माझं लग्न - माझी भूमिका...
एका मैत्रिणीचा इमेल..".जाती बाहेरच्या लग्नाबद्दल तुझं मत काय ?" साव्विस्तर लिही. जातीतल्या मैत्रिणीने असा अनपेक्षित विचारलेला प्रश्न बघून म्हटला मांदावीच माझी भूमिका एकदाची. मुळात आजच्या काळात मध्यम वर्गी मुलाचा लग्न होणा हेच कठीण होऊन बसलंय. म्हणजे आई वडील निवृत्तीच्या उंबर्यावर आलेले. फार मोठी संपत्ती गाठीशी नाही. खावून पिवून सुखी एवढंच. त्यात हि मुलगा जर का 'आय टी' क्षेत्रात कामाला नसेल, एमबी ए, नसेल तर झालं...त्याचे हालच ! म्हणजे आय-टी च्या महाभागांनी या इतस्र क्षेत्रातल्या ( माझ्या सारख्या) मुलांचे प्रचंड नुकसान केले आहे. कुठल्याही आई बापाला आपली मुलगी हि संपन्नता असलेल्या घरात नांदावी असाच वाटणार. त्यातही आय टी वाल्यांचे गालेलात्था पगाराचे आकडे आणि परदेशी जाण्याची संधी या दोन बाबी कुठल्याही मुलीला मोहात पाडणाऱ्या. म्हणजे मुळात ज्यांच्याशी लग्न करायला हरकत नाही अशा मुलीच मोठ्याप्रमाणावर कुणाही मध्यम वर्गीय मुलाकडे पाठ फिरवणार. इथे मध्यम वर्गीय म्हणजे २० ते २२ हजार पगार घेणारी मुलं. बरं येव्हड्या पगार साठी ती मुलं हि आपल्या घरा दारा पासून लांबच राहतात. म्हणजे अगदी कुणी एखादी मुलगी लग्न साठी चालून आली, घराच्य्नी आग्रह धरला तरी आपल्या पगारात हे सगळा कसा भागणार ?हा प्रश्न संभाव्य उपवरांना (विचारी) छाळातोच. एकदम काही पगार ३०-४० हजार होणार नाही हे त्यांना पक्का माहित असतं. म्हणजे दोनच पर्याय नजरे समोर..एक म्हणजे तारेवरची कसरत करत जी कोणी मुलगी येईल ( अर्थातच ती आणि कामी उत्पन्न गटातली आणि तुलनेने कमी शिकलेली असणार..) ती ला हो म्हणून संसार करायचा. किंवा नोकरी करणारी मुलगी शोधायची. म्हणजे निदान आर्थिक गणिताचा प्रश्न मिटला.
माझ्या दृष्टीने आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या निर्णयात इतर अनेक बाबी या प्रामुख्याने तपासल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे 'दोघांचे' विचार जुळतात का ? एकत्र येण्यामागे निव्वळ शारीरिक आकर्षण हे कारण आहे, का खरोखर विचारांची- जाणिवांची ओढ आहे ? कुणी जर का प्रेमात पडलेले असतील तर त्यांनी साथीदाराच्या गोड गोड बोलण्यापेक्षा अवघड प्रसंगी, अपयशाच्या काळात खंबीर पणे आपल्या पाठी ठाम उभा राहण्याची क्षमता आपल्या संभाव्य साथीदाराची आहे का ? हे आधी तपासायला हवं. वेळ प्रसंगी कान पकडून तूझ चुकतंय हे सांगायचा धाडस हवं. आणि फार महत्वाचा म्हणजे आपण सोडून इतरांशी तिचं / त्याचा वागणं बोलणं कसा आहे ? याची स्पष्ट कल्पना असली पाहिजे. अनोळखी व्यक्तीशी लग्नगाठ बांधण्यापेक्षा परिचयातल्या मुलीशी जी मला खूप छान समजून घेते अशा मुलीशीच मी लग्न करीन. अर्थात जातीतल्याच-'कोकणस्थ ब्राह्मण ' असलेल्या मुलीशीच.
आता तुमच्या मनात येणाऱ्या 'का'? या प्रश्नाचा माझा वीस्लेषण असं- आचार- विचार, वाणी- उच्चार, आवड आणि आहार या बाबतीत माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या माझ्याच जातीतल्या साथीदाराकडून पूर्ण होतील अशी माझी धारणा आहे. आणि एक, जाती बाहेरच्या लग्नाचा प्रसार आणि समर्थन करणाऱ्या तमाम मंडळीनी खुशाल आपल्या पेक्षा खालच्या जातीतील मुलीशी लग्न करावा. त्यांचं मन राखण्यासाठी मी माझा निर्णय बदलणार नाही ! माझा इतर जातींना / धर्मांना बिलकुल विरोध नाही. पण मी माझ्या स्वत्वाला टाकून त्यांना गोंजारणार नाही हे निश्चित. आम्ही ब्राह्मणांनी स्वत्व सोडला म्हणून इतरांच्या नजरेतला मान कमी झाला. आपण व्यवस्थित राहिला तर इतर जातीची लोकच आपली जास्त काळजी घेतात हा माझा अनुभव आहे.
लग्नात होणार्या दाग-दागिने, कपडे , विडिओ शूटिंग, खोटं खोटं हसून केला जाणारा फोटो शूट इत्यादी खर्चिक बाबींना माझा तीव्र विरोध आहे. सामारांभातली सहजता या गोष्टींमुळे निघून जाते. विधी बाजूला राहतात, नको त्या गोष्टींचा स्तोम माजत. वरातीतला नाचकाम-धांगड धिंगा या सगळ्या मला ना पटणार्या बाबी आहेत. असो. वधु पक्षा कडून होणार्या खर्चात 'आपल्या परिचितांची' जेवणावळ घालण्याची वर पक्षाची प्रथा तर मला माझ्या लग्नात मोडूनच काढायची आहे. नसते मान-पान लुडबुडू नं देता कमी खर्चात आणि अधिक आनंदात विवाह करणं निश्चित शक्य आहे.
फक्त कुणा 'एकीचाच'-
'उपवर' - गुरुप्रसाद खाडिलकर.
९५६१४३४९८८
नंदुरबार दुपोरी १२.३० वा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment