Sunday, November 25, 2012

अश्वमी चीत्गावकर.

आज उतरत्या वयात  गरजेपुरता पैसा आणि राहायला हे घर आहे.  पण  माझी दोन्ही मुलं  माझ्या सोबत   नाहीत. अर्थात ती नाहीत म्हणुन वाईट वाटत नाही. हि अश्वमी चीत्गावकर कुणापुढे   झुकली नाही  ती आता या कालच्या मुलांसमोर थोडीच झुकेल  ?

माहेरी मी सगळ्यात थोरली.लग्न  होई पर्यंत स्वताच्या रुपाची आणि घरच्या श्रीमंतीची जाणीव मनाला झालेली. कस बसंपदवी पर्यंत  शिक्षण पूर्ण केलं. दादा नि स्थळ आणल.मुलगा आवडला लगेच हो म्हटलं.    माहेरचा रुबाब घेवूनच सासरी आले. सासरी आल्यावर नवरा कर्तुत्ववान मिळाला.मोठ्या हुद्द्यावरची सरकारी  नोकरी. आधी खेड्यातून शहरात आले. नंतर शहरी थाटाची सवय झाली.दर दोन अडीच वर्षांनी यांची बदली व्हायची.राहायला सरकारी घर,फिरायला गाडी, दिमतीला नोकर चाकर.असा वाटायचा कि मीच साहेब आहे.
बर यांना कसली म्हणून हौस नाही. सतत आपलं  कार्यालय, काम फायलींचा गठ्ठा आणि  दोन्ही  मुलं  यातच लक्ष.सोबतीला ओठामधे रेंगाळणारी सिगरेट ! माझ्याकडे कसली तक्रार नाही कि कसला  विशेष आग्रह नाही.
मला तसा स्वातंत्र्यच होता. बाबा कार्यालयात व्यग्र अस्साल्यामुळे दोन्ही मुलांना हवं नको बघायचा,त्यांना फिरायला घेवून जायचा,शाळेचा अभ्यास, शिकवणीचा वर्ग नियमित सुरु आहे का हे बघण्यात दोन्ही मुलांचा लळा मलाच जास्त लागला. मोठी ताई अंकिता अभियांत्रिकी शिक्षणासाठी दहावी नंतर  घरातून बाहेर पडली.

त्या वर्ष पासून या 'पुण्या'शी माझं नातं जोडला गेलं. नंतर तिच्या परीक्षेच्या वेळेला एक दोन महिने तिच्या खोलीवर रहायला यायचे. येवढा कठीण अभ्यास करताना तिला रात्र रात्र जगायला लागायचा त्यावेळी तिला चहा ,कॉफी , करून द्यायला मीही जागी राहायचे. मुळात यांच्यावर गेलेली अंकिता जात्या  हुशार. शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करून पदवी मिळण्याआधीच तिला नोकरी चालून आली. शिक्षणा नंतर पुन्हा नोकरी साठी ती आणि लांब गेली बेंगळूरू ला ! किती माझी गुणाची पोर असा वाटायचं !

याच्या विरुद्ध दिवटे चिरंजीव ! शाळेत कायम तक्रारी. हुशार असूनही अभ्यास करत नाही म्हणून शिक्षकांकडून ऐकून घ्यावा लागायचं. यांना सांगितला लक्ष घाला म्हणून तर म्हणे हा 'गृह' खात्याच्या अखत्यारीतला विषय आहे. तुम्हीच लक्ष द्या. नववीला असताना शाळेत समजत नसेल म्हणून  एका ठिकाणी खासगी शिकवणी लावली.पहिले पंधरा दिवस रोज वस्तूंची आदळ  आपट  ! मी जाणारच नाही म्हणायचं ! पण महिन्या भर नंतर रुळला. मग हळू हळू उशिरा येणा सुरु झालं. एक दिवस रात्री दहापर्यंत पत्ता नाही. मुलगी पुण्याला, हे कामानिमित्त दहा दिवस दौऱ्या वर गेलेले.मी एकटीच घरी. त्या काळात आजच्या सारखे मोबाइल ल फोनही नव्हते. काळजी करून जीव मेटाकुटीला आलेला. तितक्यात एकदाचा स्वप्नील दरवाज्यातून आत आला. इतकावेळ आलेला राग लगेच विरघळला. जीव भांड्यात पडला.पण तेव्हढ्या क्षणापुरताच.

तोंडाला दारूचा वास. मळलेले कपडे.विचित्र दिसणारे डोळे. त्या दिवसा पासून पुढची दोन वर्ष  हा कुठल्याही तर्कट न बसणारा पण नशिबी आलेला भोग मी भोगत होते नशा  नुसत्या दारूची नव्हती. माझा मुलगा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याच्या त्या  अर्धवट वयात त्याला भलता सलता  बोलूनही काही फायदा नव्हता. पुढचा वर्ष दहावीचा. त्याला अंजारून गोंजारून, प्रसंगी मार, शिव्या सगळा सहन करून त्याच्या कडून सगळा प्रकार काढून घेन गरजेचा होता. मुलाकडे लक्ष दिला नाही म्हणून यांचा रोष. सगळा प्रकार असा विचित्र झालेला, कुठल्या नातेवाईका  कडे जायची सोय नसायची. ताई ला हि सुट्टीला घरी येवू नको असा हृदयावर दगड ठेवून सांगायला लागायचं. मन रमवायला यांच्याकडे याचं काम होता.माझ्या नशिबी त्या वेळी हे ऐकून घ्यायला हि कुणी नसायचा. नशेच्या अमला खाली स्वप्नील वाट्टेल ते बोलायचा. शेवटी एकदा अध्यात्मिक आणि वैद्यकीय उपचारांनी माझं  पिलू सुधारला.

पण त्या नंतर तो माझ्यापासून खूप दुरावला. मी सांगितलेली कुठलीही गोष्ट त्याला पटायची नाही. तिरकस बोलणं, चेष्टा कारण नेहमीचाच होता. अपमान करायलाही मागे  पुढे पाहायचा नाही. फक्त त्या वेळी यांचा मला आधार होता.पुढे मग हा हि शिक्षणा साठी पुण्यात आला. स्वताच्या आवडीने हॉटेल व्यवस्थापनाचा कोर्स करून नोकरीला लागला. लांब असल्या मुळे फोन वर होईल तेवढाच बोलणं.

दोन्ही मुलं  बाहेर गावी गेल्यावर पुन्हा एकदा आमचा दोघांचा संसार सुरु झाला. अर्थिक  चिंता नव्हती. मुलही आपल्या पायावर उभी राहत होती. एकूणच चांगले दिवस होते. लग्ना  नंतर हि मुलं  होई पर्यंत आम्ही दोघंच होतो.पण खरा सांगू त्या वेळी नवरा- बायको  दोघांमध्ये असता ते आत्मकेंद्री कुतूहल आणि आकर्षण.आणि मुलं  आहेत पण लांब आहेत  अशी वेळ येईपर्यंत नातं  शारीरिक आकर्षणा  पुढे गेलेला असता. जाणीवेचा परीघ आणि  सुखाचा केंद्रबिंदू बदललेला असतो. नेमक्या याच काळात नवर्याला बायकोच्या अनभिज्ञ अशा कणखर बाजूची ओळख होते आणि बायकोला नवर्याच्या हळव्या मनाची ! फक्त हे नात मुलांच्या पश्चात उलगडत जात असता त्यामुळे मुलांच्या मनातली आई आणि बापाची लहानपणापासून पाहिलेली प्रतिमाच उत्तरोत्तर उत्कट होत जाते. तुमच्या पिढीच्या भाषेत सांगायचा तर जशी तुम्हा मुलांना स्वताची 'स्पेस'  हवी असते ना तशीच ती तुमच्या 'आई बाबांना'  मिळाल्या नंतरच हे शक्य आहे.

अंकिताचा लग्न हे आमच्या एकत्रित  कुटुंबातला पहिला आणि शेवटचा कार्य. तेवढेच पंधरा दिवस आम्ही कुटुंब म्हणून मनापासून एकत्र राहिलो.हौस मौज केली. पुढे लेकी ला लेक झाली.ती तिच्या संसारात गुंतली.
यांचं आजारपण अचानक उफाळून आलं. जमा केलेल्या पुंजीतली मोठी रक्कम आजारपणात संपली.उपचार करूनही काही गुण आला नाही. यांच्या जाण्यानंतर सगळा खेळच बदलला. मुलगा विचारेल हि आशा  नव्हतीच. तरीही यांच्या जाण्यानंतर त्याला परदेशात नोकरी लागली. सहा आठ महिन्यांनी घरी आला. यांचे पैसे आणि घर माझ्या नावावर असल्यामुळे, वाटणी साठी तगादा  लावून झाला.अचानक म्हणाला माझ्याबरोबर परदेशी चल..! मिरवायची हौस स्वभावातच असल्यामुळे मी हि तयार झाले. माझेच पैसे लावून त्याच्या बरोबर गेले. तिकडे गेल्यावर भलताच प्रकार. याच्याच नोकरीचा काही पत्ता नाही. दोघानाही उपास मारीची वेळ. अनोळख्या शहरात, अनोळखी लोकात अनोळखी भाषेत काही तरी खाणा  खुणा करून अक्षरशः 'ओम भवती भिक्षान देही' करत फिरले ...! एकदाची याला  नोकरी लागली ...मग काय यानेच अडवून धरला. "आता कशी जातेस बघतो..बाबांच्या जीवावर सगळ्या उद्या मारत होतीस..स्वताची किती अक्कल आहे ती कळेल आता..." हे आणि बराच काही बोलला..! मी खमकी म्हणून कशी बशी परत  आले इथे.

आल्या बरोबर निर्णय घेतला..आता यांची पर्वा  करायची नाही..! हातात असलेली सगळी पुंजी संपल्यात जमा. दुसरा पर्यायाच नाही म्हणून राहता घर विकायचा निर्णय घेतला. घरात माहित असावा म्हणून भावजी न सांगितला तर मुलाने बेशरम पणाची  हद्द केली...माझे त्यांचे संबंध जोडून मोकळा झाला..! तो एवढ्यावरच थांबला नाही..त्यांनी आणलेला गिर्हाईक कमी पैसे देत होता म्हणून स्वतः पुढाकार घेवून एक गिर्हाईक घेवून आला..ते वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होते..कारण देह विक्रयाच्या  दुकानाची घडी  त्यांना तिथे बसवायची होती..आणि माझा मुलगाच या कारणासाठी  आमचं  घर देवू करत होता! हे ज्या क्षणी मला कळला त्या क्षणी त्याला घराबाहेर हाकलला..."व्यवहार झाला कि तुझ्या वाटणीचे पैसे खात्यात जमा होतील..मला तुझा तोंड बघायचा नाही...चालता हो ! "सांगून दरवाजा लावला आणि अगतिक पणे  रडत बसले...

अशा अवघड वेळी जिच्या मदतीची रास्त अपेक्षा मी केली त्या मुलीनेही रंग बदलला..! वाटणीच्या पैशाचा मोह
तिला हि होता. मुलगा उघड बोलला..तिने  आडून वार केला..! व्यवहार झाल्यावर दोन्ही मुलांना पैसे देवून टाकले. उरलेल्या पैशात हि सदनिका घेतली. इतका सगळा झेलूनही  माझी जगण्याची ओढ कायम  आहे.  आजही मी चालत जाण  टाळते, रिक्षाने जाते. फक्त आता मी  सुखाचा किती उपभोग घेते  याची  नोंद मनाशी  असते. मी जन्माला आल्यापासून पैसा कमावला नाही हे सत्य आहे.पण मला त्याचा वैषम्य अजिबात नाही.
मी  पैशाचा उपभोग घेण्यासाठीच जन्माला आले आहे  आणि उपभोग घेता घेताच मरणार. अशा करंट्या  मुलांचा विचार मी आता सोडून दिलाय.

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;


'स्त्री' हि व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.वेगवेगळ्या विचारधारा, अनेकविध वृत्तीसंस्कार ,उपजत सौंदर्य आणि  त्या सौंदर्याचा सार्थ अभिमान घेवून आपल्याच सभोवताली  वावरणाऱ्या  'स्त्री'त्वाचा  अविष्कार हा  विभिन्न  परिस्थितीत होत असतो. 'स्त्री' त्वाचे सभोवताली  दिसणारे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा माझा हा पहिला प्रयत्न.चूक भूल घ्यावी द्यावी.

धन्यवाद
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव .
१०.५१.
२५/११/२०१२.


No comments:

Post a Comment