Tuesday, March 29, 2011

गूढ

शांत मुद्रा एकाग्र नजर, खुणेनेच त्याने मला बसायला संगितल। मनात नसताना हा म्हनतोय तर बसूया अस विचार करून बसलो।
माझ्याकडे दुर्लक्ष करुन हा डोळे मिटुन शांत बसलेलाच. माझी नजर सैरभैर मनगटाच्या घड्याला पासून ते हळुवार जळणाऱ्या उदाबात्तीपर्यंत सगळी कडे फिरतेय...!
एकीकडे ह्याचा दुर्लक्ष बघून मनात क्रोध आलेला,आणि त्याचवेळी या पस्तिशीच्या माणसाचा शांत आणि तेजोमय चेहरा मनाला अस्वस्थ करत होता. हातातली जपाची माल पूर्ण झाल्यावर त्याने
साईबाबांच्या कुटीत साष्टांग दंडवत घातला. हात जोडून प्रार्थना केली आणि मला पाठोपाठ येण्याची आज्ञा करून स्वारी बाहेर पडली.
मी मुकाट पाठोपाठ चालत राहिलो. एका टपरीवर येवून मला 'कॉफी' पाज चा आग्रह एकदाची ब्याद टळेल म्हणून म्हटला देतो बुवा. तर काय करता कॉफी नाहीच.!.एक नाही जे दिसेल ते हॉटेल बघितला, कॉफी नाहीच. महाशय अडूनच बसलेले. दुध नको. चहा नको. सरबत नको. खाणं नको! पैसे नकोतच, आज कोफीच पाहिजे ती पण तुझ्याकडून ! शिर्डी सारख्या ठिकाणी कोफ्फी मिळणार नाही असं होणाच शक्य नाही पण त्या दिवशी झाला ! मी काकुळतीला आलो शेवटी. मी निघतो म्हणालो तर नाही, आज तू मला सोडूच शकत नाहीस. चाल एस टी स्टेन्ड वर ,चला तर चला. दोघांचा मोर्चा तिकडे निघाला. "तू दमलास आता उसाचा रस पी. तुला आवडतो तो " या वाक्यावर माझी विकेट ! प्रकरण काय आहे कळतच नाहीये. स्वच्छ पांढरा शुभ्र झब्बा ,धोतर पायात चपला नाहीत, गौर वर्ण आणि कटक शरीरयष्टीचा हा माणूस हातात एक जपाची पिशवी घेवून माझ्या बरोबर 'बरोब्बर' दोन एक तास आहे. पण मी काही अंदाज बंधू शकत आहे याच्या बद्दल. मी म्हत्लाचालेल मला रस हवाय.
रस पिवून झाल्यावर याने मला सांगितला जी गाडी येईल त्यात बसायचा. मी बसलो. पिंपळ गावाला जाणारी गाडी आली. दुपारच्या उन्हात रस प्याल्यावर बरं वाटला . गाडीत पुन्हा चक्रमपणा, स्वताच तिकीट स्वत काढला. अर्ध्या तासाने कंडक्टर ला गाडी थांबवायला सांगून, स्वारी खाली उतरली.मागो माग मी. गाडी निघून गेली आणि मला घाम फुटला. निर्मनुष्य रस्ता. मी कुठे आलोय ते मलाच काळात नव्हता. रस्त्याला रहदारी बेताचीच.
मूळ रस्ता सोडून स्वारी आड वाटेने चालायला लागली. काय होईल ते होईल.मी हि निघालो. आत्ता पर्यंत शांत असलेली स्वारी हळू हळू बोलायला लागली. "अध्यात्म, देव म्हणजे काय फावल्या वेळचा उद्योग वाटला का ? दर वेळी हात जोडून उभे राहताना आनंदाची याचना करण्या पेक्षा देवा आनंदात असताना मला तुझी आठवण येवू दे.हसत मुखाने तुझ्या दर्शनाला येत येवू दे असं का नाही मागणं मागत ? सगळे उपाय थकल्यावर देवळात जायला लागलास तू. काही सूचना, देवाने आणि दैवाने तुला दिल्या आहेत त्यांचा कधी गांभीर्याने विचार केलास का ? फार छोट्या छोट्या गोष्टीने हतबल होतोस, वैताग्तोस असं कसा चालेल बेटा ?"
त्याने बेटा म्हटलेला ऐकला आणि का कुणाश ठावूक हायसं वाटला. 'बाबांची' फार आठवण आली. आज इतक्या दिवसांनी त्याच आपुलकीने पहिल्यांदा कुणी तरी हाक मारली.बरं वाटला.
