Wednesday, June 30, 2010

आज अचानक असे कसे का होते ?

आज अचानक असे कसे का होते ?
मन माझे कधी पाखरू कधी पाचोळा होते!
सुचत नाही काहीच कधी,
तर कधी कोडेही अलगद उलगडते,
आज अचानक असे कसे का होते?

वेडे मन माझे क्षणात हरवत जाते,
आठवते मग जुनेच सारे,
अन जगणे अवघड होते !!
आज अचानक असे कसे का होते ?


भावना होतात अनावर मग,
पापणीही ओली होते !
उमगते मग सखीने,
मला 'वेडे' का म्हटले होते!!
आज अचानक असे कसे का होते ?

कधी सापडते कुणी जवळचे ,
जे मनात लपले होते,
आनंदाचा पूर येतो घटकेत, कधी
विराट वाळवंट होते !!!
आज अचानक असे कसे का होते ???

No comments:

Post a Comment