Tuesday, March 29, 2011

मागणे

का मज हि शिक्षा देवा, थोडी द्यावी भिक्षा!
भिक्षा हि कृपेची तुझ्या, जीवना देई शोभा,
शोभा जी झाली ती फार झाली,कर क्षमा!
क्षमा मागण्या नं लावी, दे वर पुराशोत्तमा !
पुराशोत्तमा,धाव सत्वर,कर साहाय्य,
साहाय्य लाभता तुझे, नाही दूर मम भाग्य,
भाग्य उभे पुढे जरी,सांप्रतचा निवारी अन्याय,
अन्याय जो झाला तो जरी मानू न्याय,
न्याय देई माझ्या अंतरीच्या सदभावा,
सदभावा ने मागतो मागणे देवा,
देवा द्यावा ठेवा,नं वाटो कुणाचा हेवा,
हेवा वाटावा इतकी होऊ दे सेवा,
सेवा, घडू द्यावी 'गुरू'देवा!
'गुरु'देवा अधिक नं करा उशीर,
उशीर फार झाला,जितकी धरली सबूर,
सबूर नं उरली,जीव झाला अधीर,
अधीर मी उदार तू , तरी का हा उशीर?
उशीर नको आणिक आता,करी पाखर,
पाखर मायेची करी लवकर,
लवकर मिळो दे गा माझे आकाश,
आकाश कंटाकाना , मला कशास कारावास?
कारावास विवन्चानेचा, नं देई आणिक,
आणिक किती विनवू तुला,असशी तू सर्वज्ञ,
सर्वज्ञ तू, कृपाळू तू, पारू मी मूढमती अज्ञ,

अज्ञ मुलाच्या अपराधा करुनी क्षमा,
क्षमाराज भगवंत देईल कृतार्थतेची भिक्षा !
भिक्षा मागणे माझे काम,केले मी आता,
आता, दाता परमेश्वर देईल ते देओ,
देओ जसे हवे तसे,चिंता मी सांगा करावी का ?

-गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
नंदुरबार
५-३-२०११
७.३५ संध्याकाळी.

No comments:

Post a Comment