मला लाडावणारी माणस........
मेस मध्ये जेवायला गेलो होतो. ताक संपलेलं. मिळणार नाही असं वाटत असतानाच, तिथे काम करणारा मुलगा येतो काय, ताजा ताक करतो काय !
बरं ते ताक नव्हताच तसं.. ते एकदम ग्लास भरून दिलेला जरासा घुसालालेला दहीच होता...! ना घुसललेला ताक पिताना..अशा प्रकारे वेळोवेळी माझे लाड पुरवणाऱ्या माणसांच्या आठवणींनी विचार मात्रं चांगले घुसळून निघाले. नंदुरबार मध्ये आज ज्या मेस मध्ये जेवतो तिथे - आग्रहाने फक्त मलाच वाढली जाणारी -सुकी भाजी ..( फक्त एकदाच मिळेल असं फलक लावलेला असूनही ! ) दरात मिळणारी सूट... वेगळीच. इस्त्रीवाले 'चाचा' ज्या आस्थेने चौकशी करतात... वर दरात सवलत देतात सगळाच व्यवहाराच्या गणितात ना बसणारा.. आणि म्हणूनच मनात घर करून रहाणार. हे झाला आजचा.. पण इथे येई पर्यंत...लाड करणारे... बरेच आहेत. एमेस्सी ला थेसिस च्या कामी अनमोल मदत करणाऱ्या डॉ. मॉली जोसेफ, सौ अजिथा या शिक्षिका.. आणि परीक्षेत अत्यंत मोलाची मदत करणारी माझी सहाध्यायी चि. अंजली ,,,,!! केरळ मध्ये स्वादिष्ट जेवण आस्थेने देणारा हॉटेल राजस्थान चा नोकरवर्ग,,, खास माझ्या साठी आणून मिळणारा चिरलेला टोमेटो ! दापोली आणि केरळ मध्ये प्रत्येक लीब्ररी मध्ये संध्याकाळी रूम वर घेवून जाण्यासाठी मिळालेला पेपर..! हि परवानगी आणि पेपर देणारा स्टाफ.!
मला कायम स्वताचे पैसे खर्च करून फोन करणारा अभी, समीर दादा, केव्हाही फोन केल्यावर हवं ते काम करणारा विक्रांत मलुष्टे. रात्री अपरात्री मला चहा करून देण्यापासून ते माझी अविरत काळजी करण्यात कधीही नं चुकलेला. .. माझ्या त्रासाने कधी हि नं चिडलेला माझा पूर्वाश्रमीचा रूम पार्टनर - अनिकेत कोनकर. दापोलीच्या चार वर्षामध्ये मला भारावून सोडणारा ( आज आमचे मतभेद आहेत हि बाब वेगळी ) ऋषी. कॉलेज आणि कॅन्टीन मधले पदार्थ निव्वळ याच्या मूळे चविष्ठ झाले. मनासारखा 'गोड' निव्वळ दुधाचा चहा, नवीन कॅसेट, गाडीतून फिरण्याची हौस...मजा...आणि हवं तेव्हा आर्थिक पाठबळ हे सर्व याने त्यावेळी मला दिला, यात दुमत नाही. कायम बिनधास्त राहणारा आणि म्हणूनच कधीही गंभीरपणे विचारात नं घेतला गेलेला राहुल हातिसकर... आज मात्रं आठवणीने फोन करतो, दापोलीत गेल्यावर अगत्याने स्वागत करतो.
दापोलीत आई प्रमाणे माया करणाऱ्या सौ.देवधर काकू. कायम हसतमुख, डब्यात आलेल्या भाकर्या, गुळाची पोळी, गाजराचा हलवा, काजुगाराची उसळ.. आणि मुळात समोरच्या साठी मायेने काही करण्याची वृत्ती कधीही विसरताच येणार नाही. 'पोट भरला' काकू डब्यातला 'थोडा कमी करा'.. असं सांगायला लागणारा मी- नक्कीच लाडावलेला होतो यात वाद नाही. पुण्यात आल्यावर रक्ताच्या नात्याच्या ओढीने अगत्य करणारा अनिल दादा..परीक्षा केंद्रावर सोडणं असो, राहणं, पोटोबा..अथवा स्वारगेट ला गाडी मिळवून देणा असो.. दादा आहे म्हटल्यावर काळजी चा कारणच उरत नाही. पिरान्दावान्यातले भावे कुटुंब...काकडीच्या पातोल्यांपासून...निराश्या दुधापार्यांता.. आणि शब्दात नं सानागता येणारे भावनिक लाड करणारं !
घरात सगळ्यांचा लाडका असलो तरी ते अनुभवण्या एव्हडा संपर्क आणि सहवास सख्या चुलत नातेवाईकांशी आलं नाही. एक तर वयातला अंतर आणि माझ्या पूर्ण वेगळ्या अभिरुची यामुळे आणि लांब राहिल्यामुळे तसं अंतर कायमच राहिला. तरीही चुलत भावापेक्षाही मैत्रीचा आणि विचारांचा नातं ज्याने जुळवला... मला इतरांपेक्षा अधिक चांगला समजून घेतला तो धनु दादा. या उलट रत्नागिरी मध्ये.. रक्ताचा नातं नसला तरीही नात्याची ओढ लावणारा टिळक आळी तील जोशी कुटुंब. पहिलीत असल्यापासून यांच्याकडे जातोय पण आपुलकीची ओढ आणि होणारे लाड तसूभरही कमी नाहीत !
माझा मिरजोला गाव.ज्याने माझे सर्वाधिक लाड केले. मला आपला मानून..माझे गुण-अवगुण पोटात घातले. जाता येता शाळेतून 'लिफ्ट' देणाऱ्या लोकांपासून माझे बाबा गेल्यावर, ऐन दिवाळीत एकाही फटाका नं वाजवणाऱ्या माझ्या गावाबद्दल ऋणी राहणं येव्हादाच माझ्या हातात आहे. खास माझ्यासाठी ऐपत नसताना पेढे आणून देणारी,,, चिकी- गोळ्या देणारी आणि माझ्या सुखदुखात समरूप होणारी पार्वती काकू.
माझ्या मुंजीत, मला खांद्यावर बसवून भिक्षवलीची मिरवणूक काळकाई च्या देवळात घेवून जाणारे विश्वास काका , आणि माझा दुसरा घर म्हणता येईल असं जोगळेकरांचा कुटुंब.
हक्काने जाऊन जेवायलाही बसावा येवडी काळजी करणारी आणि प्रत्यक्ष कृती करणारी भाटवडेकर आजी.
घड्याळाची, पेपरची, सायकल ची वह्यांची आणि जिभेची सर्व हौस पूर्ण करणारे, 'बाबा'. माझ्या सर्व 'विम्झीकल' वागण्या बोलण्याचे धक्के पचवूनही मला पूर्ण पाठींबा देणारी आणि अजूनही 'पेपर- पुस्तक. परीक्षा-आणि फिरणं' या सर्वांचा आर्थिक भार उचलणारी, आणि माझ्या काळजी ने तितकीच हळवी होणारी , संकटांची कारणं नं देता मला प्रोत्साहन देणारी माझी समर्थ 'आई' !!!
या सर्व लोकांची आठवण त्या एका ताका मूळे झाली. प्रसन्नतेचा लोणी मनाच्या भांड्यात तरंगला . येव्हाडी सर्व मानसं माझ्या आयुष्याचा भाग ज्याने केली, तो भगवंता माझे लाड या पुढेही असेच करील. या अपेक्षेसह-
आपला 'लाडका' गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment