Tuesday, March 29, 2011

उद्विग्न चित्त !

उद्विग्न चित्त !

करायला जावं एक आणि व्हावा भलतच...! या गोष्टीचा प्रत्यंतर देणाऱ्या काही गोष्टी आज काल सतत घडत आहेत, त्यांचा हा संक्षिप्त लेखाजोखा!
नोकरीला लागल्यानंतर पहिला पगार हाती येण्या पूर्वी, एका मित्राला माझ्या दुसर्या मित्राकडून उसने दिलेले ५००० रुपये हा माझ्या आयुष्यातला पहिला 'हवाला' चा व्यवहार.याच व्यवहाराने यापुढे कुणाच्या हि 'हवाल्याने' कधी हि व्यवहार करायचा नाही हे शहाणपण दिलं. 'दया दुक्खाच कारण आहे' म्हणजे काय हे मला व्यवस्थित कळलं ते हि याच आठवड्यात. खिशात दमडी नसताना, मित्राच्या आलेल्या एस एम एस वर विश्वास ठेवून, दुसर्या मित्राला सांगून, अक्षरशः अर्ध्या तासाच्या आत खात्यात पैसे भरले गेले. त्या क्षणापासून, या आगंतुकपणे गरजू बनलेल्या मित्राने माझ्याकडे आणि माझ्या पैसे देणाऱ्या मित्राकडेही जी काही पाठ फिरवली कि बास रे बास! तब्बल दोन ते अडीच महिने झाले तरी याचा एस एम एस हि नाही आणि फोन हि नाही. दरवेळी मीच फोन करायचा, जणू काही त्याला वेळेत पैसे मिळवून दिले हा माझा गुन्हाच होता ! अजूनही गुंता तसाच आहे, माझं नशीब थोर म्हणून या पैसे देणाऱ्या मित्राने मला एका शब्दाने पैशाबद्दल विचारलेला नाही ! मुळात मनस्ताप पैसे नं मिळाल्याचा नाहीच, त्या मित्राने ज्या प्रकारे सरड्या प्रमाणे रंग बदलले त्याचं दुक्ख अधिक !
मी नंदुरबार मध्ये जिथे भाड्याने राहतो तिथे शेजारच्या खोलीत एक काकू त्यांच्या मुलां बरोबर राहतात. त्यांच्या मुलीचा लग्न होतं काल. त्यांचा संसार एका खोलीचा. तर माझ्या ताब्ब्यात दोन खोल्या. लग्न निम्मिता येणारी पाहुनी आणि एकूणच जास्तीचा समान ठेवण्या साठी त्यांनी माझ्या रिकाम्या खोल्यांची मागणी आधी साखरपुड्याच्या चार दिवसांसाठी म्हणून केली. त्याला होकार दिला. साखरपुड्या नंतर लग्न होईपर्यंत (आणि दोन-अडीच महिने ) सामान माझ्याच खोलीत राहू दे म्हणाल्या. तरी ठीक म्हणून हो म्हटला. माझं विचार हा कि, मी सकाळ पासून खोलीच्या बाहेर राहणार.मला खोलीत सामान असला काय नसला काय काय फरक पडणार ? रात्री झोपण्या पुरती 'साडे तीन हात जागा पुरेशी आहे. बरं बाकी गोष्टी म्हणाल तर- एकूण माणसांची संख्या हि तेवढीच-(घर मालकाच्या नजरेतून), नाही तरी त्यांनी जागा भाड्याने दिलेलीच मग आम्ही ती अशी वापरली तरी त्यात गैर वापर करण्याचा प्रश्नच नवता. तरीही मालकाच्या कुटुंबामध्ये एकूणच नाराजी होती. त्यांच्या मते मी यांना सरळ सामान काढून घ्या असं सांगून दar लावून घ्यायला हवं ! यातून त्या कुटुंबाला त्रास देण्यापलीकडे काहीही साध्य झाला नसतं हे माझं प्रांजळ मत .
पण इथेच घोळ झाला. माझ्याच बाथरूम मध्ये पाणी तुंबू लागल. शाम्पू चि पाकिटे, चहाची पावडर, इत्यादी गोष्टीनी बाथरूम तळ्यात परिवर्तीत होवू लागल. धड कपडे धुणं शक्य होईना, तेव्हा मालकाच्या कानावर घातलं.तर त्याचं उत्तर अचंबित करणार.म्हणे पाणी जातंय नं सावकाश सावकाश ..
जणू काही झालेलाच नाही असं मक्ख चेहरा....! 'सगळे आपल्याच देशात म्हणून गप्पा बसलो'. पुन्हा काही दिवस गेले, प्रश्न तसाच. परत मालकाला भेटायला गेलो. मालक गायब ( बाहेर गावी)! दुसरा कुणी मुलगा होता. त्याला म्हटला, हे बरं आहे "भाडं दोन दिवस उशिरा मिळाल तर चालत नाही, आणि बाथरूम साफ करून देता येत नाही सांगूनही ". १००% खरा असलेला विधान एव्हडा झोंबला त्यांना ...दोन दिवसांनी संध्याकाळी मलाच तंबी- "तुम्हाला माणुसकीच्या नात्याने दिला वापरायला, पसंत असेल तर रहा नसेल तर सोडून जा..." बेशारामपनाचा कळस करून ज्या मिजासीत मालकाने हे वाक्य सांगितला त्याला खरच तोड नाही. आत्तापर्यंत सतरा वेळा त्यांच्या सोयीसाठी जिना उतरून धुतलेले कपडे, जिना चढून नेलेला पाणी (पंप बंद असताना), एक साधा दिवाही नसलेल्या दोन खोलीचे मासिक १७०० रुपये भाडं ! तेही नंदुरबार सारख्या भागात..! सगळं सगळं फूकट गेला....!
वर कमाल म्हणजे ज्यांना मी खोली वापरायला दिली त्यांना १५ दिवसाची मुदत आणि मला चार दिवसाची...वा रे ! उद्धवा अजब तुझे सरकार....
दोन दिवस गेल्यावर...म्हटला जग राहती प्रमाणे थोडा मतलबी होवुया..! पुन्हा मालकाला भेटलो म्हटला ठीक आहे "माझीच चूक झाली, तुमचं एकदम बरोबर आहे! " हे सांगितल्या वर तणाव निवळला .. वर वर पण..माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या थांबल्या नाहीत... आपला खरा असताना, हेतू चांगला असताना मलाच मान झुकवावी लागली याची फार मोठी बोच त्या पाठी होती.
बरोब्बर लग्नाच्या आदल्या रात्री..जेव्हा खोलीत गेलो तेव्हा खोलीला कार्यालयच स्वरूप आलेल. माझ्या छोट्याशा देवघरात, आरसा, वासेलीन अशा गोष्टी आलेल्या,, लादीला हळदीचा रंग, माझ्याच्ग खोलीत बूट -चपला घालून वावरणारी लोक...माझ्याच खोलीत मीच परका झालेला..! दिवसभर दमल्यावर छान झोपायचा 'मूड' असताना रात्री १०.३० ला सुरु झालेला बैंड....वाद्यांच्या ठेक्यावर नाचणाऱ्या चार वर्षांपासून ते पन्नाशी पर्यंतच्या 'मुन्नी' आणि 'शीला' ! नाचणाऱ्या पोरांवर ओवाळून दिल्या जाणार्या नोटा..,,,,,, मी हतबल होवून खोलीत आलो...बड्या मुश्किलीने जागा साफ सुफ करून घातलेल्या माझ्या अंथरुणावर कुणी तरी 'नाचलेला' स्पष्ट जाणवत होता. 'ठशांच्या'पुराव्याने मी ते सिद्ध करू शकत होतो. पुरावे नष्ट करून निराश मनाने मी डोळे मिटले. लष्कराच्या भाकर्या भाजण यालाच म्हणत असावेत बहुतेक.. !!!
लोक ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वताचा दिलेला शब्द बदलतात, खोटं बोलतात..त्याने फार त्रास होतो. पैसे द्यायचे नाहीत तर थेट तसं सांगायला हवं होता,,मला बाहेर काढायचा तर ठोस कारण द्यायला हवं होता..व्यवहारीकतेचा टेंभा एकीकडे आणि अदेल्तात्तू धोरण दुसरीकडे..कशाचा कशाला नेम नाही..अशा लोकांच्यात जगायला लागतं याचाच दुक्ख आहे. एकतर हे सगळं सोडून फकिरी करण्याच मन: सामर्थ्य मिळाला पाहिजे नाहीतर, फासावानार्यांचे कान पीरगळता येतील अशी संपन्नता पाहिजे..

No comments:

Post a Comment