"तुला जे करायचा आहे त्याची वेळ अजून आलेली नाही. तुला जे करायचा नाहीये तेच तुला करायला लावायचा अशी ईश्वराची इच्हा आहे. सबूर.मला कळतंय तुझ्या मनात काय काहूर माजलाय ते.
माणसाची सहनशक्ती आणि समर्पण शक्ती वाढण्यासाठी प्रतिकूलता हवीच. हे एकदा झाला कि पुढचा मार्ग प्रकृती आपोआप मोकळा करून देते. तुला अजून काही काळ थांबवा लागेल त्यासाठी.
एकंच वेळी दोन्ही पायावर उभा राहता येत असला तरी पुढे जाण्यासाठी एक पाऊल उचलण्याची जोखीम स्वीकारावीच लागते. एकाचवेळी अलौकीकाची साद आणि भौतिकाच आकर्षण धरण चूक आहे. एकाकडे पाठ फिरावावीच लागेल. आणि यासाठी मनाची एकाग्रता गाठावीच लागेल. मन स्थिर कर. विचार करणं चांगला पण अविचार करणं वाईट. भगवंतास ते मंजूर नाही. थोडा थांब. जसा आहे तसा चालू दे. इतत्रंशी स्पर्धा, तुलना अजिबात नकोच. तुझ्या आणि त्यांच्या गरजा भिन्न आहेत.हे पक्का लक्षात ठेव. तू त्यांच्या सारखा बनण्याचा प्रयत्न जितका करशील तितका फसत जाशील.
तुला जे रुचेल, पटेल तेच कर. आतली साद ऐकत जा. पण सध्या टोकाचे निर्णय , कृती नको. सबूर."
"म्हणजे मी काय करू? तर कारकुनी करत दिवस कंठीत राहू का ? त्यापेक्षा सगळा सोडतो आणि परिक्रमा सुरु करतो..जे होईल ते होईल, नसेल तर जीव देतो सरळ. चार पैशांसाठी अपमान सहन करा, हांजी हांजी करा सांगितलाय कुणी ? आधी गरजा वाढवा नंतर त्या पूर्ण करण्या साठी पैसा कमवा. दिवसभर पैशासाठी गुलामी करायची आणि पैसा येईल त्या वेळी ना जवळ आपली मानसं ना मनसोक्त वेळ. काय उपयोग काय त्याचा ? मी कंटाळलो आहे. मला कुणी वेडा म्हटला तरी हरकत नाही. मी खरच कंटाळलो आहे" माझी भूमिका.
"जे दिसत त्यावर जावू नकोस. जे तुझ्या आयुष्यात येणार आहे त्याचा विचार कर. तू जितक्या लवकर तयार होशील तितक्या लवकर पुढचे योग जमून येतील. तू लिफ्ट ने कधी बिल्डिंग च्या वरच्या मजल्यावर गेलायस का ? " "हो."
"माग त्यावेळी जसा वरती गेल्यावर खालचा माणूस छोटा दिसतो ना तसाच इथे हि असतं. तुला -मला प्रत्येकाला वाटत राहता मला किती त्रास आहे, मी किती करतोय..पण खरा सांगू का सगळी "माया" आहे. ताल मजल्यावर दिसणारा माणूस हि पण मायाच आणि चातावरून छोट्या आकारात त्याच मानसाच दर्शन देणारी सुद्धा मायाच! तिचा अस्तित्व आणि कारकत्व जाणवणं महत्वाच.
साधनेने हे सर्व हळू हळू लक्षात येत जाता. माग नफा तोटा,सुख-दुख या पलीकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. मन स्थिर केल्या शिवाय हे शक्य नाही.आणि मायेच्या किमये मुले मन स्थिर होणा सहज शक्य नाही."
"यात उपाय काय मग ?"
"असं विचार करायला सुरुवात करायची कि आपण, आपल्या समस्या, आपली दुक्ख हे फार क्षुद्र आहे. आकाशातल्या चांदण्याकडे, आकाशाकडे मन उंचावून बघायचा, मनोमन आपणही एखादी चांदणी-चंद्र जे काही आवडेल ते व्हायचा आणि मग आपल्याकडे आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती कडे बघायचा. तू जेव्हा आकाश्रूप होशील तेव्हा तुला कळेल कि तुझी तहान किती लहान आहे. विधात्याचा सामर्थ्य किती आहे, तो किती जणांची तृष्णा भागवून हि कसा निरीचा आहे हे एकदा का कळला कि अहं पण आपोआप कमी होत जाईल."
