प्रिय बाबा,
आत्ता चालत येताना एका माणसाच्या डोळ्यात बघितला, आणि तुमची प्रकर्षाने आठवन आली.
थेट तुम्हाला कडकडून मिठी मरावी असा वाटला. ३१ ऑक्टोबर २००५ ला तुम्ही अचानक गेल्यापासून..
खरतर, पूर्वी सारखी घराची ओढ़ राहिली नाहीं. आईचा आणि तुमचं स्वभाव हा मुळात पूर्ण वेगळा.
काळजी करणारी आई घरी असली तरी, ज्याच्या जीवावर बिनधास्तपणे मोकाट जगात आलो तो आधार-(बाप) घरी नाहीं ,
याची जाणीवच उरलेला जीवन निस्स:त्व करून टाकते. तुमच्या जाण्यानंतर सगळाच बदलला...आपली आर्थिक परिस्थिती आणि
मानसिक स्थिती दोन्ही. फरक इतकाच कि तुलनेने आपला कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्थिर झाला असला तरी, मानसिक समाधान जवळपास नाहीसच झाला आहे.
आईचा जीव आणि आशा माझ्यात गुंतलेली.. आणि मी..अनुभवतोय तुमचं विचारविश्व...
४० वर्षांपूर्वी २०० रुपये घेवून घरा बाहेर पडताना पासून ते लोकांच्या नजरेत स्थिर होई पर्यंतच !
तुमच्या इच्छेखातर दोन्हीकडच्या घरातल्यांशी मिळून मिसळून वागण्याबोलण्याचा प्रयत्न करतो...
पण, माझं पटतं ते इतरांशीच !! तोंड देखला भेटणं बोलणं झाला तरी त्यांच्या बडेजावामध्ये मन रमत नाहीं.
आपल्या गावातल्या कुठल्याही घरात किंवा जोश्यांच्या कुटुंबात जमलेले ऋणानुबंध या रक्ताच्या नात्यांमध्ये जमणं आणि रुजवणं मला अशक्य वाटता निदान माझ्या बाजूने !
आज एक काम धड झाला नाहीं कि जेव्हा माझी चिडचिड होते, त्या वेळी इतकी वर्ष परिस्थितीशी झगडा देतानाही तुमची नं ढळलेली शांतता आणि स्ठीतीप्रद्न्यता आठवतेच.
फरक इतकाच कि, तुम्ही तुमच्या बाबांच्या जीवावर घर सोडून निघू शकलात....आज माझं तसं नाहीये...!
तुम्ही असतात तर, नोकरी सोडून, मनात आल्याक्षणी नर्मदा किंवा हिमालय जवळ केला असता...एकच भरवशावर कि बाकी जगणे मला मुर्खात काढला तरी फक्त माझ्या
बाबांच्या डोळ्यात मुलाच्या ओढीचा आणि आवडीचा अभिमान तरळला असता. आणि अशीर्वादासह छुपा पाठींबा हि !!
खाडिलकर म्हणून दुनियेत वावरताना मान-अपमानांचा संघर्ष जेव्हा जेव्हा अपरिहार्य होतो तेव्हा माझ्या रक्तात असलेली स्वाभिमानाची उर्मी क्षणात जागी होते.
पिढीजात आलेली कडवट स्पष्टवक्ती जीभ, असे वार करते कि समोरचा आणि मी स्वतः दोन्ही घायाळ होतो. गप्पा बसणं हा माझं स्वभाव नव्हे.
तरीही तुमच्या जाण्यापासून मी तो निमूट स्वीकारला. काही जणांच्या मते मी 'सुधारलोय' काही जणांच्या मते माझा आत्मविश्वास कमी झालाय,
काही जणांच्या तर्का नुसार मीच अबोल झालोय इ इ .
असो तुम्हाला नक्की कळेलच कि मी का गप्पं आहे ते..! वाद घालण्याची माझी सर्वात हक्काची जागा नाहीशी झाल्या पासून बोलणं / व्यक्त होणा हा निव्वळ सोपस्कार होऊन राहिला आहे. कुणी आपल्याला समजून घेवो नं घेवो.. त्यांचा विचार करण्यासारखा कुणी उरलाय असं वाटतच नाहीं.
तूमचा जिभेवरचा संयम आणि शांत पणे चांगला / वाईट ऐकून घ्यायची ताकत ठरवूनही माझ्या अंगी मी आणू शकलो नाहीं. जिभेवर आणि वाणी वर संयम ठेवला कि शांततेचा भंग आपोआप होतो.
आज नोकरी करताना तूमचा व्यवसायच करायचा हा निर्णय १००% पटतो. त्याही प्रांतात उडी मारायची आहे पण...आणि थोड्या कालावधी नंतर.
एखादा लहान मुलगा जेव्हा पटकन 'बाबा' म्हणून हक मारतो आणि बाबांना बिलगतो त्या वेळी एकीकडे खूप पोरका वाटता, आणि दुसरी कडे आठवतं ते कुवारबाव फाट्यापासून, घरापर्यंत तुमच्या खांद्यावर बसून रात्री अपरात्री येणं! दातांचा तुमच्या पावलागणिक होणारं "टक टक टक" आवाज , आणि दोन्ही हातानी तुम्ही उचललेले बोजे.!!! एस टी, ट्रक , सायकल आणि चालत तुमच्याबरोबर केलेला प्रवास. दादरचा पूल उतरताना आठवतं ते तुमच्या बरोबर माझा पहिल्यांदा मुंबईत येणं ! तुम्ही दादरच्या पुलावर भर गर्दीत मला विचारला होतात, "लेका आत्ता हरवलास तर घरी कसा येशील ??" या अचाट प्रश्नावर मी आत्त्याच घर येईपर्यंत धरलेला मौन !
आज इतरांची लाडावलेली मुला बघितली कि मला तूमचा आभिमान वाटतो कि तुम्ही असले फालतू लाड कधीही केले नाहीत. बिनधास्तपणे स्वताला झोकून देणं (संस्कार आणि मर्यादा नं विसरता),
आणि धाडसाने पुढे जाण शिकवणारे तुम्ही आणि स्वताच्या तंद्रीत चालणारा मी..दोघांच अस्तित्व मला पदोपदी जाणवत.
वपुंचा 'सखी' पुस्तक आणि त्यातली एक कथा मी मुद्दाम परत परत वाचतो...वपू नि रेखाटलेला 'बाप' = डी. जी. वाचताना मला तुम्हीच दिसता.
सगळ्यात महत्वाच, तूमचा घर सोडून बाहेर पडण्याचा निर्णय खरच खूप धाडसी पण मस्त होता !!
त्या मूळे मी माझ्या माणसांमध्ये राहू शकलो. मला माझा गाव मिळाला !!
माझा घरी जाण आणि राहाण दोन्ही पुष्कळ कमी झाला असला तरी, आई चि खरच कमाल आहे.
काम ती म्हणूनच करत्येपुरेशा सोयी सुविधा नसणाऱ्या आपल्या घरात, भूतकाळाच्या असंख्य आठवणी घेवून, एकाकी राहण हे फार कठीण! पण ती आजही त्याच जिद्दीने झगडते आहे.
घरात आणि घराबाहेर नियमित दिसणारी, भिंतीवर सरपटणारी जनावर, आणि घरादारावरून फिरणाऱ्या काही अतृप्त माणसांच्या आणि लोभी आप्तांच्या नजरेला समोर जात ती तिचं कर्तव्य त्याच शांततेने पार पाडत आहे. नानाविध विचारांनी अस्वस्थ होऊन आराम खुर्चीत रात्र भर जागत बसताना तिला किती त्रास होत असेल पण या बद्दल कधीही चकार शब्द नाहीं!
तिच्या मनात कदाचित एकच शंका असावी, "बाबांच्या विचारांचं आकर्षण आणि स्वभावाची ओढ असलेला हा मुलगा बाबांच्या पावलावर पूल टाकून पुढे जायचा विचार करतोय...पण त्याला कसा समजाऊ कि तेवढी इच्छा शक्ती आणि लाधान्याच सामर्थ्य मिळवायची तुझी ओढ रास्त असली तरी, आता हे सगळं सहन करायची आणि बघायची माझी ताकद उरली नाहीये....."
तिचा वाढलेला हळवेपणा कमालीचा त्रास दायक होतो...आणि मग वाटता कि आत्ता बाबा हवे होते, "चल चालू लाग, पाऊल पुढे टाकल्यावर रडत पाठी यायचा नाहीं "
असं सांगायला......
ओ "बा बा" !!!!
असं म्हणून पूर्वी सारखीच तुमच्या कपातली अर्धी कॉफी..(आवडली तर सगळीच)...प्यायचि आहे......
मिष्ट गोड कॉफ्फी...तुम्ही गेल्यापासून गेली ती कायमचीच....
जीवनच सपक झालय असं म्हटलात तरी हरकत नाहीं..
लोकांना आई वडिलांमध्ये देव दिसतो, मला दत्तागुरूनच्या तसबिरीकडे बघितल्यावर,
तुम्ही दिसता...!!!
फक्त तुमचाच ,
येडा पांडुरंग !!!!
नंदुरबार.
१०.उ रात्रौ.
११-०५-२०११
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment