेल अभ्यासात बुडलेला असायचं तेव्हा हिला गाणी ऐकायची इच्छा व्हायची..रात्रभर जागून अभ्यास थोडाच व्हायचा..पण हिच्या हातची 'चोरून' लावलेल्या हिटर वरची 'मेगी' आणि नेस कॉफी अप्रतिम लागायची..!"
"शहाणी आपल्यापेक्षा कमी अभ्यास करायची आणि मार्क मात्र आपल्यापेक्षा जास्त ! "
"एरवी कधी वर्गात लक्ष नसायचं पण शिक्षकांचा 'कोण' विश्वास कि हि खूप हुशार आणि सभ्य मुलगी आहे !"
"अर्ध्या वह्या तर नुसत्या कोर्याच असायच्या.."
"शेवटची पानं तर बघण्याजोगी असायची..काही हि लिहिलेलं असायचा त्यावर..कशाचा कशाला अर्थ लागायचा नाही..मध्येच नक्षीकाम..त्यातसुधा 'एम' हे अक्षर हजारदा गिरवलेला..कुणी विचारला तर म्हणायची माझ्या नावच पहिला अक्षर आहे..म्हणून लिहिलंय.."
"शेवटच्या वर्षानंतर जगाला कळलं 'एम'' हे अक्षर कुणाच होता ते !!"
"बघ बरं 'माधवी' सीमाच्या हातावरचं 'एस' हे अक्षर कुठे आहे ते? मेहंदी वाळली आहे आता...!
"मी कशाला शोधू..सागर आहे कि..बघेल तो !"-माधवी.
लग्नाच्या दिवशी तर काही बोलून सोयच नाही.सकाळी सकाळी 'माधवी'ने कुणा 'ब्युटी शिअन ' ला बोलवून घेतलं.
"पुढचे दोन तीन तास मंदार तुम्ही कुणी इकडे येवू नका..सीमाचं 'ब्राइडल स्पेशल' फेशिअल करायचं आहे..तिचा मेक अप व्हायला तेवढा वेळ लागेल. तो पर्यंत तुम्ही जायची तयारी करा.गाडी पण सजवायची आहे.'
"ओ के . मालकीण बाई !"
"फौंडेशन हिच्या 'स्कीन' ला सूट होईल असाच घ्या..लेटेस्ट हर्बल ब्रान्डच वापरा. 'आय ब्रो' निट करा.. मस्करा व्यवस्थित करा..डोळ्याभोवती अजिबात काळी वर्तुळं नकोत, दोन दिवसच जागरण फोटोत दिसायला नको. आय शाडो, आय लायनर.. काळजीपूर्वक लावा.डोळ्यात काजळ घाला.लिपस्टिकची शेड सौम्य राहू द्या .गालावर 'ब्लशर' लाऊन झालं कि मग काजळाची 'तीट' काढा नाजुकशी 'नवरी'च्या गालावरच ! केशभूषा तिच्या आवडीनुसार करा..मोगर्याचे गजरे..उंची अत्तराची कुपी..हेअर पिना,परफ्युम इ इ सगळं इथेच काढून ठेवलं आहे. तुम्ही सुरुवात करा..मी आलेच.."
"माधवी रांगोळी एकदम मस्तच ! कुणालाही खरं वाटणार नाही कि हि अचानक ठरलेल्या आणि पळून जाऊन होत असलेल्या लग्नाची तयारी आहे म्हणून !"
"मिलिंद आणि माधवी तुमच्या मुळे आमचं लग्न इतक्या थाटात लागलं ! तुम्ही खूप आपुलकीने आमचं लग्नकार्य केलं.पळून जाऊन लग्न करताना एवढे लाड खचितच कुणाचे होत असतील !"
वर्ष दोन वर्ष निघून गेली..परत एकदा सागर चा फोन .."मित्रा लोचा झालाय .सीमा अचानक भांडून घरातून निघाली आहे..!"
"टेन्शन घेवू नको...असा त्याला उसनं अवसान आणून म्हणालो आणि जागेवर खाली बसलो..पुन्हा असंख्य प्रश्न नजरे समोर..! "
"सीमा घरून भांडून बाहेर पडली..हेच न? मला माहिती आहे ! ती इथेच येणार आहे !मी बघते काय करायचं ते. तू 'रीलाक्स" राहा."-माधवी.
बेल वाजली ! दरवाजा उघडायला मीच..दारात सीमा..या खेपेला गळ्यात मंगळसूत्र इतकाच बदल..!
माधवी वर कसलाच परिणाम नाही...मस्त आलं घालून केलेल्या चहाने तिने सीमाच स्वागत केलं. रात्रीच्या शो ची तिकीट बुक केली.
"माधवी प्रसंग काय आणि तुझ चाललय काय ? निवांत राहायचं म्हणजे किती ?ती आपली मैत्रीण नवर्याशी भांडून घर सोडून आली आहे आणि तू तिला सिनेमाला घेवून निघाली आहेस ?"
"हो. तू फक्त बरोबर ये...मी बघते बाकीच..!"
पोपकोर्न खायला म्हणून मध्यंतराला उठलो.हातातली 'नेस कॅफे' संपली..मध्यंतर संपला..तरी माधवी काही चित्रपटगृहात जायला तयार नाही.
"मिलिंद..चाल आपण निघूया..सीमा तू बस सिनेमाला..हा येईल नंतर..!"
"अगं झालं तरी काय ?"
"काही नाही! "
"राहू दे सिनेमा मी पण येते तुमच्या बरोबर..!"
"ओ के. मी गाडी घेवून येतो तुम्ही व्हा पुढे मग."
"मिलिंद..त्या सर्कल जवळ गाडी थांबवा..! सीमा उतर खाली तू पण."
"मी प्रत्येक गोष्ट निवांत घेते..असा तुम्ही म्हणता ! मला सांगा, इतक्या गांभीर्याने जगून तुम्ही असा वेगळ काय मिळवला आहे ? आदळ आपट करून, त्रागा करून काही फायदा आहे का ?
आधी आई वडिलांशी भांडून बाहेर पडलीस..त्यावेळी सावरायला सागर होता..! आज त्याच्याशीही भांडलीस..पुन्हा घरा बाहेर पडलीस..का ?साध उत्तर- 'आहे' त्यात तू समाधानी नाहीस.आहे तिथे राहून परिस्थिती बदलणं तुला शक्य नाही असा म्हटल्यावर तू सोप्पा पर्याय निवडलास..पळ काढण्याचा..! आहे त्या गोष्टीत आनंद मानणारी मी कायम सुखात होते किंवा आहे असा नाही..पण एक नक्की कि माझ्या स्वभावामुळे मी इतरांच दुक्ख वाढवलं नाही.
मी समोर असणाऱ्या संकटाची चिंता कधीच करत नाही. चिंता करून समस्या सुटत नाही.उलट चिंता करून आपण समस्येवर मात करायची आपली उपजत शक्ती गमावून बसतो. तीच ताकद जर का..समस्येवर मार्ग शोधण्यात वापरली तर उपाय सापडतो. जितके तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावाशी प्रामाणिक राहता तितका तुमचा प्रभाव वाढतो आणि जितका तुम्ही दुसर्याच अनुकरण करता तितके तुम्ही 'स्वत्वा' पासून दूर जाता-हतबल होता इथूनच खरी फरफट चालू होते.
शुक्रवारी प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट हा कुठे न कुठे 'कमी' असतोच..तरीही लोक पुढचा चित्रपट पहिल्यापेक्षा चांगला असेल या अपेक्षेने गर्दी करतात..अपेक्षाभंग होत राहिला तरीही 'या पुढे काहीतरी चांगला आहे' या विश्वासावर हे वर्षानु वर्ष होत आलं आहे..! हा विश्वास आतून येण्यासाठी तुमचं मन हे सजग आणि टवटवीत हवं !दुक्खालाही खिजवायची ताकद माझ्या हास्यात आहे.असा मी मानते. मी चिडले, वैतागले तर दुक्ख वाढणारच आहे..मग थोडस हसून मनाला आनंद का देवू नये ?
विचाराचा क्षण हा कृती करण्यापूर्वी येतो.चित्रपटगृहात येण्याआधी मी 'विचार' करायला हवा. चित्रपट सुरु झाल्यावर बाहेर जावसं वाटणं हा झाला पलायनवाद ! संसाराचं हि तेच आहे !!
मी मध्यंतरात बाहेर पडले नसते तर तुम्ही चित्रपट पूर्ण बघितला असता. बघताना तो आवडो किंवा न आवडो..तिथून पुढच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी त्या चित्रपटाचा विषय निघाल्यावर 'तो' चित्रपट आपण बघितला होता..असा स्मरेल त्या त्या वेळी फार समाधान जरी नाही मिळालं तरी आपण चित्रपट पहिला नाही हे शल्य तरी तुमच्या मनाशी राहणार नाही. आता मी बाहेर पडले मागोमाग तुम्हीही आलात..माझ्या मुळे तुमचाही आनंद मी हिरावून घेतला.मला कितीही आवडला नाही आणि लोकांना आवडला तर ते तो चित्रपट बघणारच. आणि लोकांना आवडला नाही पण मला आवडला तर मी हि बघणारच !! माझ्या / लोकांच्या आवडीमुळे चित्रपटाची कथा बदलत नाही म्हणूनच तर सगळेजण तो बघायला जातात. जे चित्रपटाच तेच आपल्या आयुष्याच.. 'समाप्त' ची पाटी दिसे पर्यंत खुर्ची सोडायची नाही..मजेत बघत राहायचं..!"
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
9960397773.
रांजणगाव,
७/१२/२०१२
पहाटे ३.२० वा.
No comments:
Post a Comment