"हे सगळा ठीक आहे हो ऐकायला . पण कस आहे ना , प्रवेश परीक्षांमध्ये यातले प्रश्न येत नाहीत. जे येतात तेच मला सोडवता येत नाहीत.समोरची आवश्यक असलेली गोष्ट त्या त्या वेळी कधी केलीच नाही आजपर्यंत.कायम आकर्षण कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीचा. गणितात कधी जीव लागलाच नाही, आणि त्यामुळे आज हे असं गणित चुकाल्यासात्रखा वाटता. समीकरणच चुकीचा आहे का मीच चुकीच्या समीकरणात अडकून बसलोय ते काळात नाहीये."
"काही गोष्टी आणि व्यक्ती ह्या गणिताच्या बाहेर असतात. अलौकीक्ची ओढ असणार्यांना अलौकीकाची मदत मिळतेच. पण त्यासाठी निष्ठा आणि विवेक पाहिजे. या दोन गोष्टी गमावू नकोस. प्रचीती येणारच."
आम्ही गप्पा मारत मारत एका पिंपळाच्या पारा खाली थांबलो.
मस्त पाठीवरची निळी पिशवी बाजूला ठेवली. पायातले बूट काढले आणि कालोथ्री कठड्यावर अडवा राहिलो.
पानांची साल साल ऐकत मस्त वार्यावर आकाशात बघताना झोप केव्हा लागली कळलाच नाही.
जागा झालो त्या वेळी महोदय पद्मासन लावून नामस्मरण करत बसलेले. जपमाळ चालूच.
अस्ताला प्रचंड वेगाने जाणारा सूर्य. क्षण क्षणाला वाढत जाणारा अंधार.
बरोबर कुणी तरी आहे या एकंच विश्वास मुळे अजिबात भीती वाटली नाही.
त्या उसाच्या रसात काय होता देव जाणे. मला ना तहान लागली ना भूक !
रात्री टपोर्या चांदण्यात मी जेव्हा माझ्या बरोबरच्या व्यक्तीकडे नित बघितला तेव्हा मी हादरलो.
हि व्यक्ती कुणी सामान्य नाहीच मुळी. त्यांची बैठक 'व्याघ्रजीनावर" स्थानापन्न होती. आम्ही आलो त्या वेळी तर काहीच नव्हता इथे. आत्ता अचानक व्य्घ्राजीन कुठून आणला? कुणी आणला ?
अजूनही तेच तेज चेहऱ्यावर झळकत होता.
मला त्यांनी डोळे मिटुन त्यांच्या समोर बसायला लावला. कसला तरी टिळा माझ्या कपाळाला लावला.
"अजिबात चिंता करायची नाही. ईश्वरी संकेत नुसार आपली भेट झालेली आहे. तू ज्या काही विवंचनेत आहेस त्या फार फुटकळ आहेत. त्या काही काळात दूर होतील. पंचेंद्रियांच्या पलीकडच्या ज्या काही लहरी तुला झेलता येतील त्या झेलून घेण्याचा त्यांचा अभ्यास करण्याला सुरुवात कर. तुझे स्वताचे असे जे कुणी आहे ते तुझ्या आयुष्यात येवू घातले आहे. ते कोण हे जरी तुला कळला , जाणवला तरी तू स्वताहून पाठीमागे जायचा नाही. व्यावहारिक गोष्टीत त्रास झाला तरी दुक्ख नको. चालत राहा. नामस्मरण, आराधना चालू ठेव. आईवडिलांच्या पुण्याईचे फळ फार मोठे आहे तुझ्या. स्वताच्या सामर्थ्याची जाणीव जगाला करून देण्या आधी ती स्वताला पूर्णपणे व्हावी लागते. ती होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आणि त्यासाठी 'गुरु' ची मदत लागते.
तुझ्या 'गुरूंच्या' इच्छेने आज आपली भेट झाली. संकटात असताना केव्हाही त्यांना साद घाल. मदत नक्की मिळेल. समाधान आणि सदिच्छा यांनी मन भरून राहूदे तुझा. दीर्घ श्वास घे. "
असं सांगून त्यांनी कपाळावर हात ठेवला. या पुढचा आत्ता काहीच आठवत नाही. सकाळी जग आली तेव्हा मी रस्त्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर बसलेला होतो.
सायकलला किटल्या लावून लोक दुध घेवून जात होती. एकाकडे मागून निरसं दुध प्यालो. येणाऱ्या तम-तम ला हात दाखवून.एस टी च्या थांब्यावर गेलो.
त्या दिवशी भेटलेला माणूस हा अजूनही माझ्यासाठी गूढ विषय आहे !!!
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
नंदुरबार.
२३-३-२०११
८.५५ रात्रौ.

No comments:

Post a Comment