Saturday, February 19, 2011

शिक्षण पद्धती - एक चिंतन !

शिक्षण पद्धती - एक चिंतन !
पहिली पासून सुरु झालेला पुस्तकी शिक्षण थांबून काही महिने झाल्यावर जेव्हा नोकरीला लागलो त्या दिवसापासून मनामध्ये दबा धरून राहिलेला एक विचार म्हणजे आपली शिक्षण पद्धती किती बरोबर आणि किती चूक ? शाळेत शिकताना मनात वाटायचं कि याचा पुढे खूप उपयोग होतो, म्हणूनच आपल्याला शिकायचं आहे. काही तरी उपयोग नक्की होईल. आज मागे वळून बघताना असं वाटता कि उपयोग झालाच पण तो योग्य नाही झाला.
म्हणजे साधी गोष्ट, ते- निबंध,चूक कि बरोबर,कारणे द्या, समीकरणे सोडवा..सनावळ्या पाठांतर, घटना क्रमानुसार लिहा, साव्विस्तर उत्तरे द्या,...इत्यादी इत्यादी..गोष्टींमध्ये अडकून पडलेली ती बालपणाची अनमोल १५ ते १६ वर्षे अक्षरशः पाण्यात गेली असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बेंबीच्या देठापासून ओरडून म्हटलेला जण गण मन, वंदे मातरम, हम सब भारतीय हैं ...१५ ऑगस्ट २६ जानेवारी ला आलेल्या राजकीय पाहुण्यांची भाषणे ( ते फार कर्तुत्ववान आहेत असं मानून ) ऐकण,, एन सी सी - चि परेड..कविता पाठांतर, शुद्धलेखनाच्या वह्या तोंडी परीक्षा ..सगळं सगळं फूकट गेलं. म्हणजे त्या वेळी मनावर बिन्बवलेले आदर्श, आणि आजचे वास्तवातले 'आदर्श' यात इतकी मोठी तफावत आहे कि मुलांना शाळेत पाठवावा का ? आणि पाठवायचाच तर कुठल्या ? आणि कशासाठी ?
माझ्या सुदैवाने पहिली पासून एम एस सी पर्यंत शिक्षणावर झालेला खर्च हा परवडणारा होता. अभ्यास क्रम कंटाळवाणा असला तरी ते शिकवणारे शिक्षक समर्पित वृत्तीचे होते ( अर्थातच काही ), त्या मूळे त्यांच्या कडूनच जास्त शिकता आलं. पण ज्या गोष्टीशी घेणं ना देणं त्या गोष्टी करण्यात हि वर्ष का वाया घालवली हे अजूनही कळत नाही. असं असताना, पुढच्या पिढीला याच पद्धतीत शाळेत पाठवणं म्हणजे 'ये रे माझ्या मागल्या 'होईल. त्यात आता बालवाडी पासून असलेली फी चि रक्कम, शाळेपर्यंत रिक्षा / टेक्सी मधून कोंबून नेणा आणि आणणं, अकारण धरला जाणारा इंग्रजी माध्यमाचा आग्रह, आणि सरते शेवटी हे सर्व कशा साठी ? हा अनुत्तरीत राहणारा प्रश्न. या सर्व परिस्थितीत काय काय करता येईल याचा विचार चक्र सतत डोक्यात फिरत असतं.
मुळात भारतातील शिक्षण पद्धती हि कुणा साठी काम करते हा महत्वाचा मुद्दा आहे.आपण ज्या नोकरीच्या संधी पर्यंत पोचण्या साठी या शिक्षणाचा आग्रह धरतो ती संधी म्हणजे नेमका काय आहे हे आधी जाणून घेतला पाहिजे. आज च्या घडीला ८० % नोकर्या ह्या येन केन प्रकारेण इतरांची हमाली करण्याच्याच आहेत. आणि हि हमाली करवून घेणारे जे ठेकेदार आहेत ते त्यांच्या पिढ्यान पिढ्यांची सोय करून केव्हाच मालामाल झालेले आहेत. त्यांच्या उद्योग धंद्यांची आणि इतर व्यवहारांची हमाली करू शकणा मनुष्यबळ तयार करणं येवढा एकाच लक्ष्य ठेवून सारी यंत्रणा राबवली जात आहे.आपण उगाचच खुश होत असतो..नोकरीच्या पदा वर आणि पगारावर..!
बरं माझा आक्षेप किंवा चिंतेचा विषय हा दोन्ही प्रकारे आहे. एक ज्यांच्या लेखी या हमालीला पर्याय नाही. ती करावीच लागणार.या मानादालीन साठी मला असं वाटता कि अभ्यास क्रमा मध्ये काही बदल घडवावेच लागतील. जसे कि- प्रत्येकाला पहिली पासून शिकवायचा कि हा देश जाती- पातीचा आहे, इथे सगळीकडे असमानता आहे. दुसर्याच्या तोंडाचा घास पळवायची तयारी असेल तरच तुम्ही जिवंत राहाल. देशाशी प्रतारणा करणं म्हणजे पुण्य कर्म आहे. बेफाम पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्या साठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी. पैसा प्रसिद्धी मिळाल्यावरही इथे इन्कम टैक्स चुकवणं, म्हणजे जणू क्रांती कार्य आहे.जितका जास्त आत्मसन्मान तुम्ही गहाण ठेवाल तितक्या प्रमाणात तुमचं भलं होईल. इथे जितका चांगल्या प्रकारे तुम्ही खोटं बोलाल तितक्या लवकर तुमचं उत्कर्ष होईल. दारू पिणं, सिगारेटी फुकण , कमीतकमी कपड्यातल्या बायका फिरवणं, आणि जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. पैसा आणि पैसा हेच तुमचं लक्ष्य असला पाहिजे. इत्यादि गोष्टी ह्या 'मूल्य' शिक्षणाच्याच तासाला मुलांना समजावून सांगितल्या पाहिजेत. ए.राजा., कलमाडी, लालू यादव,यांच्या कर्तुत्वाचे धडे, शरदाची कायम कात्रजच्या घाटातून झालेली सुटका, ललित मोदींपासून ते इतर अनेक दूरच्या ओळखीच्या लोकांशी त्यांनी केलेले यशस्वी तह, वयस्कर पंत प्रधानांनी सरकार चालवण्यासाठी म्हणून केलेला ७०००० कोटी रुपयांचा त्याग.. इत्यादी गोष्टी मुलाबालांकडून घोटून घेतल्याच पाहिजेत. मुला बाळांना, 'आदर्श' सारख्या वास्तू त घेवून जावून प्रेरणा दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीने मुला बाळांची सर्वंकष तयारी करून घेवून मग त्यांच्या निर्लज्ज पणा नुसार वर्गवारी करून त्यातूनही जे अधिकाधिक लाच देवू शकतील त्यांची एक राष्ट्रीय स्तरावर सामायिक परीक्षा घेवून मगच त्यांना विशेष शिक्षणासाठी परेदेशी विद्यापिथान्माधेही प्रशिक्षण देण्यात यायला हवे. या साठी कराची स्थित 'डॉन' चे विद्यापीठ हे आय आय अहेमदाबाद च्या तुल्यबळ समजले जावे. इथपर्यंत पोचण्याची क्षमता नसलेल्यांनी देशात असलेल्या फुटकळ संधी जसे- मार्केटिंग, सेलिंग, बँकिंग, इन्सुरंस या मध्ये नशीब आजमावून पाहावे. त्यातही गुलामीत स्वातंत्र्य उपभोगण्याची इच्छा असलेल्यांनी आय टी कंपन्या मध्ये काम करावे. हा बदल आजच्या घडीला नोकरी लागल्यावर मानसिकतेत करणं हे खूप कठीण जातं. सबब सतत 'बिनडोक' सुधारणा करणाऱ्या शिक्षण खात्याने वरील सूचनांची दखल घेवून अमुलाग्र बदल घडवल्यास पहिल्या दिवसापासून आदर्श गुलाम तयार होतील.
पर्याय दोन- ज्यांना हमाली मंजूर नाही- अशांसाठी किमान खालील; बदल शिक्षणात झालेच पाहिजेत.
किमान १-२ नव्या भाषा,( परदेशी भाषांकडे वळण्या पूर्वी भारत भूमितील अन्य भाषा शिकणा अधिक उत्तम ), क्रिकेट वगळून इतर खेळ खेळण्यासाठी पुरेशी जागा, आणि प्रशिक्षक, क्लासेस , गाईड आणि व्यवसायांची भंपक गिरी ताबडतोब बंद करून संगीत, कला, वांग्मय, गायन..इत्यादी गोष्टींसाठी विशेष साहाय्य आणि प्रोत्साहन. जगावर भारतीयांचा राज्य अशा बातम्या एकीकडे आणि भारतामाधुनच गायब होणारं भारतीयपण, हेच भारतीयत्व जपण्यासाठी भारतीय वेशभूषेचा प्रसार आणि प्राधान्य. खाणं - पिणं उच्चार या सर्वांमध्ये ज्येष्ठांचा मार्गदर्शन घेवून भारतीयत्वाचा मूळ गाभा कायम राखणं-जतन आणि संवर्धन."चूक ते चूक " म्हणण्याचा सामर्थ्य असलेली सशक्त पिढी घडविण्यासाठी मनोबल- तपोबल वाढविणारी शिक्षण पद्धती आज देशाला हवी आहे. 'प्रामाणिक' माणसा घडविण्याचा आव्हान पेलू शकणारी शिक्षण पद्धती तयार होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि बाजारू शिक्षण पद्धती बंद होणा अत्यंत आवश्यक आहे.
वर सुचवलेले दोन्ही कडचे बदल प्रत्यक्षात येणं कठीण असला तरी आपण आपल्या मनाशी ठरवला तर आपल्या पाल्यावर तरी 'जाणीवेचा' संस्कार करू शकता. मृगजळामागे धावण्यास आपण त्याला प्रवृत्त करू नाकं. तो पळत असेल तर, आपण पुढे होवून त्याला जल, आणि मृगजळ यातला फरक ओळखायला शिकवा. तो त्याचं स्वत्व विसार्ण्यापुर्वी .

No comments:

Post a Comment