Tuesday, March 29, 2011

मी कालचा आणि आजचा- माझ्याच नजरेतून

मी कालचा आणि आजचा- माझ्याच नजरेतून

लहानपणापासून इतरांपेक्षा काहीतरी वेगळा करण्याची ओढ, आणि त्यासाठी काहीही झाला तरी दुसर्यांचा नुकसान करायचा नाही हि तळमळ सोडली तर आज माझ्याच बर्यच जाणिवांचा संदर्भ माझ्याच पुरता बदलला आहे. जो मला इतरांच्या वागण्या बोलण्यात प्रतीत होताना जाणवतो. या क्षणी जाणवणाऱ्या अशाच काही बाबी.
एकेकाळी शाळेच्या गेट जवळच्या वडापाव च्या गाडीवर मिळणाऱ्या चटणी-पाव चं हि प्रचंड आकर्षण होता. त्या वयात वाद-पाव, मसाला डोसा, पाव-भाजी अशा गोष्टी म्हणजे मेजवानी वाटायची राव . चायनीज आणि पंजाबी पदर्थ तर शाळेच्या वयापर्यंत गावीही नव्हते. त्यानंतर शिक्षणा साठी घरापासून लांब गेलो आणि सकाळ संध्याकाळ बाहेरचा खावून आता जीभ खरच कंटाळली आहे. आता छान आई च्या हाताचा तूप मेतकुट घातलेला गुरगुट्या भात, मस्त हापूस आंब्याच्या लोणच्याच्या फोडी बरोबर दही भात, वरणभात - साजूक तुपाची धार वर धरून खायची ओढ लागून राहिली आहे.

शाळेचा गणवेश शोधून , तो घालून शाळेत पुन्हा दंगामस्ती करायला काय मजा येईल....असं आत्ता वाटतंय जेव्हा ते करता येणार नाही हे सुस्पष्ट दिसत आहे. पण त्या वेळी ओढ होती ती केव्हा एकदा या अभ्यासाच्या- परीक्षेच्या कत्कतीतून बाहेर पडेन याची. सापेक्षता हि परिस्थितीनुसार माणसाला कशी बदलवते हे समजून घेताना आतून फार फार वेदना होतात. रोज 'फोरमल' कपडे, किंवा अगदी-जीन्स ची पंत आणि टी-शर्ट यांचं हि कंटाळा आलाय....पुन्हा एकदा मस्त चड्डी बनायन वर माझ्या मिरजोल्यात मस्त गावभर अक्षरशः उंडारत फिरायचा आहे. आणि लहानपणी सारखेच 'कुठे लोळून आलास दिवस भर' ? असे 'पार्वती काकू' च्या तोंडचे शब्द ऐकायचेत. चप्पल ना घालता, अनवाणी पायांनी लाल मातीत बागडायचं आहे, प्रत्येकाच्या गोठ्यात जावून ' हवं तेव्हढा 'शेण; हाताने उचलून आणायचं आहे. पाण्याची तनचाईi असताना घराबाहेरचा अंगण स्वताचे हात शेणात भरून अंगण हिराच्या झाडूने , आणि घरातली खोली हाताने सारवायची आहे.... त्यातली मजा ह्या झगमगीत मार्बाल मध्ये नाही.....सारवलेल्या जमिनीवरच लोळण घेवून पूर्वीसारखाच तल्लीन होऊन 'खाडीलकारांचा - 'नवाकाळ ' वाचायचा आहे...घराची दार सताड उघडी ठेवून घराबाहेर भटकायचं आहे....., शेजारच्या पिंपळाच्या झाडाचा वारा अंगावर घेत मस्त झोपून जायचं आणि, रात्री समोरच्या राताम्ब्याच्या झाडावरचे काजवे बघत बघत अंगणात रात्रभर जगात राहायचा आहे.... कारचं अप्रूप तेव्हाही नव्हतं आजही नाही.... जोगळेकरांच्या बैल गाडीतून मस्त प्रत्येक खड्ड्याचा दणका सोसत हात घट्ट धरून फिरायचा आहे....!
आपल्या कडे येणारा पैसा हा जसा प्रतिष्ठा देतो तसाच तो आपल्याला इतरांपासून दूरही नेतो. आता सर / साहेब म्हणतात सगळेच ( मनातून शिव्याही घालत असतील .ती गोष्ट वेगळी), पण आता "ए दाद्या" असं आपुलकीने कानावर येणारे बोल नाही ऐकायला मिळत. खूप मनापासून प्रेम करणारं आणि मला ओळखणारं माझं आपला गावातलं माणूस किंवा ' अरे खाड्या' म्हणणाऱ्या माझ्या मित्राची पाठीवर बसणारी चापटी आताच्या 'व्यावसायिक हस्तांदोलनात' मला क्षणोक्षणी आठवते.....!!!!!!!!!!!!!!!!

घरी आल्यावर, घरात पूल ठेवण्यापूर्वी छातीवर पायाचे पंजे ठेवून उद्या मारत स्वागत करणारी 'अक्का'आमची कुटुंब घटक (कुत्री),, आता नाही...., तरी नवीन एखादा कुत्र्याचा पिल्लू पाळायचा आहे.ज्याच्या मध्ये मला हरवलेली अक्का दिसेल....!
संध्याकाळी हातपाय धुवून देवांसमोर बसून शुभंकरोती म्हणायची आहे,,, आणि देवासामोराच्या वाटीतला नेवेद्याचा दुध पिवून तळात तशीच अलिप्त राहिलेली साखर चाटून खायची आहे.......,,,...................

यातली कुठलीही गोष्ट आता मला रुबाब या सदरा खाली करायची नाहीये तर एक हौस म्हणून आणि मस्त निसर्गाच्या सान्निध्यात चिंतन करत आत्म रूपाचा शोध घेण्यासाठी करायची आहे.................

माझ्या पुर्वापुण्यायी मूळे येव्हढ सुंदर बाल पण आणि मस्त माणसांचा सहवास मला मिळाला....
तशीच 'सच्ची' माणसा मला या पुढेही मिळोत. देवा या आठवणी अशाच चिरकाल माझ्या मनाला शांतीची अनुभूती देत राहोत.
या सदिच्छे सह.....
आपला गुरुप्रसाद हरी खाडिलकर.

No comments:

Post a Comment