मूर्खांचे आदर्श राज्य , उर्जेचे प्रकल्प... आणि अकलेचा अंधार !
कोकणात हट्टाने आणल्या जाणार्या उर्जा प्रकल्पांचा वेगवेगळ्या समित्यांकडून आणि संघटनांकडून वेगवेगळा आढावा घेण्या ऐवजी
एकत्रित पाहणी केलीच गेली पाहिजे. मधुमेह झालेल्या माणसाने जर का दहा वेगवेगळ्या डॉक्टरांना केवळ एक जिलबी खाल्ली तर चालेल का ?
"मी लगेच मारणार तर नाही ना" ? असे विचारले तर सगळे एकजात नाहीच म्हणतील. जिलबी खायला परवानगी देतील. म्हणून त्या रुग्णाने जर का दहा डॉक्टरांनी हो म्हटला म्हणून १० जिलब्या खाल्या तर काय होईल ??? आणि त्याचा परिणाम कुठला डॉक्टर टाळू शकेल ? नाकारू शकेल ?
आमच्या स्वहित वादी लोकनेत्यांना या प्रकल्पांमध्ये मिळू घातलेल्या 'मलई' साठी अक्खा कोकण नासवून टाकायला ते तयार झाले आहेत. प्रकल्प उभे राहतीलच याची पुरेपूर काळजी अगदी वरच्या टेबला पासून पंचायती च्या स्तरापर्यंत घेण्यात आलीच आहे. या सर्वांसाठी लोब्बिंग करणारी 'रेदिया' कोन आहे हे अजून गुलदस्त्यातच आहे.
अशोक असो व पृथ्वीराज...लोकांच्या भावनांचा अनादर करणं, आणि मतलबा करता लोकांच्या आयुष्याशी खेळणं हे विलासी राजसत्तेच आणि राष्ट्रवादी राजकारणच मुख्य सूत्र झाला आहे. आम्ही स्थानिकांनी आता नक्षल वादी व्हायचा ? का, बाडबिस्तरा गुंडाळून काही वर्षात कोकणातून पोबारा करायची तयारी ठेवायची ? काही ना काहीतरी करावा लागणारच आहे....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment