Saturday, February 19, 2011

रुखरुख ...आणि एक व्हालेनटाइन

रुखरुख ....
हळूहळू चढणाऱ्या गंजा प्रमाणे काही गोष्टींची खंत अलगद मनामध्ये साठत जाते. आपल्याच नकळत. पुन्हा दुसर्या गोष्टीवर नाराज होवून हिरमुसून बसल्यावर मग लक्षात येत जाते हळुवार पणे, साठलेली खंत. नाराज होणं हि दोन प्रकारचा- एक तर अत्यंत दुखी झाल्यावर वाट्याला येणारा एकटेपण जाणवून देणारा, किंवा कितीही खुश असलो तरी त्या ख़ुशी मध्ये अनिकुणी तरी ताबडतोब सामील झालाच पाहिजे अशी इच्छा असूनही ते घडत नाही त्यावेळी जाणवणारं. म्हणजे नेमका आत्ता माझ्या मनात जे सुरु आहे ते हेच...लिहायचा आहे ते आणि मी जे लिहितोय ते यांचा मेळ बसत नाहीये. मनातला मूळ मुद्दा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांच्या अधे- मध्ये अडकायला होतं. हे अडकणा जसा आपल्या हाती नाही तसाच त्यातून बाहेर येवून मुक्त विहार करणं हे हि आपल्या हाती नाही. बद्धता आणि मुक्तता अनुभवणं एव्हढंच आपण करू शकतो. बाकी सर्व ईश्वराधीन.
जवळ भ्रमणध्वनी असून, क्रमांक, पुरेसे पैसे शिल्लक असूनही काही वेळा...(बर्याच वेळा) हवं त्या क्षणी आपल्याला हवं त्या व्यक्तीशी बोलता येईलच असाही नाही ! कधी संपर्कच होत नाही, तर कधी मुद्दाम उत्तर दिला जात नाही. कारणं बदलत राहतात , परिणाम तोच होतो." कृपया थांबा थोड्या वेळाने संपर्क करा आपण प्रतीक्षित आहात....". नोकरी साठी दिलेल्या परीक्षांपासून, कुणा खास मैत्रिणी च्या सहवास सोडा - ओ संवादासाठी देखील आम्हीच कायम प्रतीक्षित.....वा रे दुनिया दारी..........!!!
रेल्वे च्या तिकीटा पासून ते, व्हालेनटाइन च्या स्वप्नातीत गुलाबा पर्यंत आम्ही कायम प्रतीक्षितच...ते हि हा विश्वास ठेवून कि जे होतं ते चांगलाच होता...!!! वा हे बरं आहे , आम्ही चांगुल पणावर मारे विश्वास ठेवून वयाची पंचीवीस वर्ष ( कमीत कमी ९ व्हालेनटाएन ) फुकट घालवली..तरी आमच्या चांगुल पणावर भाळणारी आम्हाला कुणी भेटलीच नाही अजून...फक्त दोन जणांचीच चर्चा जोरात...सालाबाद प्रमाणे त्याला विरोध करणारे, आणि प्रेमात बरबाद झालो तरी हरकत नाही प्रेम करायचंच असं ठरवून रिंगणात (बोटातल्या )उतरणारे ! आम्ही दोन्हीकडे प्रतीक्षितच ...!
निर्व्यसनी असणं, मितभाषी असणं, आणि मुख्य म्हणजे व्यवहारी असणं हे सर्व सदगुण म्हणजे गुलाबा पासून दूर ठेवणारे काटे असतात हे जर का लहानपणी कळला असता तर...... मारे आम्ही आज असे एकाकी असे लेख लिहित का बसलो असतो ? मस्त उद्याची तयारी करत बसलो असतो कि..!
पण काय करता ... नशिबान थट्टा आज(वर) मांडली ...!
बहुतेक एकाकी पणाने आमच्या नशिबाला लाल गुलाब देवून वश केला असावं..व्हालेनटाइन च्या जन्मा आधीच.. !

No comments:

Post a Comment